Registration Of Players And Sports Organizations Krida e Prman
Registration Of Players And Sports Organizations Krida e Prman
Regarding the registration of players and sports organizations through the Blockchain technology-based “Sports e-Certificate” system for the implementation of 5% reservation under the Sports Policy and effective implementation of the government decision.
क्रमांक: खेआ/क्रीडा ई-प्रमाण/२०२५-२६/का-१५/८५२९
दिनांक: १४ जानेवारी, २०२६
विषयः क्रीडा धोरणांतर्गत ५% आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ब्लॉकचेन (Blockchain) तंत्रज्ञानावर आधारित “क्रीडा ई-प्रमाण” प्रणालीवर खेळाडू व क्रीडा संघटनांची नोंदणी करणे व शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.
संदर्भ:
१) शासन निर्णय क्रमांक:- SD-१२०१६/५/२०२५ (ई-१४६७३५७/क्रीयुसे-२, दिनांक ०८ जानेवारी, २०२६.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक, जलद आणि त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, या उद्देशाने शासनाने संदर्भाधीन शासन निर्णयान्वये (प्रत संलग्न) ‘ब्लॉकचेन (Blockchain) व ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार जुनी कागदपत्रांवर आधारित पडताळणी प्रक्रिया बंद करून, पूर्णतः डिजिटल “क्रीडा ई-प्रमाण” प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
सदर शासन निर्णयाची आपल्या कार्यक्षेत्रात काटेकोर अंमलचजावणी करण्यासाठी आणि या प्रणालीचा लाभ तळागाळातील खेळाडूंपर्यंत पोहोचवण्यासाठी, खालीलप्रमाणे कार्यवाही (Standard Operating Procedure) आपल्या स्तरावरून तातडीने करण्यात यावी:
१. क्रीडा संघटनांबाबत व अनिवार्य कार्यवाही (Mandatory Action for Associations):
सर्व अधिकृत क्रीडा संघटनांनी शासन निर्णयातील तरतुदींची तात्काळ माहिती घ्यावी.अभिलेख जतन (Data Archival): स्पर्धा संपन्न झाल्यापासून ०७ दिवसांच्या (Calendar Days) strct, स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी आणि गुणपत्रिका विहित नमुन्यात (xlsx फाईल) “क्रीडा ई-प्रमाण पोर्टल”
https://sports.maharashtra.gov.in
वर अपलोड करण्यासाठी संचालनालयास सादर करणे संघटनांवर बंधनकारक राहील.
डिजिटल स्वाक्षरीः सदर माहिती संबंधित संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्याने डिजिटल स्वाक्षरीने (DSC) प्रमाणित करणे आवश्यक आहे.
दंडात्मक तरतूदः जी संघटना विहित ७ दिवसांच्या मुदतीत माहिती ब्लॉकचेनवर अपलोड करणार नाही, अशा परिस्थितीत खेळाडूंचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संघटनेची राहील, याची नोंद घ्यावी.
२. खेळाडूंच्या नोंदणी प्रक्रियेबाबत (Player Registration):
संघटनेमार्फत सर्व खेळाडूंना नवीन प्रणालीबाबत अवगत करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
खेळाडूंनी ‘फ्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर आपल्या आधार-संलग्न (Aadhaar-linkad) आयडीद्वारे लॉग-इन करून नोंदणी करणे अनिवार्य आहे.
खेळाडूंनी सादर केलेली माहिती आणि संघटनेने ब्लॉकचेनवर अपलोड केलेला अभिलेख हॅश’ (Record Hash) यांची प्रणालीद्वारे स्वयंचलित पडताळणी होईल. त्यामुळे खेळाडूंना यापुढे पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात जाण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही, ही बाब स्पष्ट करावी.
प्रचार व प्रसिद्धीः स्थानिक वर्तमानपत्रे, समाजमाध्यमे या नवीन निर्णयाची माहिती प्रदर्शित करावी.
४. अपीलिय तरतूदः
जर तांत्रिक कारणास्तव एखाद्या खेळाडूचे प्रमाणपत्र नामंजूर झाल्यास, तक्रार करण्याची व तक्रारी नंतरही खेळाडुस प्रमाणपत्र न मिळाल्यास ३० दिवसांच्या आत ऑनलाइन अपील करण्याची सुविधा उपलब्ध आहे, याची माहिती द्यावी.
सदर शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, ५% आरक्षणाच्या लाभाशी निगडीत असल्याने याबाबतधी संपूर्ण माहिती सर्व संबंधितांपर्यंत पोहचेल याची दक्षता घ्यावी.
आयुक्त,
क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.

महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
शिवछत्रपती क्रीडा संकुल, नहाळुंगे-बालेवाडी, पुणे-४११०४५
https://sports.maharashtra.gov.in
dehqdsys-mh@gov.in & desk15.dsys-mh@gov.in