Krida e Praman Pranali Portal
Krida e Praman Pranali Portal
Regarding approval to develop a “Sports e-Certificate” system incorporating ‘Blockchain’ technology for the implementation of 5% reservation under the Sports Policy.
क्रीडा धोरणांतर्गत ५% आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ‘ब्लॉकचेन’ (Blockchain) तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून “क्रीडा ई-प्रमाण” प्रणाली विकसित करण्यास मान्यता देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक :- SD-१२०१६/५/२०२५ (ई- १४६७३५७)/ क्रीयुसे-२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ०८ जानेवारी, २०२६
१) शासन निर्णय क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक ०१ जुलै, २०१६
२) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १७१६/प्र.क्र.१८/क्रीयुसे-२, दिनांक ३० जून, २०२२
३) शासन निर्णय ई नस्ती क्र. १२१६३९७/SESD-३८०१५/५/२०२५/क्रीयुसे-२, दिनांक ०५ सप्टेंबर, २०२५
वाचा :
४) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे पत्र क्र. खेआ/ब्लॉकचेन/२०२५-२६/का-१६, दि.१४ नोव्हेंबर, २०२५.
प्रस्तावना :-
राज्यातील खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ सुलभतेने व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दि.३० जून २०२२ व दि.०५ सप्टेंबर, २०२५ अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तथापि, सदर प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी, बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी आणि पडताळणी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी “क्रीडा ई-प्रमाण” ही एकात्मिक प्रणाली “कृत्रिम बुद्धिमत्ता” (Artificial Intelligent) व ‘ब्लॉकचेन (Block Chain) आधारित विकसित केली आहे. त्यानुसार, शासन निर्णय दिनांक ३० जून २०२२ मधील परिच्छेद क्रमांक ५ मध्ये तसेच शासन निर्णय दिनांक ०५ सप्टेंबर, २०२५ अन्वये केलेल्या सुधारणा रद्द करून, त्याऐवजी सुधारित तरतुदी समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय/निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीतील ५ टक्के खेळाडू आरक्षण क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी, बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी आणि पडताळणी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन ‘ब्लॉकचेन (Block Chain) आधारित “क्रीडा ई-प्रमाण” प्रणालीचा वापर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे शासन निर्णय दिनांक ३० जून २०२२ व दिनांक ०५ सप्टेंबर, २०२५ मध्ये समावेश करण्यात आलेला परिच्छेद क्रमांक ५ रद्द करून, त्याऐवजी खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे :-
“क्रीडा ई-प्रमाण” प्रणालीद्वारे प्रमाणपत्र पडताळणीची सुधारित कार्यपद्धती
- क्रीडा संघटना आणि स्पर्धा आयोजकांची जबाबदारी (Data Archival on Blockchain): १) राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सर्व अधिकृत क्रीडा संघटनांनी, स्पर्धा संपन्न झाल्यापासून ०७दिवसांच्या (Calendar Days) आत, स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी आणि गुणपत्रिका क्रीडा विभागाच्या विहित “क्रीडा ई-प्रमाण पोर्टल” वर अपलोड करण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट- अ व ब नुसार सर्व कागदपत्रे व सत्यता प्रमाणपत्रासह आणि संबंधित स्पर्धेचा अंतिम निकाल xlxs या फाईलमध्ये सादर करणे बंधनकारक राहील.
२) सदर माहिती सादर करताना संबंधित संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्याने आपल्या डिजिटल स्वाक्षरीने (DSC) / हस्ताक्षराद्वारे ती प्रमाणित करणे आवश्यक आहे.
३) एकदा ही माहिती क्रीडा युवक सेवा संचालनालयाच्या (https://sports.maharashtra.gov.in/) पोर्टलवर अपलोड झाली की, प्रणालीमधील “स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट” (Smart Contract) द्वारे या माहितीचा “क्रिप्टोग्राफिक हॅश” (Cryptographic Hash) तयार होऊन तो ब्लॉकचेनवर कायमस्वरूपी (Immutable) जतन केला जाईल.
४) दंडात्मक तरतूदः जर एखाद्या संघटनेने ०७ दिवसांच्या विहित मुदतीत अभिलेख ब्लॉकचेनवर अपलोड करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयास सादर केले नाहीत. तर “स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट” द्वारे सदर संघटनेला स्वयंचलितरित्या (Automatically) “डिफॉल्टर” यादीत टाकले जाईल आणि जोपर्यंत अभिलेख अपलोड होत नाहीत, तोपर्यंत होणा-या खेळाडूंच्या नुकसानीसाठी संघटना जबाबदार राहील.
॥ खेळाडूने करावयाची कार्यवाही (Digital Application Process):
१) खेळाडूने क्रीडा स्पर्धांमधील प्रावीण्य प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या
https://sports.maharashtra.gov.in
“क्रीडा ई-प्रमाण” पोर्टलवर आपल्या आधार-संलग्न (Aadhaar-linked) आयडीद्वारे लॉग-इन करावे.
२) खेळाडूने आपल्या स्पर्धेचे तपशील भरून पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा. ३) खेळाडूने सादर केलेली माहिती आणि संघटनेने ब्लॉकचेनवर जतन केलेला “अभिलेख हॅश” (Record Hash) यांची प्रणालीद्वारे स्वयंचलित पडताळणी (Automated Verification) होईल. यासाठी कोणत्याही विभागीय कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.
४) खेळाडू उमेदवाराने भरतीपूर्वी वरील पडताळणीद्वारे सादर केलेले पडताळणी प्रमाणपत्र कुठल्याही तांत्रिक व प्रशासकीय कारणामुळे अवैध ठरले, अशा परिस्थितीत जर सदर उमेदवाराकडे त्याव्यतिरीक्त भरतीप्रक्रिये पूर्वीच्या (भरती अर्ज सादर करण्याच्या दिनांका पूर्वी) कालावधीतील अन्य प्रमाणपत्र/प्रमाणपत्रे असतील तर उमेदवाराने अशी
प्रमाणपत्र/प्रमाणपत्रे क्रीडा ई-प्रमाण प्रणालीद्वारे पडताळणी करुन नियुक्ती प्राधिका-यांकडे सादर करावीत. संबंधित नियुक्ती प्राधिका-याने उमेदवाराने सादर केलेले सदर प्रमाणपत्र QR कोड (Quick Response Code) मार्फत पडताळणी करुन वैध असल्याची खात्री करावी.
।।। उपसंचालक (मुख्यालय/प्रशासन) यांची भूमिका व प्रमाणपत्राची वैधताः
१) “क्रीडा ई-प्रमाण” प्रणालीद्वारे स्वयंचलितरित्या पडताळले गेलेले प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे अधिकार उपसंचालक (मुख्यालय), क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांना राहतील. यामुळे पडताळणी प्रक्रियेचे केंद्रीकरण होऊन एकसमानता येईल.
२) डिजिटल स्वाक्षरीः सदर प्रमाणपत्रावर माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act, २०००) च्या कलम ५ अन्वये वैध असलेली उपसंचालक (मुख्यालय), क्रीडा व युवक सेवा यांची डिजिटल स्वाक्षरी असेल.
३) QR कोड पडताळणीः- प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय QR कोड (Quick Response Code) असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा इतर कोणत्याही नियुक्ती प्राधिकाऱ्याने हा कोड स्कॅन केल्यास, त्यांना ब्लॉकचेनवरील मूळ नोंदीशी पडताळणी करता येईल. हे डिजिटल प्रमाणपत्र QR कोड (Quick Response Code) मार्फत पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकरणाची राहील.
IV पडताळणी अहवाल आणि कालमर्यादा (Instant Verification Protocol):
१) ब्लॉकचेन आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट तंत्रज्ञानामुळे, माहितीची जुळवणी झाल्यास, खेळाडूस त्याचा “डिजिटल पडताळणी अहवाल” अर्ज केल्यानंतर तत्काळ किंवा कमाल २४ तासांच्या
आत (किंवा तत्त्वकाळ) ऑनलाइन उपलब्ध होईल.
V. अपीलिय तरतूद (Blockchain-based Appeal Mechanism):
१) जर तांत्रिक कारणास्तव किंवा माहितीच्या तफावतीमुळे प्रमाणपत्र नामंजूर (Reject) झाल्यास, खेळाडूस ऑनलाइन अपील करण्याची सुविधा असेल. यासाठी कमाल ३० दिवसांची कालमर्यादा राहील.
२) प्रथम अपील सहसंचालक (क्रीडा) आणि द्वितीय अपील आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे ऑनलाइन सादर करता येईल.
३) अपीलावरील निर्णय आणि सुनावणीचा तपशील देखील ब्लॉकचेनवर नोंदवला जाईल (On-chain recording), जेणेकरून भविष्यात यात कोणताही फेरफार करता येणार नाही.
२. या प्रमाणपत्र पडताळणीस “क्रीडा ई-प्रमाण” असे संबोधण्यात येईल.
३. खेळाडूने अ/ब/क/ड गटातील संवर्गाकरीता आवश्यक असलेल्या क्रीडा अर्हतेनुसार संबंधित पदाच्या भरतीसाठी जाहिरात आल्यास अर्ज करताना सदर क्रीडा ई-प्रमाणपत्राची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी. अर्जासोबत क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत असल्याशिवाय खेळाडूच्या अर्जाचा खेळाडू संवर्गातून विचार होणार नाही.
४. यापुढे, लोकसेवा आयोग तसेच अन्य सर्व पदभरतीसाठी सदर कार्यपध्दती लागू राहील.
५. सदर प्रक्रिया नियमानुसार ५% खेळाडू आरक्षणास पात्र ठरणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व खेळाडू, संबंधित क्रीडा संघटना व सर्व संबंधितांवर बंधनकारक राहील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०१०८१६०२२५६०२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन
