Prohibition Orders Issued On Paper Tea Cups Which Cause Diseases Like Cancer
Prohibition Orders Issued On Paper Tea Cups Which Cause Diseases Like Cancer
BSN On Paper Tea Cups Which Cause Diseases Like Cancer Prohibition Orders Issued
Government order to ban paper tea cups. Outbreak of cancer from paper cups.
ban on paper tea cups due to causes of cancer
विषयः- कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभुत ठरत असलेल्या चहाच्या कागदी कपावर बंदीचे आदेश निर्गमित करणेबाबत.
संदर्भः- सय्यद रफिक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांचे निवदेन दिनांक २३/१२/२०२४
उपरोक्त संदर्भिय विषयी सय्यद रफिक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांनी या कार्यालयात निवेदन सादर केले असून, देशासह राज्यात कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाण जास्त वाढत आहे या आजाराना कारणीभुत ठरत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर बंदीचे आदेश निर्गमित करण्यात यावे. परभणी जिल्हयात चहाच्या कागदी कणंचा उपयोग अधिक प्रमाणात केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्याअर्थी चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग केला जातो कागदी कपात गरम चहा टाकल्यावर कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिकचे कण वितळते व प्लास्टिकचे कण पोटात जातात. त्यामुळे कॅन्सर सारखा आजार होउ शकतो असे नमूद आहे.
सबब, मा. जिल्हाधिकारी यांच्या पृष्ठांकनानुसार कार्यवाही करावी ही विनंती.
(संगिता चव्हाण)
उपजिल्हाधिकारी, सा.प्र. जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी
कागदी चहाच्या कपावर बंदी चा शासकीय आदेश. कागदी कपामुळे “कॅन्सर” रोगाचा प्रादुर्भाव
Government order to ban paper tea cups. Outbreak of cancer from paper cups.
जिल्हाधिकारी कार्यालय. बुलढाणा (स्थानिक निधी विभाग) बुलढाणा क्र. कावि/स्था.निधी/कक्ष९.४/४/३/२०२४दिनांक: 7/ ११ /२०२४
प्रति,सर्व विभाग प्रमुख
विषय : कॅन्सर सारख्या आजरांना कारणीभुत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरीत बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करुन कार्यवाही करणेबाबत.
संदर्भ :- अॅड. सतीषंचंद्र दि. रोटे पाटील व इतर यांचे निवेदन जा.क्र.आ.हिं.सं.म/कार्या/८७/२४ दि.७/१०/२४
उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॉस्टीकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाच्या कागदी कांवर बंदी घालण्याबाबत संदर्भिय पत्रात नमुद केले आहे.त्याअनुषंगाने संदर्भिय अर्जाची प्रत पुढील कार्यवाहीकरिता यासोबत सहपत्रित करण्यात येत आहे. त्यानुसार संदर्भिय अर्जात नमुद मुद्यांचे अनुषंगाने नियमाप्रमाणे उचित कार्यवाहीबाबत आपल्या अधिनस्त असलेलें सर्व शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, सार्वजनिक संस्था ई. • कार्यालयांना आपले स्तरावरून कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास व संबंधित अर्जदारास कळविण्यात यावे.
जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा
☕
१५ डिसेंबर जागतिक चहा दिन
पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा. भारता, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. चहाला जगभर पार्टीचं स्वरूप आलेले आहे. चीन मध्ये ‘गॉमफाय’ टी सेरीमनी असते. मुद्दाम मातीच्या भांड्यात चहा देतात. त्याला थिक्सिंग टी पॉट म्हणतात. आजही आपल्या वधू-वर संशोधनाच्या वेळेस वाफाळलेला चहा आणि पोहे पार्टी असते. जपानमध्ये चहा सादर करणे ही कला आहे. आज जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. चहा हे थंड पेय देखील आहे. थंड चहाचे पण अनेक प्रकार आहेत. लेमन, ऑरेंज, पायनापल, स्ट्रॉबेरी. विड्याच्या पानांचा रस घालून थंड चहा करता येतो. ग्रीन टी हे आजकाल हेल्थ ड्रिंक म्हणून खूप प्रसिद्ध झालं आहे. ग्रीन टी हे एक नैसर्गिक फॅट बर्नर असून त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. चहा बद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करड्या रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते.
मोगली चहा
साहित्य- चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहा पावडर, एक कप दूध, जायफळ, जायपत्री, वेलदोडा लवंग केशर ह्यंची पूड प्रत्येकी पाच चमचा.
कृती- पाणी आणि साखर उकळवून घ्यावे. त्यात सर्व पुडी टाकण्यात पुन्हा एक मिनिट उकळावे. त्यानंतर चहापूड टाकून तीन मिनिटे झाकून ठेवावे. गाळून घ्यावा. गरम प्यावा.
काश्मिरी काहवा
साहित्य- चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहा, दहा-बारा बदामांचे काप, पाव चमचा केशर.
कृती- पाणी साखर उकळावे. त्यात चहा टाकावा. तीन मिनिटे झाकून ठेवावा. त्यानंर गाळून त्यात बदामाचे काप आणि केशर टाकावे.
मसाला चहा
साहित्य- ५० ग्रॅम सुंठपूड, लवंग, वेलदोडे, जायफळ, दालचिनी, काळीमिरी, बडिशेप ह्यांची पूड प्रत्येकी एक चहाचा चमचा.
कृती- सर्व पुडी एकत्र करून झाकणाच्या बरणीत ठेवावा. चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहापूड, एक चमचा चहाचा मसाला, एक कप दूध. पाणी आणि साखर उकळून घ्यावे. एक चमचा टाकून पुन्हा उकळावे. त्यानंतर चहा पूड टाकून तीन मिनिटे झाकून ठेवावा. त्यानंतर गाळून गरम दूध टाकून गरमच प्यावा. थंडीत, पावसाळ्यात हा चहा रोज प्यावा. अतिशय गुणकारी आहे.
थंड चहा
कृती- चार ग्लास पाणी, तीन चमचे चहाची पूड, चार चमचे साखर, पाणी, साखर उकळून घ्यावे. त्यात चहा पूड टाकावी (जास्त स्ट्राँग करू नये). तीन मिनिटांनी गाळून घ्यावा. गार झाल्यावर आवडीप्रमाणे संत्रे, अननस, मोसंबी किंवा स्ट्रॉबेरी ह्यंचा रस एक कप घालावा. फ्रिजमध्ये थंड करावा. दोन तासांनी प्यावा.
विड्याच्या पानांचा चहा
प्रथम बेसिक चहा करताना पाणी साखर उकळवावे. त्यानंतर त्यात लवंग, जायफळ, वेलदोडे पूड प्रत्येकी अर्धा चमचा टाकावी. त्यानंतर गुलकंद, गुंजेचा पाला टाकून एक मिनिट उकळावे. त्यानंतर चहा पूड टाकून झाकून ठेवावे. चहा गाळून गार होऊ द्यावा. विड्याच्या दहा पानांत दीड कप पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून पाणी गाळून घ्यावे. हे पाणी चहात टाकावे. फ्रिजमध्ये दोन तास गार करण्यास ठेवावे.
लेमन टी
‘लेमन’ टी करताना वर सांगितलेल्या चार ग्लास बेसिक चहात गार झाल्यावर एका लिंबाचा रस टाकावा.
पीच टी
साहित्य- चार जरदाळू, चार ग्लास पाणी, चार चमचे चहा, चार चमचे साखर.
कृती- प्रथम जरदाळू दोन तास, एक कप पाण्यात भिजत घालावेत. बिया काढून मिक्सरमध्ये वाटून रस काढावा. चार ग्लास पाणी, साखर उकळावे. त्यात चहा पूड टाकून गाळून घ्यावे. गार झाल्यावर जरदाळूचा रस टाकावा. दोन तास फ्रिज मध्ये ठेवून गार करून प्यावा.

👍 ok