Shuddh Deshi Govansh Jatan Savardhan Din
Shuddh Deshi Govansh Jatan Savardhan Din
Regarding celebrating July 22 as ‘Pure Indigenous Cattle Breed Preservation and Conservation Day’
२२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’
22 July Shuddh Deshi Govansh Jatan Savardhan Din
राज्यात दरवर्षी २२ जुलै हा दिवस “शुध्द देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा करण्यास मान्यता देण्याबाबत.
दिनांक : १३ जून, २०२५
वाचा :- सदस्य सचिव महाराष्ट्र गोसेवा आयोग यांचे जा क्र. मगोआ/देशी गोवंश दिवस/प्र.क्र.१५५/५६०/२०२४/दिनांक ०२.०४.२०२५ रोजीचे पत्र
प्रस्तावना :-
देशी गायीच्या दुधाची उपयुक्तता तसेच शेण आणि गोमुत्र यांचे महत्व विचारात घेऊन गायीस कामधेनू असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ.) तथापि, राज्यातील देशी गायीच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे दिसून आले आहे. देशी गायींच्या संवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने शासन निर्णय क्र. पविआ११२४/प्र.क्र. २४४/पदुम-३, दिनांक २०.०९.२०२४ अन्वये देशी गायीस “राज्यमाता-गोमाता” म्हणून घोपित केले आहे.
देशी गायींच्या संख्येत घट होण्यामागे संकरित गायींच्या तुलनेत असलेली कमी उत्पादनक्षमता व प्रजननक्षमता ही कारणमिमांसा विचारात घेऊन देशी गायींची संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच गुणात्मक वाढ करण्यासाठी त्यांची प्रजननक्षमता व उत्पादनक्षमता वाढवून उच्च वंशावळीच्या देशी गायी निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक ठरते. यापार्श्वभूमीवर राज्यात “देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा करण्यास मान्यता देण्याची वाव शासनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णय
राज्यात देशी गायींच्या संख्येत घट होण्याची कारणमिमासा विचारात घेऊन देशी गायींच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच त्यांची उत्पादनक्षमता व प्रजननक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर देशी गायींच्या संवर्धनाचे महत्व तसेच पशुजन्य उत्पादनाचे महत्व ग्राहकाना पटवून देऊन देशी गाय पशुपालकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या बाबी विचारात घेऊन राज्यात दरवर्षी २२ जुलै रोजी ” शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
“शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा करताना देशी गाय व गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांचे महत्व व आवश्यकता विशद करणारी विविध चर्चासत्रे, प्रदर्शने, शिबीरे, स्पर्धा यांचे आयोजन आयुक्त पशुसंवर्धन व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांनी संयुक्तरित्या करावे.
यासाठी येणारा खर्च महाराष्ट्र गोसेवा आयोगाने उपलब्ध निधीतून भागवावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेताक २०२५०६१३१६४०३५७४०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांकः पविआ-१०२५/प्र.क्र.११५/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई
Agriculture, Dairy Development, Animal Husbandry and Fisheries Department
Regarding approval to celebrate Desi Cattle Preservation and Conservation Day on 22nd July every year in the state.