RIMC Exam Update Information

RIMC Exam Update Information

image 60
RIMC Exam Update Information

RIMC Exam Update Information

RIMC Exam Date Shedule Registration Admit Card

संदर्भः मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, यांचे क्र. EE/Jun 25/NT दि. 03 जानेवारी, 2025 रोजीचे पत्र.


महोदय,
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) 01 जून, 2025 रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील (इंग्रजी व मराठी) विनामूल्य प्रसिध्दीस द्यावयाच्या निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे.
कृपया सोबतचे प्रसिध्दीपत्रकास राज्यातील सर्व वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती आहे.


आपली विश्वासू,
(अनुराधा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे


राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड
प्रवेशपात्रता परीक्षा जून 2025
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता 8 वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे” ही परीक्षा दिनांक 01 जून, 2025 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात.

READ RIMC Exam Information

1) शैक्षणिक पात्रता : विद्यार्थी विद्यार्थीनी (उमेदवार) दि. 01 जानेवारी, 2026 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा. 2) वय : या परीक्षेसाठी विद्यार्थी / विद्यार्थीनीचे वयोमर्यादा (वय) दिनांक 01 जानेवारी, 2026 रोजी 11½ (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि 13 (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे, म्हणजेच विद्यार्थी विद्यार्थीनीचा जन्म दिनांक 02 जानेवारी 2013 च्या आधीचा व दिनांक 01 जुलै 2014 च्या नंतरचा नसावा.


3) परीक्षा शुल्क : आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकताः-


4) आवेदनपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया:- परीक्षेचे माहितीपत्रक, आवेदनपत्र व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून उत्तराखंड पिन कोड 248003 यांचेमार्फत खालील पद्धतीने मागविता येईल,
अ) ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) व जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या

या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधरण व इतर संवर्गाकरिता रु. 600/- व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. 555/- पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्मची) मागणी आपणास करता येईल.

ब) डिमांड ड्राफ्ट द्वारे परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता सर्वसाधरण संर्वगातील विद्यार्थी (उमेदवार) करीता रु. 600/- चा डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. 555/- चा डी.डी THE COMMANDANT RIMC FUND, DRAWEE BRANCH, HDFC BANK, BALLUPUR CHOWK, DEHRADUN, (BANK CODE 1399), UTTARAKHAND यांचे नावाने काढावा. सदर डी. डी. THE COMMANDANT “RASHTRIYA INDIAN MILITARY COLLEGE, DEHRADUN, UTTARAKHAND, 248 003 या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/छायांकितप्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. तसेच इंग्रजी कॅपिटल अक्षरातच लिहिलेला अथवा टाईप केलेला असावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.+

टीप:-
परीक्षेसाठी मा. कमांडंट “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेमार्फत पुरवलेलेच आवेदनपत्र वैद्य/ग्राह्य धरले जाईल.
परीक्षेसाठी मा. कमांडंट “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचे आहे. स्थानिकरित्या छपाई केलेले / छायांकित प्रतीतले व RIMC चा होलोग्राम नसलेले आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाहीत.
आवेदनपत्र शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही.

5) कागदपत्रेः- आवेदनपत्र (फॉर्म) 2 (दोन) प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे..

READ RIMC Exam Information

अ) जन्म दाखल्याची छायाप्रत (राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी)
ब) उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी)
क) अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी).
ड) विद्यार्थ्याचा फोटो, जन्मतारीख व इयत्तेच्या नोंदीसह शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.
इ) आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आधारकार्ड छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे. बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल.
ई) विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो (मागील बाजूस विद्यार्थ्याच्या सहीसह)
उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत.

READ ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAMINATION (AISSEE)-2025

सूचना : आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ) भांबुर्डा, आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर पुणे 411004. या पत्त्यावर दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत. कुठल्याही परिस्थितीत आवेदनपत्र RIMC, डेहराडूनकडे जमा करु नयेत.

image 59
RIMC Exam Update Information

आधिक माहितीसाठी खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करावा किंवा खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट द्यावी.

Phone No.020-29709617

Email: mscepune@gmail.com

Leave a Comment

error: Content is protected !!