School Annual Inspection
School Annual Inspection
Shalanchi Varshik Tapasani Paripatrak
School Annual Inspection Report Pdf
School Annual Inspection Report pdf Guidelines instructions Circular GR
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे
स्मरणपत्र-१
क्र. शिसंमा-२६/ शाळा तपासणी/एस-१/1832134
दि. 07 APR 2026
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व.
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जि. प. सर्व
३) शिक्षण निरीक्षक (उ/द/प), मुंबई
विषय- शाळांची वार्षिक तपासणी
संदर्भ :-
१) दि. २२/०८/२०२५ च्या ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सुचना
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२५/शाळा तपासणी/एस-१/१७०८०९२, दि.०५/०२/२०२६
वरील विषयाच्या अनुषंगाने आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणी पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. आपल्या अधिनिस्थ सर्व शाळेची वार्षिक तपासणी पूर्ण करून वार्षिक तपासणीचा अहवाल दि.३१/०३/२०२६ पर्यंत संचालनालयास सादर करण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये कळविण्यात आले होते.
अद्यापही आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणीचा अहवाल संचालनालयास अप्राप्त असल्याचे दिसून येते. शाळा तपासणी अंती आढळलेल्या चांगल्या बाबी बाबत स्वतंत्र अहवाल सादर करावा. तसेच शाळा तपासणी अंती निदर्शनास आलेल्या भौतिक व गुणवत्ता विषयक उणीवाच्या अनुषंगाने उपाययोजना बाबत स्वतंत्र अहवाल देखील सादर करावा.
तरी पुनःश्च आपणास कळविण्यात येते की, आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणीचा अहवाल सोबत दिलेल्या विवरण पत्रामध्ये तात्काळ संचालनालयास सादर करण्यात यावा.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत :- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तव सादर
शाळा तपासणी विवरण पत्रे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक
