RTE 25 Percent Admission Process Extension
RTE 25 Percent Admission Process Extension
विषयः-सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतंर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र.१ मधील प्रवेशासाठी मुदतवाढीबाबत
संदर्भः-१. संचालनालयाचे पत्र क्र. आरटीई २५ टक्के/२०२५/८०१/१०८/दि.१३/१/२०२५
२. संचालनालयाचे पत्र क्र. आरटीई २५ टक्के/२०२५/८०१/संकीर्ण/दि.१७/३/२०२५
उपरोक्त विषयी आपणांस कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षाची RTE २५ टक्के प्रवेशाची प्रतिक्षाधिन यादीचा पहिल्या टप्प्याची मुदत दि.१८-३-२०२५ ते दि.२४/३/२०२५ पर्यंत देण्यात आली होती. RTE २५ टक्के प्रवेश प्रतिक्षाधिन यादी पहिला टप्पा दि.२५/३/२०२५ ते दि.१/४/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या फेरीसाठी ही अंतिम मुदतवाढ आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
Also Read 👇
RTE 25 Percent Admission Process Extension
Regarding extension of RTE 25% admission process for the year 2025-26
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
जा.क्र.प्राशिसं/ड-८०१/मुदतवाढ/२०२५/१०८१
दिनांकः- २७-२-२०२५
2 8 FEB 2025
विषयः-सन २०२५-२६ यावर्षाचे RTE २५% प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीबाबत
संदर्भ-संचालनालयाचे पत्र क्र. आरटीई २५ टक्के/२०२५/८०१/७३३/दि.१३-२-२०२५
उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, संदर्भ क्र.१ नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेसाठी दि.१४-२-२०२५ ते २८-२-२०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
तरी याद्वारे कळविण्यात येते की, सन २०२५-२६ या वर्षाची आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेची मुदतवाढ दि.१-३-२०२५ ते १०-३-२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे. तरी सर्व संबंधितांनी देण्यात आलेल्या मुदतवाढ कालावधीत प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही करावी.
शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई मनपा/शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.सर्व
४. प्रशासन अधिकारी मनापा / नपा सर्व
५. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व
Plz see how good