SC ARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link

SC ARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link

image 5
SC ARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link

SC ARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link

Applications Invited for Pre-Coaching Program for JEE and NEET Entrance Exams

दिनांक:- २५/०६/२०२५


महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम (मांग, मातंग मिनिमादिग, दखनी- मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा या समाजातील पात्र उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविणेबाबत.


अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम (मांग, मातंग मिनिमादिग, दखनी मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडो, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा) या समाजातील पात्र उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नौट (NEET) या प्रवेश परीक्षांचे निःशुल्क अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण खाजगी व नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम (मांग, मातंग मिनिमादिग, दखनी मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा समाजातील जे उमेदवार सन-२०२५ ची इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांसाठी सन २०२५ मे २०२७ या कालावधीसाठी जेईई (JEE) आणि नोट (NEET) या प्रवेश परीक्षांचे मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण राबविण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर प्रशिक्षणासाठी इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे व रु.८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे निवड केली जाईल.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. ०१/०७/२०२५ पासून ३०/०७/२०२५ पर्यंत

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करावी.

व्यवस्थापकीय संचालक,
अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई
श्री-२०१/२०२ अर्जुन सेंटर, स्टेशन रोड, गोवंडी (पु) मुंबई- ४०० ०८८
जा.क्र./आटी/योजना/जेईई-नोट/२०२५/००८९

IMG 20250714 092719
SC ARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link

Leave a Comment

error: Content is protected !!