PM SHRI SCHOOLS SCHEME

PM SHRI SCHOOLS SCHEME

image 79
PM SHRI SCHOOLS SCHEME

PM SHRI SCHOOLS SCHEME

विषय : – PM SHRI PM SHRI (PM Schools for Rising India) योजनेतंर्गत तिसऱ्या टप्प्यातील शाळा निवडीच्या अनुषंगाने Bench Mark शाळांनी PM SHRI पोर्टलवर School Login वरून ऑनलाईन पध्दतीने स्वयंनोदंणी करून सहभाग घेणेबाबत.

संदर्भ: – केंद्रशासनाचे शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांचे पत्र क्र.F.No.१-५/२०२४-१९.१९, दि. ०६/०३/२०२५.

PM SHRI (PM Schools for Rising India) योजनेंतर्गत समता, प्रवेश, गुणवत्ता व सर्व समावेशक समग्र व्यवस्था असणारी उदाहरण दाखल शाळा, इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल अशाप्रकारे देशभरातील १४,५०० शाळा विकसित करावयाच्या आहेत त्यानुषंगाने केंद्रशासनाने देशभरातील शाळांची निवड केली असून आपल्या राज्यातील पहिल्या टप्यात ५१६ शाळा व दुसऱ्या टप्यात ३११ शाळा अशा एकूण ८२७ शाळांची निवड करण्यात आलेली आहे हे आपणांस ज्ञात आहे.

२ PM SHRI योजनेचे मुख्य सहा स्तंभ असून ते पुढीलप्रमाणे आहेत.


स्तंभ १) अभ्यासक्रम अध्यापन शाख पद्धती आणि मुल्यमापन हे नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-२०२०) प्रकरण १,२, ४ आणि २४ यामधील शिफारशीप्रमाणे शाळांमध्ये प्रतिबिंबित करावयाचे आहे.


स्तंभ २) प्रवेश आणि पायाभूत सुविधा हे नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-२०२०) प्रकरण ३ आणि ७ यामधील शिफारशीप्रमाणे शाळांमध्ये प्रतिबिंबित करावयाचे आहे.


स्तंभ ३) मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व विकास हे नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-२०२०) प्रकरण ५ आणि १५ यामधील शिफारशीप्रमाणे शाळांमध्ये प्रतिबिंबित करावयाचे आहे.


स्तंभ ४) समावेशन आणि लिंग समभाव हे नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-२०२०) प्रकरण ६ यामधील शिफारशीप्रमाणे शाळांमध्ये प्रतिबिंबित करावयाचे आहे.


स्तंभ ५) व्यवस्थापन, संनियंत्रण व प्रशासन हे नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-२०२०) प्रकरण ८ यामधील शिफारशीप्रमाणे शाळांमध्ये प्रतिबिंबित करावयाचे आहे.


स्तंभ ६) लाभार्थ्यांचे समाधान हे नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-२०२०) प्रकरण ८ यामधील शिफारशीप्रमाणे शाळांमध्ये प्रतिबिंबित करावयाचे आहे.

म्हणजेच उपरोक्त स्तंभांमध्ये नमूद असलेल्या बाबींनुसार निवड होणाऱ्या PM SH॥ शाळांद्वारे इतर नजीकच्या शाळांना समानता, समतापुर्ण व आनंददायी वातावरणात उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक शाळा म्हणून नेतृत्व करावयाचे आहेत.


३. त्यानुषंगाने केंद्रशासनाने संदर्भिय पत्रान्वये PM SHRI (PM Schools for Rising India) शाळा निवडीकरिताचा तिसरा टप्पा दि.१०/०३/२०२५ पासून सुरू करण्यात येत असल्याबाबत कळविले आहे.


४. तिसन्या टप्यातील PM SHRI योजनेमध्ये शाळांनी सहभागी होण्याकरिता पारदर्शकपणे शाळा निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन कार्यपध्दतीतील सूचनांचा अवलंब करून Bench Mark Schools म्हणून निश्चित असलेल्या शाळांनी स्वयं नोंदणी करावयाबी आहे. ऑनलाईन PMSHRI पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित मार्गदर्शक सूवनेनुसार शाळा नोंदणी व जिल्ह स्तरावरून पडताळणीबाबतची कार्यवाही कालमर्यादेत करणे बंधनकारक आहे.


५. त्यानुषंगाने उपरोक्तबाबत आपल्या स्तरावरून विहित्त वेळेत खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करावी. पहिल्या व दुसन्या टप्यात ज्या तालुक्यातील शाळांची निवड झाली नाहीत अशा तालुक्यांतील Bench Mark शाळा निवड प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त सहभागी होतील. ज्यामुळे शाळा निवडीपासून एकही तालुका वंचित राहणार नाही याची खात्रीपूर्वक दक्षता घ्यावी.


६. खालील वेळापत्रकानुसार आपल्या तालुक्यातील Banch Mark शाळांपैकी किती शाळांनी स्वयं नोंदणी केली वा केली नाही याबाबत नियमित अनुधावन करावे व त्या तालुक्यातील Bench Mark मधील सर्व शाळांना स्वयं नोंदणी करण्याकरिता प्रोत्साहन व मदत करावी. PM SHारा योजनेतंर्गत शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कालमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. त्या कालावधीतच अंगलबजावणी पूर्ण होईल असे पाहावे.
Bench Mark मधील सर्व शाळांना स्वयं नोंदणी करण्याकरिता प्रोत्साहन व मदत करावी.

PM SHIRI योजनेतंर्गत शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कालमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. त्या कालावधीतच अंगलबजावणी पूर्ण होईल असे पाहावे.


Tentative Schedule for Third cyele of Selection Process

Sr. Activity Timeline
1 Opening of Online Challenge Portal 10th March, 2025
2 Last date for school to Apply Till 21 March, 2025
3 District (For Verification) Till 25th March, 2025
4 State/UT (For Verification & Approval) Till 28th March, 2025
5 MOE (For final Selection) Till 1 April, 2025

CIRCULAR PDF COPY

राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.

Leave a Comment

error: Content is protected !!