प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ ४ थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ ७ वी सन ३०२५-२६ च्या पूर्व तयारीबाबत Preparation 4th 7th Scholarship Exam

Preparation 4th 7th Scholarship Exam

Preparation 4th 7th Scholarship Exam

Scholarship Exam Class 4th 7th Preparation

Grade 4 and 7 Scholarship Exam Preparation

Regarding preliminary preparation for the Primary Scholarship Examination (4th standard) and Upper Primary Scholarship Examination (7th standard) 2025-26

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

महत्त्वाचे

जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025/5263.

दिनांक : 27/10/2025.

विषय :- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2025-26 च्या पूर्व तयारीबाबत....

संदर्भ :- शासन निर्णय क्र. प्राउशि/प्र.क्र.23/2025 (ई-1142170)/एस.डी.-5, दि. 17/10/2025.

उपरोक्त विषय व संदर्भीय शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इ. 5 वी ऐवजी इ. 4 थी व इ. 8 वी ऐवजी इ. 7 वी असा करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार सन 2025-26 या शैक्षणिक सत्रामध्ये इ. 4 थी, इ. 5 वी, इ. 7 वी व इ. 8 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

५ वी ऐवजी इ. ४ थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी ऐवजी इ. ७ वी मध्ये आयोजित करणे, परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) असे करणे, परीक्षेच्या अटी व शर्ती तसेच शिष्यवृत्ती संच प्रकार, मंजूर संच संख्या, शिष्यवृत्तीचे दर व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निवड करणेबाबतचे सुधारीत निकष…
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: प्राउशि/प्र.क्र.२३/२०२५ (ई-११४२१७०)/एसडी-५ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२ दिनांक :- १७.१०.२०२५ वाचा या ओळीला स्पर्श करून

इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली असून इ. 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम, अधिसूचना व इतर अनुषंगिक माहिती यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्याअनुषंगाने इ. 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व शाळांनी पूर्वतयारी म्हणून शाळा माहिती प्रपत्रामध्ये शाळेची व विद्यार्थी आवेदनपत्रामध्ये (इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेनुसार) परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरुन संकलित करण्यास आपल्या स्तरावरुन कळवावे.

हेही वाचाल – पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०८ फेब्रुवारी, २०२६ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना परीक्षा वेळापत्रक शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदन पत्र लिंक

सदर माहिती भरलेली प्रपत्रे शाळेतच ठेवावी, जेणेकरुन सदर परीक्षेची अधिसूचना प्रसिध्द होऊन ऑनलाईन लिंक उपलब्ध होताच आवेदनपत्रे ऑनलाईन भरणे सुलभ, जलद व बिनचुक होईल. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना उपरोक्तनुसार कार्यवाही करण्यास सूचित करावे.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

प्रत माहितीस्तव :-

  1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई 32.
  2. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे 01.
  3. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे 01.
  4. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे – 01.
  5. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे – 01.
  6. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग), महाराष्ट्र राज्य

प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी :-

मुख्याध्यापक, सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, महाराष्ट्र राज्य.

प्रति,

  1. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका.
  2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
  3. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम / दक्षिण / उत्तर)
  4. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व.
  5. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व.

Preparation 4th 7th Scholarship Exam
Preparation 4th 7th Scholarship Exam

Leave a Comment

error: Content is protected !!