Property And Liabilities Statements Forms PDF
Property And Liabilities Statements Forms PDF
Matta v Dayitve varshik vivaran prapatra PDF shasan nirnay
Statement of Assets and Liabilities Statement of Immovable Assets Statement of Movable Assets GR
Property and Liability Statement pdf
Government decisions and forms regarding submission of annual statements of assets and liabilities PDF
मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणे सादर करण्याबाबत शासन निर्णय व प्रपत्रे पीडीएफ
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांकः वशिअ १२१४/प्र.क्र.२६/११,मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : २ जून, २०१४
संदर्भ –
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीडीआर-१०८५/२५७९/४६/अकरा, दिनांक १५ जुलै, १९८६.
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीडीआर-१०८७/१७८१/५०/अकरा, दिनांक २४ नोव्हेंबर, १९८८.
३) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः सीडीआर-१००१/८१४/प्र.क्र.१४/०१/ अकरा, दिनांक ०९ जानेवारी, २००२.
शासन निर्णय
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १९ च्या पोटनियम (१) व त्याखालील टीप ३ अनुसार प्रत्येक शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याने (गट-ड मधील कर्मचारी वगळता) कोणत्याही सेवेतील/पदावरील आपल्या प्रथम नियुक्तीच्या वेळी व त्यानंतर शासन विहित करेल त्या-त्या वेळी विहित नमुन्यामध्ये आपले मत्ता व दायित्व याबाबतचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे. सदर विवरण सादर करण्याबाबत संदर्भाकित शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचना अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे सुधारीत सूचना देण्यात येत आहेत :-
(1) प्रथम नियुक्तीच्या वेळी सादर करावयाचे विवरण :-
प्रत्येक राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्याने (गट-ड मधील कर्मचारी वगळता) राज्य शासनाच्या सेवेतील कोणत्याही पदावरील नियुक्तीद्वारे होणाऱ्या त्याच्या प्रथम सेवा प्रवेशाच्या वेळी, अशा नियुक्तीच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या कालावधीत त्याची स्वतःची मत्ता व दायित्वे याबद्दलची विवरणे या निर्णयास जोडलेल्या प्रपत्र एक, दोन व तीन या तीन प्रपत्रांमध्ये [म्हणजे (अ) अचल मालमत्तेचे विवरण, (ब) चल मालमत्तेचे विवरण आणि (क) कर्जे व इतर दायित्वे याबद्दलचे विवरण शासनास सादर करावीत. या निर्णयाच्या दिनांकास राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या व यापूर्वी याप्रमाणे विवरण सादर केलेले नसेल अशा सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी असे विवरण दिनांक ३० जून, २०१४ किंवा त्यापूर्वी सादर करावे.
(II) त्यानंतर सादर करावयाचे नियतकालिक विवरण :-
शासन सेवेतील प्रथम नियुक्तीच्या वेळी सादर करण्यात आलेल्या विवरणाच्या नंतर प्रत्येक शासकीय अधिकारी/कर्मचारी (गट-ड मधील कर्मचारी वगळता) या निर्णयास जोडलेल्या प्रपत्र-१, प्रपत्र-२ व प्रपत्र-३ मध्ये त्याच्या मालमत्तेचे विवरण यापुढे प्रत्येक वर्षी सादर करेल. असे पहिले विवरण दिनांक ३१ मार्च, २०१४ च्या स्थितीस अनुसरुन दिनांक ३० जून, २०१४ पूर्वी सादर करण्यात यावे.
तसेच, यानंतर प्रत्येक वर्षी त्या-त्या वर्षाच्या ३१ मार्चच्या स्थितीस अनुसरुन मालमत्तेचे विवरण सोबतच्या प्रपत्र-१, प्रपत्र-२ व प्रपत्र-३ मध्ये विहित नमुन्यात त्या वर्षाच्या ३१ मे पर्यंत सादर करावे.
२. ही विवरणे, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या नियम १९ खालील स्पष्टीकरण (२) मध्ये स्पष्ट केलेल्या विहित प्राधिकाऱ्यांकडे शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी पुढीलप्रमाणे सादर करावीत:-
(1) गट-अ च्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत, कार्यालय प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्याद्वारे शासनाकडे सादर करावीत.
(10) गट-ब च्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत, ज्या कार्यालयात विवरण सादर करण्याच्या वेळी ते काम करीत असतील त्या कार्यालयाच्या प्रमुखांच्या द्वारे विभागप्रमुखांकडे सादर करावीत.
(iii) गट-क च्या कर्मचाऱ्यांनी आपली विवरणे, विवरण सादर करण्याच्या वेळी ते ज्या विभागात /कार्यालयात काम करीत असतील कार्यालयाच्या प्रमुखाकडे सादर करावीत.
३. संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी ही विवरणे सीलबंद लिफाफ्यात सादर करावीत. ही विवरणे प्राप्त झाल्यानंतर विहित प्राधिकारी ती स्वतःच्या ताब्यात ठेवील.
४. विवरणपत्रे सादर न करणे व विलंबाने सादर करण्याचे परिणाम :-
(अ) या आदेशाप्रमाणे कोणतेही विवरण विहित कालावधीत सादर न केल्यास ती गैरवर्तणूक मानण्यात येईल व अशा गैरवर्तणूकीबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.
(ब) अशाप्रकारची त्या त्या वर्षाची वार्षिक मालमत्ता विवरणपत्रे सादर केली असणे ही राज्य शासनामधील सर्व टप्प्यांवरील पदोन्नती, आश्वासित योजनेअंतर्गतच्या पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दौरा यासाठी पूर्वअट म्हणून विहित करण्यात येत आहे. परिणामी कोणत्याही अधिकारी / कर्मचाऱ्यास आश्वासित व नियमित पदोन्नतीचा लाभ देण्यापूर्वी किंवा प्रतिनियुक्तीस अनुमती देण्यापूर्वी तसेच, कार्यालयीन विदेश दौऱ्यास अनुमती देण्यापूर्वी त्याने त्या वर्षाचे ३१ मार्च रोजीचे मालमत्ता विवरणपत्र सादर केले नसल्यास त्यांना पदोन्नती / आश्वासित योजनेतील पदोन्नती देण्यात येऊ नये व अशी विवरणपत्रे सादर केल्यानंतरच त्यांना पदोन्नती दिली जाईल, असे पहावे. तसेच, असे विवरणपत्र सादर केले नसेल तर त्यास प्रतिनियुक्ती किंवा विदेश दौऱ्यास अनुमती देण्यात येऊ नये.
एखाद्या ५. ाद्या विशिष्ट प्रकरणामध्ये शासकीय कर्मचाऱ्याची सचोटी संशयास्पद आहे आणि/किंवा त्याने त्याच्या ज्ञात उत्पन्नाचा विचार करता, अपसंपदा साठविली आहे अशी विहित प्राधिकाऱ्याची खात्री झाली तर अशाप्रकरणी मंजूरी आदेश, प्रतिवेदने इत्यादी अभिलेखाच्या आधारे असा प्राधिकारी कर्मचाऱ्याच्या विवरणाची छाननी केव्हाही करु शकेल आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी सुद्धा करुन घेऊ शकेल. चौकशीच्या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागास ही विवरणे पाहिजे असतील तेव्हा ती उपलब्ध करुन दिली जातील.
६. सर्व शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून (गट-ड मधील कर्मचारी वगळता) नियत दिनांकापर्यंत त्यांचे मत्ता व दायित्व विवरणपत्रे प्राप्त होऊन ती अभिलेखावर ठेवली जातील याची जबाबदारी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांची असेल. प्रतिनियुक्तीवर असलेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याबाबतीत त्यांच्या मूळ विभागातील प्राधिकारी (Cadre Controlling Authority) संबंधित मत्ता व दायित्व विवरणपत्रे मिळवून ती अभिलेखावर ठेवण्यास जबाबदार राहतील.
सदर आदेश शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०१४०६०२१४५५३४६५०७ असा आहे. हे आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सोबत शासन निर्णय व विहित प्रपत्र पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे फक्त या ओळीला स्पर्श करा
Bhagwan Sahai
Digitally signed by Bhagwan Sahai – AllIndia Service
ou-IAS, postalCode=400032, st-Maharashtra, cn=Bhagwan Sahai
Date: 2014.06.03 12:20:53 +0530
(डॉ. भगवान सहाय) प्रधान सचिव (सेवा)
