Saying Pasaydan In School
Saying Pasaydan In School
Regarding saying Pasayadan in every school in Maharashtra State
Regarding saying “Pasaydaan” in every school in Maharashtra on August 14, 2025.
Saint Shri. 750th birth anniversary of Gyandev
The Golden Jubilee (750) of the great saint Shri. Dnyaneshwar Maharaj
क्रमांक :- संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२७२/एस.डी.४
दिनांक:- ३१ जुलै, २०२५
विषय :- दि. १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्याबाबत.
संदर्भ :- मा. मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देश, दिनांक २९ जुलै, २०२५
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन निर्देशाची प्रत त्यासोबतच्या सहपत्रांच्या प्रतींसह या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.
२. सन २०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष आहे. येत्या दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी “गोकुळ अष्टमीस” संतश्रेष्ठ श्री. ज्ञानदेवांची ७५० वी जयंती असल्याने, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्यात यावे, असे मा. मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देश आहेत.
३. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशास अनुसरून आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व दि. १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्यात यावे यासंदर्भात आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, तसेच, सदर सूचनेची सुयोग्य अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याबाबत देखील संबंधितांना कळविण्यात यावे, ही विनंती.
Pasaydan Audio mp3
सहपत्र – वरीलप्रमाणे या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा
आपला,
(तुषीर महाजन) उपसचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रति,
आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत माहितीस्तव अग्रेषित :-
१. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
Also Read 👇
सन २०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंती वर्ष म्हणून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्सव साजरा करण्याबाबत…..
दिनांक : ३० जुलै, २०२५.
संदर्भ : मा.मुख्यमंत्री महोदय यांचे दिनांक २८.०७.२०२५ रोजीचे निर्देश.
शासन परिपत्रक
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे. येत्या “गोकुळ अष्टमी” दिनांक १५.०८.२०२५ रोजी संतश्रेष्ठ श्री. ज्ञानदेवांची ७५० वी जयंती आहे.
०२. मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिनांक २८.०७.२०२५ रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने, संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष निमित्त दिनांक १५.०८.२०२५ रोजी राज्यातील प्रत्येक नगर व शहरांमध्ये महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषदा यांनी सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा/मुर्तीची, पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करावा.
०३. उपरोक्त नमूद सूचनांची सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.
०४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०७३०१९०८३९७८२५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास या ओळीला फक्त स्पर्श
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०२५/प्र.क्र.३३६/नवि-२०,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
प्रत :-
१) मा. राज्यपाल महोदयांचे सचिव, राज भवन, मुंबई-३२
२) मा. मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
३) मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
४) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
Regarding the celebration of the year 2025 as the post-seventh century golden jubilee (750) of the great saint Shri. Dnyaneshwar Maharaj in all urban local self-government bodies