राष्ट्रीय एकता दिना निमित्त प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Rashtriya Ekta Diwas Quiz With Certificate

Rashtriya Ekta Diwas Quiz With Certificate

Rashtriya Ekta Diwas Quiz With Certificate

Sardar Vallabhbhai Patel

National Unity Day

Iron Man of India

Celebration of Rashtriya Ekta Diwas on 31st October 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरदार वल्लभभाई पटेल
सरदार वल्लभभाई पटेल, एक नाव ज्यांनी स्वातंत्र्यानंतर भारताच्या अखंडतेसाठी अपार प्रयत्न केले. ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे पटेल यांनी फक्त स्वातंत्र्यलढ्यातच नव्हे, तर स्वतंत्र भारताच्या बांधणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ साली झाला.

हे माहित आहे का तुम्हाला प्रतिवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दि.३१ ऑक्टोबर या जन्मदिवसापासून एक आठवडा (दि. ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर) या कालावधीत “दक्षता जनजागृती सप्ताहाचे” (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे. मग या सबंधी अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

राजकीय निर्णयांमध्ये त्यांनी कधीही दबावाला बळी पडले नाही. त्यांच्या साधेपणाने आणि स्पष्टवक्तेपणाने ते लोकांच्या हृदयात स्थान मिळवू शकले. त्यांनी लंडनला जाऊन बॅरिस्टरचे शिक्षण घेतले आणि परत आल्यावर अहमदाबादमध्ये वकिली सुरू केली. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या वल्लभभाईंनी आपले यशस्वी वकिलीचे करिअर सोडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील पहिले आणि मोठे योगदान १९१८ च्या खेडा लढ्यात होते. त्यावेळी खेड्यात दुष्काळ पडला होता आणि ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांना करात सवलत देण्यास नकार दिला होता. पटेल यांनी या चळवळीचे नेतृत्व केले आणि वकिली सोडून सामाजिक जीवनात प्रवेश केला. जेव्हा १९२८ मध्ये दुष्काळ आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाढीव करांच्या विरोधात वल्लभभाई यांनी बारडोली सत्याग्रह येथे केलेल्या आंदोलनामुळे त्यांना ‘सरदार’ ही पदवी मिळाली.

हे ही वाचाल माहित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

भारताला स्वातंत्र्य लढ्‌यात वल्लभभाई पटेल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यासह लोकांमध्ये दारूबंदी, अस्पृश्यता आणि महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढ्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. हिंदू-मुस्लिम ऐक्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटीशांशी दोन हात करताना ते अनेकवेळा तुरुंगात गेले पण सरदार पटेलांच्या जिद्दीपुढे ब्रिटिश सरकारला नमते घ्यावे लागले. राजकोट, जुनागढ, वहालपूर, बडोदा, काश्मीर, हैदराबाद ही मूळ राज्ये भारतीय संघराज्यात समाविष्ट करताना सरदारांना अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागला. सरदारांनी भारतातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी आणि वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. 

वल्लभभाई हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी, गांधी स्मारक निधीची स्थापना, कमला नेहरू रुग्णालयाची रचना इत्यादी सरदार पटेल यांची ऐतिहासिक कामे सदैव स्मरणात राहतील. गोव्याचे भारतात विलीनीकरण करण्याची त्यांची इच्छा किती तीव्र होती याचे हे उदाहरण पुरेसे आहे. देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय प्रशासकीय सेवा महत्त्वाची भूमिका बजावतील, ही सरदार पटेल यांची दूरदृष्टी होती. त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा मजबूत करण्यावर भर दिला. त्यांनी नागरी सेवांना स्टील फ्रेम म्हटले.

भारताच्या संविधान सभेचे ज्येष्ठ सदस्य असल्याने, सरदार पटेल हे संविधानाला आकार देणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. ते प्रांतीय घटना समित्यांचे अध्यक्ष होते. १५ डिसेंबर १९५० रोजी त्यांचा मृत्यू झाला. सरदार पटेल यांना मृत्यूनंतर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरदार पटेल यांना देशाच्या एकात्मतेचा शिल्पकार म्हटले जाते. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस ‘एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

सरदार पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे. गुजरातमधील नर्मदेच्या सरदार सरोवर धरणासमोर सरदार पटेल यांचा १८२ मीटर उंच लोखंडी पुतळा ( स्टॅच्यू ऑफ युनिटी ) बांधण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी हा पुतळा राष्ट्राला समर्पित करण्यात आला होता.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एकसंध ठेवण्यासाठी आणि एक स्थिर राष्ट्र घडवण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचे नेतृत्व आणि त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. ते फक्त एका युगापुरते मर्यादित राहिलेले नेते नव्हते, तर आजच्या पिढीसाठीही मार्गदर्शक आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती निमित विनम्र अभिवादन!

राष्ट्रीय एकता दिना निमित्त प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve Rashtriya Ekta Diwas Quiz With Certificate Quiz and get attractive certificate instantly
Rashtriya Ekta Diwas Quiz With Certificate

राष्ट्रीय एकता दिना निमित्त प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve Rashtriya Ekta Diwas Quiz and get attractive certificate instantly

0%
0 votes, 0 avg
1153
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

Rashtriya Ekta Diwas

राष्ट्रीय एकता दिना निमित्त प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve Rashtriya Ekta Diwas Quiz With Certificate Quiz and get attractive certificate instantly

Rashtriya Ekta Diwas Quiz With Certificate
Rashtriya Ekta Diwas Quiz With Certificate

1 / 16

1. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कधी झाला कधी झाला ?

2 / 16

2. सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे कितवे गृहमंत्री होते?

3 / 16

3. सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे कितवे उपपंतप्रधान उपप्रधान होते ?

4 / 16

4. सरदार वल्लभ भाई पटेल 'आयर्न मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जातात

5 / 16

5. ......................... यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली

6 / 16

6. सरदार वल्लभ भाई पटेल यांचे स्वातंत्र्य लढ्यातील पहिले मोठे योगदान ................. या सत्याग्रहात होते

7 / 16

7. ...................... येथे केलेल्या आंदोलनामुळे वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी मिळाली

8 / 16

8. मुत्सद्येगिरी आणि वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली म्हणूनच ते भारताचे .................  म्हणून ओळखले जातात

9 / 16

9. सरदार पटेल यांनी नागरी सेवांना स्टील फ्रेम म्हटले आहे

10 / 16

10. भारतीय संविधान सभेमध्ये सरदार पटेल ............... घटना समितीचे अध्यक्ष होते

11 / 16

11. सरदार पटेल यांना देशाच्या .............. चा शिल्पकार म्हटले जाते

12 / 16

12. सरदार पटेल यांचा जन्मदिवस ................ दिवस म्हणून साजरा केला जातो

13 / 16

13. सरदार पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा गुजरात मधील नर्मदेच्या सरदार सरोवर धरणासमोर आहे

14 / 16

14. सरदार पटेल यांचा ................. मीटर उंच लोखंडी पुतळा बांधण्यात आलेला आहे

15 / 16

15. सरदार पटेल यांचा पुतळा .................. ला राष्ट्राला समर्पित करण्यात आला

16 / 16

16. सरदार वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू कधी झाला ?

Your score is

0%

4 thoughts on “राष्ट्रीय एकता दिना निमित्त प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Rashtriya Ekta Diwas Quiz With Certificate”

Leave a Comment

error: Content is protected !!