Sarvjanik Ganeshotsav Puraskar Sparda
Sarvjanik Ganeshotsav Puraskar Sparda
Public Ganeshotsav Mandal Award Selection Criteria
Regarding organizing an annual competition to award the best public Ganeshotsav mandals during Ganeshotsav by the government.
Tourism and Cultural Affairs Department
Regarding organizing an annual competition to award the best public Ganeshotsav mandals during Ganeshotsav by the government.
Sarvjanik Ganeshotsav Puraskar Sparda Nikash GR
गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी प्रतिवर्षी स्पर्धा आयोजित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
शासन निर्णय क्रमांक : पुलदे-२०२५/प्र.क्र.७४ (ई-११४४०९५)/सां.का.२,
मंत्रालय, मुंबई-३२
दिनांक : २० जून, २०२५
वाचा : १. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांक: पुलदे-२०२२/प्र.क्र.१३३/सां.का.२, दि. ११ ऑक्टोंबर २०२२.
२. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांकः पुलदे-२०२३/प्र.क्र.१/सां.का.२, दि. ०४ जुलै २०२३.
३. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांकः पुलदे-२०२४/प्र.क्र.१११/सां. का.२, दि. ३१ जुलै २०२४.
प्रस्तावना :
लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरु केली. सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, याकरीता सन २०२२ सालापासून राज्यातील सार्वजनिक सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येतात. संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णय दि. ११.१०.२०२२ अन्वये ३६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय पारितोषिके घोषित करण्यात आली होती. तद्नंतर सन २०२३ व २०२४ साली संदर्भ क्र. २ व ३ अन्वये अनुक्रमे दि. ०४.०७.२०२३ व दि. ३१.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानूसार गणेशोत्सव स्पर्धा राबविण्यासंदर्भात निश्चित करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे, सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर प्रतिवर्षी गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील सार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.
शासन निर्णय
राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, याकरीता गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना प्रतिवर्षी राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
०२. सदर पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहिल :-
२.१ सदर या शासन स्पर्धेत, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल.
सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड पुढील निकषांच्या आधारे करण्यात येईल.
Public Ganeshotsav Mandals will be selected for the award based on the following criteria.
अ.क्र. | गुणांकनासाठी बाब | गुणांकन |
१. | १ सांस्कृतिक कार्यक्रम / स्पर्धांचे आयोजन (प्रत्येकी २ गुण) गायन वादन नृत्य नाट्य लोककला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला हस्तकला चित्रकला शिल्पकला माहितीपट / चित्रपट | २० |
२ | संस्कृतिचे जतन/संवर्धन (प्रत्येकी २ गुण) पोशाखसंस्कृती/ खाद्यसंस्कृती/वाद्यसंस्कृती संस्कृती संवर्धनासाठी अभिनव उपक्रम पारंपारिक नाणी/शस्त्र/भांडी इ. संग्रहांचे प्रदर्शन साहित्य विषयक उपक्रम लूप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन | १० |
३ | १. राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन (५ गुण) २. राष्ट्रीय / राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जन जागरुकता, जतन व संवर्धन (५ गुण) | १० |
४ | १. सामाजिक उपक्रम (प्रत्येकी २ गुण) १.२ महिला सक्षमीकरण पर्यावरण रक्षण वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार व्यसनमुक्ती / अंधश्रध्दा निर्मूलन / सामाजिक सलोखा जेष्ठ नागरिकांसाठी उपक्रम आरोग्यविषयक उपक्रम शैक्षणिक उपक्रम कृषिविषयक उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती वंचित घटकांसाठी उपक्रम २. कायमस्वरुपी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना ५ गुण देण्यात यावेत. उदा. सार्वजनिक गणेश मंडळांकडून कायमस्वरुपी राबविण्यात येत असलेल्या आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृध्दाश्रम, एखादे गाव दत्तक घेणे व इतर सामाजिक सेवा वंचित घटकांसाठी उपक्रम | २५ |
५ | पर्यावरणपुरक मूती | ०५ |
६ | पर्यावरणपुरक सजावट (थर्माकोल / प्लॅस्टीक विरहीत) | ०५ |
७ | ध्वनीप्रदुषण रहित वातावरण | ०५ |
८ | पारंपारिक / देशी खेळांच्या स्पर्धा | १० |
९ | गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा (प्रत्येकी २ गुण) पिण्याच्या पाण्याची सोय प्रसाधनगृह वैद्यकीय प्रथमोपचार वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त परिसरातील स्वच्छता | १० |
एकूण | १०० |
(सदर स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी हा मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशी पासून ते चालू वर्षाच्या गणेश चतुर्दशी पर्यंतचा असेल.)
२.२ वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या / करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये सोबत जोडला आहे.
२.३ सदर गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी मागील सलग २ वर्षे राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. सदरची अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने नमूद करण्यात आली आहे.
२.४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या
या ईमेलवर सदर स्पर्धेचे परिपूर्ण अर्ज दि. २० जुलै ते त्या वर्षाच्या गणेश चतुर्दशीच्या एक दिवसा पूर्वीपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. तसेच, प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र ईमेल आयडी तयार करुन सदर ईमेल आयडी संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांना दि. ३१ जुलै पूर्वी कळवावे.
२.५ संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांनी प्राप्त झालेले जिल्हा निहाय अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास गणेश चतुर्दशी पूर्वी उपलब्ध करुन द्यावेत.
२.६ सदर स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय निवड समिती राहिल.
अ.क्र. | पदनाम | समितीतील पदनाम |
१ | जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी अध्यक्ष | अध्यक्ष |
२ | शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक | सदस्य |
३ | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी (गट-अ/ब संवर्गातील) | सदस्य |
४ | जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी (गट-अ/ब संवर्गातील) | सदस्य |
५ | जिल्ह्यातील पोलीस अधिकारी (गट-अ/ब संवर्गातील) | सदस्य |
६ | जिल्हा नियोजन अधिकारी | सदस्य सचिव |
संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे वरील अधिकाऱ्यांची नियुक्ती व त्यांचे समन्वय करतील. उपरोक्त निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील. तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकण करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व व्हीडीओसह राज्यस्तरीय समितीकडे देण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत, संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई यांना त्यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करतील.
२.७ जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या यादयांमधून राज्यस्तरीय ३ विजेते क्रमांक निवडण्यासाठी राज्य स्तरावर पुढीलप्रमाणे निवड समिती राहिल –

सदर दोन्ही समितीसाठी सचालक, पु.ल. देशपाडे महाराष्ट्र कला अकादमी हे समन्वयक असतील.
२.८राज्यस्तरीय निवड समिती ही जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४
प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गुणांकन व संबंधित कागदपत्राच्या आधारे पहिल्या ३ विजेत्यांची निवड करतील व त्यांचा अहवाल संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्याकडे सादर करतील.
२.९ राज्यातील पहिल्या ३ विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुढीलप्रमाणे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.
प्रथम क्रमांक रु.५.०० लक्ष
द्वितीय क्रमांक रु. २.५ लक्ष
तृतीय क्रमांक रु.१.०० लक्ष
राज्यस्तरीय निवड समितीकडे जिल्हास्तरीय निवड समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे ३ विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रु.२५,००० चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
२.१० सदर गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरीय / राज्यस्तरीय निवड समितीने घेतलेल्या निर्णयावर कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आक्षेप घेता येणार नाही.
२.११ सदर गणेशोत्सव स्पर्धेअंती राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची यादी स्वतंत्रपणे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात येईल.
२.१२ सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही परिस्थितीत विभागून राज्यस्तरीय अथवा जिल्हास्तरीय पारितोषिक विजेते गणेशोत्सव मंडळ म्हणून घोषित करता येणार नाही, याबाबतची दक्षता जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय निवड समितीने घेणे आवश्यक आहे. मात्र, सदर गणेशोत्सव स्पर्धेतंर्गत समान गुणांकन प्राप्त झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी ज्या मंडळाच्या स्थापनेला जास्त वर्षे झालेली आहेत, त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास पारितोषिकासाठी प्राधान्य देण्यात येईल.
०३. जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय निवड समितीतील सर्व सदस्यांना शासनाच्या प्रचलित दैनिक भत्ता व प्रवास भत्ता धोरणानुसार अनुज्ञेय राहिल व त्यासाठी होणारा खर्च संबंधित कार्यालयाने त्यांच्या कार्यालयीन खर्चातून भागवावा.
०४. सदर स्पर्धेसाठी होणारा खर्च, मागणी क्रमांक “झेडडी-०२, २२०५ कला व संस्कृती (१०१) ललित कला शिक्षण (०७) कला अकादमी (०७) (०१) पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (२२०५ १४६३) ५० इतर खर्च (अनिवार्य) या लेखाशीर्षाखाली त्या त्या वित्तीय वर्षात मंजूर झालेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.
५. यासाठी संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२, दि.१७.४.२०१५ सोबतच्या वित्तीय अधिकारी नियमपुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग-तीन मधील, अनु क्र.४, परिच्छेद क्रमांक २७ (२) (अ) नुसार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०६२०१७३२४३१३२३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(परसराम बहुरे) अवर सचिव, महाराष्ट्र शासन