Scholarship Scheme Of CCRT For Students Registration Link सीसीआरटी नवी दिल्ली संस्थेच्या शिष्यवृत्ती २०२५-२६ योजना

Scholarship Scheme Of CCRT For Students Registration Link

IMG 20250606 223004
Scholarship Scheme Of CCRT For Students Registration Link

Scholarship Scheme Of CCRT For Students Registration Link

CCRT Scholarship Scheme FOR STUDENT

Regarding the Scholarship Scheme 2025-26 of CCRT, New Delhi Institute

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

जा.क्र. राशैसंप्रपम/कला क्रीडा/सीसीआरटी/२०२५/०३११०

दि. ०३ जून २०२५

विषय – सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेच्या शिष्यवृत्ती २०२५-२६ योजनेबाबत

संदर्भ – सीसीआरटी/२७०११/२/२०२५, सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेची दि. ०२/०६/२०२५ ची ई मेल

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेच्या वतीने दरवर्षी वय वर्षे १० ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, शिल्पकला, हस्तव्यवसाय, सृजनशील लेखन, साहित्य-कला इ. कलांमधील पुढील प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्या जातात. सन २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर शिष्यवृत्ती योजनेची माहिती दि. २५ मे २०२५ रोजी वृत्तपत्रांमध्ये सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेतर्फे देण्यात आलेली आहे.

सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत

सोबत जोडलेल्या सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेकडील पत्रासोबत शिष्यवृत्ती योजनेची पूर्ण माहिती व शिष्यवृत्ती साठीचा अर्ज जोडलेला आहे. किंवा

🌐

ह्या वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड सुद्धा करता येतील. हे अर्ज पूर्ण भरून फोटो व आवश्यक कागदपत्रांसह (Hard Copy) सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेस दि. ३० जून २०२५ पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज किंवा अंतिम तारखेनंतर पोहोचणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तरी आपल्या जिह्यातील सर्व शाळांपर्यंत सदर शिष्यवृत्ती योजनेची पूर्ण माहिती पोहोचवावी जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

सोबत – सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेचे पत्र
🖕
या ओळीला स्पर्श करून परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा

उपसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०

IMG 20250606 223042
Scholarship Scheme Of CCRT For Students Registration Link

प्रति,१. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
३. शिक्षण निरीक्षक, मुंबई पश्चिम, दक्षिण, उत्तर

Leave a Comment

error: Content is protected !!