Shiv Chhatrapati State Sports Award Online Apply Link
Shiv Chhatrapati State Sports Award Online Apply Link
Shiv Chhatrapati rajya krida puraskar Online Apply Link
महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे
संकेतस्थळ: https://sports.maharashtra.gov.in
ई-मेल:desk14.dsys-mh@gov.in
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, २०२३-२४.
वृत्तपत्र टिपणी
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडामार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासन निर्णय दि. २९ डिसेंबर, २०२३ अन्वये व शासन निर्णय दि. २५ जानेवारी, २०२४ नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, २०२३ विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/व्यक्ती यांच्याद्वारा दि. १४ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करणा-या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या
Shiv Chhatrapati rajya krida puraskar Online Apply Link
संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि. १४ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत व दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावेत.