Revised Instructions Minority Quota Class 11 Central Online Admission Process
Revised Instructions Minority Quota Class 11 Central Online Admission Process
Revised Instructions For Minority Quota Class 11th Central Online Admission Process
Revised instructions regarding minority quota in the Class 11 Central Online Admission Process.
Revised instructions regarding minority quota in the Central Online Admission Process for Class 11 from the academic year 2025-2026.
Minority quota revised notice in Class 11 Central Online Admission Process
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अल्पसंख्याक कोट्याबाबत सुधारीत सूचना.
दिनांक: २३ जून, २०२५.
वाचा:-
१. शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५-प्रक्र.१६/ एसडी -२,
दि. ०६.०५.२०२५.
२. शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५-प्रक्र.१६/ एसडी-२, दि. ०२.०६.२०२५.
३. शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः प्रवेश १२२५-प्रक्र.१६/ एसडी -२, दि. १०.०६.२०२५.
प्रस्तावना:-
संदर्भाकित शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत सुधारित कार्यपध्दती अवलंबिण्यात आली आहे. तरी, सदर प्रकरणी रिट याचिका क्र.७२२३/२०२५ व याचिका क्र.१७१३३/२०२५ महाराष्ट्र असोशिएशन ऑफ मायनॉरीटी व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन दाखल झाली आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ याचिका क्रमांक ७२७३/२०२५ व याचिका क्रमांक १७१३३/२०२५ यामध्ये दि. १२.६.२०२५ रोजी पुढीलप्रमाणे आदेशित केले आहे – “till further orders we direct that insofar as minority educational institutions are concerned for admissions to the FYJC with which the petitions are concerned, the mandate of social reservation shall not be made applicable to any seats in the Petitioners’ minority educational institutions. Government. Consequent steps may be taken by the State”
उपरोक्त निर्देशानुसार शासन निर्णय दि.०६.०५.२०२५ व तद्नंतर निर्गमित करण्यात आलेल्या दि.१०.०६.२०२५ रोजीच्या शुद्धिपत्रक सुधारित करणे आवश्यक असल्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
यास्तव, यापुर्वी निर्गमित करण्यात आलेले संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय व संदर्भ क्र.३ येथील शुद्धीपत्रकात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.
शुध्दीपत्रक : -
संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय दि.०६.०५.२०२५ मधील मुद्दा क्रमांक १८.९ मधील नमूद बदल खालीलप्रमाणे –
अ) मुद्दा क्र.१८.९ –
सामाजिक आरक्षणाबाबतच्या राज्य शासनाच्या सर्व तरतुदी संपूर्ण राज्यातील इ. ११ प्रवेश प्रक्रियेसाठी लागू राहतील. या ऐवजी,
राज्य शासनाच्या सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतच्या सर्व तरतुदी अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शाळा/उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय वगळता राज्यातील इतर सर्व शाळा/उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना इ.११ प्रवेश प्रक्रियेसाठी लागू राहतील.
असे वाचावे.
आणि
संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय दि.०६.०५.२०२५ तसेच संदर्भ क्र.३ दि.१०.६.२०२५ रोजीच्या शुद्धीपत्रकाद्वारे शैक्षणिक वर्ष २०२५ २०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश करण्याबाबत अल्पसंख्याक संस्थाकरीता अनुसरावयाची कार्यपद्धतीत बदल करण्यात येत आहेत.
अ) मुद्दा क्र.११ –
“अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. परंतु, अल्पसंख्यांक कोट्यातील जागा पहिल्या फेरीअंती रिक्त राहिल्यास पहिल्या फेरीनंतर अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महविद्यालयांना उर्वरीत जागा प्रत्यार्पित करण्याची मुभा असेल. परंतु, दूस-या फेरीच्या वेळी अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाकरीता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील व तदनंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारण मध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा महाविद्यालयांना असेल. तथापि, उर्वरीत जागा प्रत्यार्पित करणे पुर्णतः ऐच्छिक असून कोणत्याही अल्पसंख्याक संस्थेवर बंधनकारक नसेल.
भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल. या कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील, अल्पसंख्यांक विभागाच्या दिनांक १८/०६/२०१४ च्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश करताना त्या-त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत. त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील. तद्नंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रत्यार्पित रिक्त जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचे तत्व बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या प्रवेशाप्रमाणे असेल.”
ऐवजी
मुद्दा क्र.११ –
“अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. परंतु, अल्पसंख्यांक कोट्यातील जागा पहिल्या फेरीअंती रिक्त राहिल्यास पहिल्या फेरीनंतर अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महविद्यालयांना उर्वरीत जागा प्रत्यार्पित करण्याची मुभा असेल. परंतु, दूस-या फेरीच्या वेळी अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाकरीता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील व तदनंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारण मध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा महाविद्यालयांना असेल. तथापि, उर्वरीत जागा प्रत्यार्पित करणे पुर्णतः ऐच्छिक असून कोणत्याही अल्पसंख्याक संस्थेवर बंधनकारक नसेल.
भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल. या कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील, अल्पसंख्यांक विभागाच्या दिनांक १८/०६/२०१४ च्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश करताना त्या-त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत. त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील. अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शाळा/उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जागा या केवळ गुणवत्तेनुसार भरण्यात येतील.
असे वाचावे.
सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०६२३१७५४११०२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
उप सचिव, महाराष्ट्र शासन.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांकः प्रवेश १२२५/प्र.क्र-१६/ एसडी – २
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई