Rashtriya Antral Diwas
Rashtriya Antral Diwas Upkram SCERT GUIDELINES
National Space Day 2024 राष्ट्रीय अंतराळ दिवस
जा.क्र.रा.शै.सं.व प्र.प.म/विवि/NSD/२०२४/०३९२१
दि.२१/०८/२०२४
विषय :- दि. २३/०८/२०२४ रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२४ च्या आयोजनाबाबत…
उपरोक्त संदर्भिय विषयांन्वये माननीय पंतप्रधानांनी घोषित केल्याप्रमाणे, भारत सरकारने ‘शिवशक्ती येथे विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सहज लँडिंग पूर्ण करणाऱ्या चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाच्या स्मरणार्थ दरवर्षी दि.२३ ऑगस्ट हा “राष्ट्रीय अंतराळ दिवस” घोषित केला आहे. भारताच्या राजपत्रात दि.२३/०८/ २०२४ रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्याबाबतची घोषणा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (परिशिष्ट-१).
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांनी शाळा, प्रशिक्षण संस्था आणि अध्यापन विद्यालयामध्ये खालील विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्याविषयी पत्रात नमूद केले आहे.
1. गेल्या वर्षी चांद्रयानावर आधारित १० इयत्ता निहाय विशेष मॉड्यूल्स Chandrayan Utsav Modules
LINK या पोर्टलवर उपलब्ध आहेत. NCERT च्या
या विशेष मॉड्यूल्सचे १३ प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. हे स्पेशल मॉड्यूल्स विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात यावेत. विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच
दि. २३/०८/२०२४ रोजी
या युट्युबच्या चॅनेलवरील राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२४ शी संबंधित सर्व व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावेत
॥. सर्व शाळा/प्रशिक्षण संस्थांमध्ये दि. २३/०८/२०२४ रोजी चांद्रयान मॉड्युल्स, ISRO चे अंतराळ मोहिमेत मिळवलेले यश उदा. आदित्य, अवकाश तंत्रज्ञान इत्यादीं विषयांवर आधारित विशेष प्रशिक्षण / कार्यशाळा/प्रात्यक्षिक / व्याख्यान आयोजित करण्यात यावेत.
III. भारत ऑन द मून पोर्टल गेल्या वर्षी लाँच करण्यात आले होते. NCERT च्या वेबसाईटवर लवकरच अंतराळ (Space) या थीमवर आधारित ई-मासिक प्रकाशित करण्यात येणार आहे. ई-मासिक जास्तीत जास्त शाळा/विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावे.
IV. ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अंतराळ या थीमवर आधारित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळांनी एखाद्या तज्ञ व्यक्तीला आमंत्रित करण्यात यावेत.
V. सर्व शाळांमध्ये अंतराळ या थीमवर आधारित प्रतिकृती बनवणे, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. तसेच, शाळांनी चांद्रयान आणि इतर अंतराळाशी संबंधित मोहिमेत मिळवलेले यश जसे की आदित्य इत्यादींवर आधारित इयत्ता निहाय उपक्रम (उदा. प्रश्नमंजुषा इ.) आयोजित करण्यात यावेत. शाळांनी शिक्षक/ विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि अंतराळ (Space) संबंधी आवड आणि जाणीवजागृती वाढवण्यासाठी शिक्षक/विद्यार्थी यांची २ मिनिटाची रील बनवावी/२ मिनिटांचा व्हिडीओ बनवावा.
चांद्रयान ३ प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
अंतराळ विभागाकडून (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) क्युरेटेड ऑडिओ-व्हिज्युअल साहित्य DIKSHA. NISHTHA, PME विद्या चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे.
आपल्या देशातील राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२४ च्या शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यामध्ये अंतराळाच्या संशोधनाबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमामध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा जास्तीत जास्त सहभागी होतील, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सहभागी शाळांची, विद्यार्थ्यांची सांख्यिकीय माहिती तसेच राबवलेल्या उपक्रमांचे स्वरूप या मुद्द्यांच्या आधारे माहितीचे संकलन करून एकत्रित जिल्ह्याचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) जिल्हा परिषद, (सर्व जिल्हे) यांनी दि.२४/०८/२०२४ पर्यंत विज्ञान विभागाच्या
या ईमेलवर सादर करावा. सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२४ च्या उपक्रमांचे आयोजन आणि माहिती वेळेत परिषदेला उपलब्ध होईल या दृष्टीने विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग) यांनी संबंधिताना आवश्यक त्या सूचना देऊन वेळोवेळी याबाबत आढावा व पाठपुरावा करावा. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठवावा.
यादृष्टीने आपल्या स्तरावरून आवश्यक कार्यवाही करावी.
उपरोक्त परिपत्रक पीडीएफ मध्ये डाउनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
(डॉ. कमलादेवी आवटे)
उपसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग),
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व जिल्हे),
शिक्षणाधिकारी (प्राथ.) / (माध्य), (सर्व जिल्हे),
शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) मुंबई,
शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी (सर्व म.न.पा./न.पा.),
संदर्भ :- स्कूल शिक्षा आणि साक्षरता भवन, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचा दि. १४/०८/२०२४ चा मेल विभागास प्राप्त दि. १९/०८/२०२४