Safety Measures for Students
Safety Measures for Students
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
क्र. प्राशिसं/८०२/शा.वि.सु./संकीर्ण / २०२५/3420
दिनांक – ११/०७/२०२५
तातडीचे
विषय :- राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विदयार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सुचनांची अंमलबजावणी करणेबाबत
संदर्भ :-
१) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-११२५/प्र.क्र.२५१/२५, एस.एम.१, दि. १६/०४/२०२५
२) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.११९/एस.डी. ४. दि.१३/०५/२०२५
३) संचालनालयाकडील पत्र क्र. प्राशिसं/८०२/संकीर्ण/२०२५, दि.२१/०५/२०२५
४) संचालनालयाकडील पत्र क्र. प्राशिसं/८०२/संकीर्ण/शा.वि.सु./३२४४/२०२५, दि.२५/०६/२०२५
५) मा. आयुक्त (शिक्षण) पुणे यांचे पत्र क्र आस्था-क/प्राथ-१०६/विसुशानि-अंम/२०२५/१३१९८७७ दिनांक १०.०७.२५
६) मा. आयुक्त (शिक्षण) पुणे यांचे पत्र क्र आस्था-क/प्राथ-१०६/विसुशानि-अंम/२०२५/१३२१२७१ दिनांक १०.०७.२५
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने शासनाचे संदर्भ क्र.१ व २ चे शासन निर्णय व संचालनालयाचे संदर्भ क्र. ३ व ४ चे पत्रांचे तसेच मा आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संदर्भ क्र ५ व ६ च्या पत्रांचे अवलोकन व्हावे.
राज्यातील शालेय विदयार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत, शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय/परिपत्रकांन्वये मार्गदर्शक सूचना व दि. २६/०९/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मा. सेवानिवृत्त न्यायाधिश यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन शासनाने दि.१३/०५/२०२५च्या शासन निर्णय तसेच संचालनलयाने दि. २१/०५/२०२५ व दि.२५/०६/२०२५ च्या पत्रान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विदयार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात खालील विषयांची अंमलबजावणी करणेसाठी सर्वसमावेशक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
१. लैंगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ मधील तरतुदींची अंमलबजावणी करणे.
लैंगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२” हा केंद्र शासनाचा कायदा व सदर कायदयाखालील नियमावली केंद्र शासनाने दि.१४/११/२०१२ पासून लागू केलेली आहे, या कायदयातील तरतुदीबाबत शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व्यवस्थापनांना तात्काळ सूचना दयाव्या.
२. शाळेतील विदयार्थ्यांवरील होणा-या अत्याचाराची तक्रार POCSO e-Box व CHIRAG या अॅपवर करणे व इतर उपाययोजना.
३. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याबाबत.
४. शाळांमध्ये सखी-सावित्रीचे गठन करण्याबाबतची कार्यवाही करणे,
५. शाळा व परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे,
६. कर्मचा-यांची चारित्र्य पडताळणीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे,
७. विदयार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भातील सुरक्षिततेच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
८. शाळेतील प्रसाधनगृह / स्वच्छतागृहांबाबत कार्यवाही करणे.
९. शाळेत येणा-या अभ्यागतांसाठी आचारसंहिता लागू करणे.
१०. सायबर हल्ले व धोके टाळण्याच्या अनुषंगाने शाळा / पालकांनी करावयाची कार्यवाही.
११. क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण यासंदर्भात करावयाची कार्यवाही.
१२. विदयार्थी सुरक्षा समितीचे गठन.
शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करण्यात यावे. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत मा. आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी विहित केलेल्या नमुन्यामधील प्रमाणपत्र शाळास्तरावरील विद्यार्थी सुरक्षा समितीने प्रमाणित करुन शाळेच्या दर्शनी भागात लावावयाचे आहे. याबाबतच्या सूचना आपल्या स्तरावरून सर्व संबंधीतांना
द्याव्यात. प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडला आहे.
१३. जिल्हा स्तरावरील विदयार्थी सुरक्षा आढावा समितीचे गठन व विभागीय स्तरावरील पर्यवेक्षण
जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करावयाची आहे. सदर समितीने महिन्यातून एकदा उपाययोजनांचा आढावा घ्यावा. याबाबतचा अहवाल
विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा.
१४. शाळेमध्ये विदयाध्यर्थ्यांसोबत अनुचित प्रकार/अनिष्ट घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन/संस्था//मुख्याध्यापक/शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोविस तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. अशी अनुचित/अनिष्ट घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती/संस्था गंभीर शिस्तीस कारवाईस पात्र ठरतील.
मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संदर्भ क ५ व ६ अन्वये दिलेल्या सूचनांनुसार राज्यातील विदयार्थ्यांची सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात मा उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल सुमोटो जनहित याचिका क्र ०१/२०२४ मधील मा. न्यायालयाचे दिनांक २४.०६.२०२५ रोजीच्या आदेशानुसार कार्यवाही करणेबाबत कळविलेले आहे. तसेच याबाबतचा अनुपालन अहवाल शासनामार्फत मा. उच्च न्यायालयास सादर होणार आहे. त्यामुळे क्षेत्रिय अधिका-यामार्फत जास्तीत जास्त शाळांना भेटी देऊन शासन निर्णय दिनांक १३.०५.२०२५ मधील निर्देशानुसार उपाययोजनांची अमंलबजावणीबाबतची माहिती घ्यावयाची आहे. तसेच दिनांक १३.०५.२०२५ रोजीचा शासन निर्णय सर्व पालकांपर्यंत (व्हॉटसअप, ईमेल संदेश, इत्यादी माध्यमांद्वारे) पोहोचविण्याबाबतच्या सूचना आहेत.
राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना असणा-या शासन निर्णय दिनांक १३.०५.२०२५ च्या सूचनांनुसार केलेल्या अंमलबजावणीच्या कार्यवाहीबाबतची माहिती तालुकास्तरावर शिक्षणाधिकारी / उपशिक्षणाधिकारी /गटशिक्षणाधिकारी / विस्तार अधिकारी/ केंद्रप्रमुख तसेच शहरी भागात पर्यवेक्षक / प्रशासन अधिकारी / प्रशासकीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळा भेटी देऊन वस्तुस्थितीदर्शक माहिती दि.२०.०७.२०२५ अखेर सोबतच्या विहित विवरणपत्र – १ ते ८ मध्ये आपल्या स्वाक्षरीसह तात्काळ या कार्यालयास सादर करावी. तसेच याबाबत माहिती गुगल शिटवर माहिती भरण्यासाठी स्प्रेडशिटची लिंक पाठविण्यात आलेली आहे.
सदरची माहिती ही महत्वाची असून मा. न्यायालयास सादर करावयाची असल्याने आपल्या कार्यालयाची (कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हयांची माहिती एकत्रित करण्यासाठी याबाबत कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांना नोडल ऑफिसर म्हणुन नेमण्यात यावे. याबाबत आपल्या विहित नमुन्यातील विवरणपत्रे आपल्या स्वाक्षरीने सादर करावीत. तसेच लिंकद्वारे भरण्यात आलेली माहितीही या कार्यालयास सत्वर सादर होईल पहावे. मा. उच्च न्यायालयाने कालमर्यादा दिलेली असल्याने प्राधान्याने कार्यवाही होईल याची दक्षता घ्यावी.
परिपत्रक व सहपत्र-वरीलप्रमाणे
(विहित विवरणपत्र-१ ते ८)
तसेच संदर्भ पत्रे
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्रराज्य, पुणे-०१
प्रति,विभागीय शिक्षण उपसंचालकसर्व विभाग
Also Read 👇
क्र. प्राशिसं/८०२/संकीर्ण / शा.वि.सु/तातडीचे २०२५/3244
दिनांक-25/०५/२०२५
विषयः- राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचनांची अंमलबजावणी करणेबाबत.
संदर्भ
:- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-११२५/प्र.क्र. २५१/२५. एसएम १, दिनांक-१६/०४/२०२५
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र. ११९/ एसडी ४, दिनांक-१३/०५/२०२५
३) संचालनालयाकडील पत्र जा.क्र. क्र. प्राशिसं/ ८०२/ संकीर्ण/२०२५, दि. २१/०५/२०२५
संदर्भीय शासन निर्णयाचे व पत्राचे अवलोकन करावे.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत शालेय शिक्षण व
क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय/परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना व दिनांक २६/०९/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मा. सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन शासनाने शासन निर्णय दिनांक-१३/०५/२०२५ अन्वये तसेच संचालनालयाच्या दिनांक २१/०५/२०२५ च्या पत्रान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात खालील विषयाबाबत अंमलबजावणी करणेबाबत सर्वसमावेशक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
१. “लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२” मधील तरतुदींची अंमलबजावणी करणे,
२. शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार POCSO e-Box व CHIRAG या अॅपवर करणे व इतर उपाययोजना करणे.
३. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याबाबत.
४. शाळांमध्ये सखी सावित्रीचे गठन करण्याबाचतची कार्यवाही करणे.
५. शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,
६. कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे,
७. विद्यार्थ्यांच्या वाहतुकी संदर्भातील सुरक्षिततेच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
८. शाळेतील स्वच्छतागृह/प्रसाधन गृहांबाबत कार्यवाही करणे,
९. शाळेत येणाऱ्या अभ्यागतांसाठी आचारसंहिता लागू करणे,
१०. सायबर हल्ले व धोके टाळण्याच्या अनुषंगाने शाळा/पालकांनी करावयाची कार्यवाही.
११. क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण या संदर्भात करावयाची कार्यवाही.
१२. विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन.
१३. जिल्हा स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीचे गठन व विभागीय स्तरावरील पर्यवेक्षण,
१४. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार/अनिष्ट घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन / संस्था/ मुख्याध्यापक / शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. अशी अनुचित/अनिष्ट घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित व्यक्ती / संस्था गंभीर शिस्तीस / कारवाईस पात्र ठरतील.
तरी आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत केलेल्या कार्यवाही बाबतची माहिती जिल्हानिहाय एकत्रित करून दिनांक २७/०६/२०२५ व दिनांक २८/०६/२०२५ रोजी होणाऱ्या बैठकीस या माहितीसह उपस्थित राहावे.
शिक्षण संचालक,
प्राथमिक शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
Regarding the implementation of comprehensive instructions regarding measures to be taken in accordance with the safety and security of students in schools of all mediums and managements in the state
Safety Measures for Students
Also Read 👇
Safety Measures for Students
Implementation of safety measures for students/pupils in all schools in the state
क्र. आस्था/प्राथ १०६/विद्यार्थी सुरक्षा/२०२४/६६८९
दिनांक ०४/११/२०२४
विषय : राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/विद्यार्थ्यांनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची परिपूर्ण रीतीने अंमलबजावणी करणेबाबत…
शिक्षण विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना कळविण्यात येत आहे की, विद्यार्थी सुरक्षा विषयी उपाययोजना बाबत सध्या सर्वत्र कार्यवाही सुरू आहे. या कामी संदर्भ क्रमांक १ नुसार शासन निर्णय ही निर्गमित झालेला आहे. संदर्भीय शासन निर्णयामधील सूचनांमध्ये प्रामुख्याने
संपूर्ण संदर्भीय शासन निर्णय क्रमांक दिनांक २१ ऑगस्ट २०२४ वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
i. शाळा व परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.
ii. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणे.
iii. विद्यार्थी सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये तक्रार पेटी बसविणे.
iv. सखी सावित्री समिती बाबत तरतुदींचे अनुकलन करणे आणि
v. विद्यार्थी सुरक्षा समितीचे स्थानिक पातळीवर गठन करणे.
या संदर्भात आपले कार्यालयाने यापूर्वी विहित नमुन्यात माहिती ही सादर केलेली आहे. तथापि याविषयी अंमलबजावणीबाबत विविध माध्यमांमधून खालील प्रकारच्या तक्रारी / आक्षेप प्राप्त होत आहेत.
१. शालेय विद्यार्थी सुरक्षा संबंधी त्रुटी राहिल्याबद्दल शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांना नोटीसा दिलेल्या आहेत, तथापि याबाबत पुढे कोणतीही कारवाई केलेली नाही. २. अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही बंद स्थितीमध्ये आहेत.
३. बऱ्याच शाळांमध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासले जात नाही.
४. सीसीटीव्हीचे बैंकअप ठेवण्यात येत नाही.
५. विविध समित्या केवळ कागदावर स्थापन केलेल्या आहेत. त्यांचे अहवाल निरीक्षणासाठी उपलब्ध नाहीत. ६. स्कूल वाहन सुरक्षा संबंधी उपाय योजना केलेल्या नाहीत. त्यांचे चालकांचे फोनक्रमांक उपलब्ध नाहीत.
७. या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केलेली नाही.
या पार्श्वभूमीवर आपणास सूचना देण्यात येत आहेत की,
१) शाळा सुरक्षा संबंधी आपले विभागातील माहितीचे जे विहित नमुन्यातील प्रपत्र यापूर्वी पाठवण्यात आलेले होते आता सद्यस्थितीतील प्रगतीच्या तपशीलासह हे विहित नमुन्यातील माहितीचे प्रपत्र नव्याने इकडे सादर करावे
२) उपरोक्त मुद्दे क्रमांक २ ते ७ बाबतचा अहवाल वस्तुस्थितीदर्शक तपशीलवार अहवाल सादर करण्यात यावा.
३) उपरोक्त मुद्दा क्रमांक १ संदर्भात आपले अधिनस्त अधिकारी यांनी कारवाई प्रलंबित ठेवली असेल अगर केलेलीच नसेल तर त्याबद्दल खुलासा घेऊन तसा अहवाल सादर करावा. तद्वतच ही कारवाई पूर्ण होईल यासाठीचे पर्यवेक्षण करावे.
आपण या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिनांक ०७/११/२०२४ पूर्वी इकडे सादर करावा.
📂📥
🌐👉या ओळीला स्पर्श करून सदरचे परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकता👈
शिक्षण सहसंचालक,
(प्रशासन, अंदाज व नियोजन)
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे
राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/विद्यार्थ्यांनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची परिपूर्णरीतीने अंमलबजावणी करणेबाबत
Implementation of safety measures for students/pupils in all schools in the state
संदर्भ : १. शासन निर्णय क्रमांक दिनांक २१ ऑगस्ट २०२४ २. माननीय आयुक्त शिक्षण यांनी घेतलेली VC दिनांक ०२/०९/२०२४ ३. राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीची बैठक दिनांक ३०/०८/२०२४ चे इतिवृत्त ४. विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कडील प्राप्त अहवाल