PM Poshan MDM Fill Daily Attendance Online Saral Portal On Time
PM Poshan MDM Fill Daily Attendance Online Saral Portal On Time
Regarding filling the daily attendance information of daily beneficiaries under the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana on the online Saral portal on time.
सरल प्रणालीवर मोबाईल अॅप, वेबपोर्टल व एसएमएस
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
जा.क्र.प्राशिसं/पीएम पोषण/2025/
दिनांक 16/12/2025
विषय :- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत दैनंदिन लाभार्थी (Daily Attendance) माहिती ऑनलाईन सरल पोर्टलवर वेळेत भरणेबाबत.
संदर्भ :- १. या कार्यालयामार्फत वेळोवेळी VC मार्फत देण्यात आलेल्या सूचना व दैनंदिन अहवालाबाबत WhatsApp वरील संदेश.
२. दिनांक १५.१२.२०२५ रोजीची मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या आढावा बैठकीतील निर्देश.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता १ ली ते ८ वी मधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाची दैनंदिन लाभार्थी माहिती राज्यातील सर्व पात्र शाळांनी सरल प्रणालीवर ऑनलाईन भरणे अनिवार्य आहे.
सरल प्रणालीवर भरलेली ही दैनंदिन माहिती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण (PM POSHAN) पोर्टलवर स्वयंचलितपणे (Auto Update) अद्ययावत होत असून, केंद्र शासनाकडून दररोज AMS (Automated Monitoring System) अहवालाद्वारे लाभार्थी शाळांच्या माहितीची पडताळणी करण्यात येते.
तथापि, राज्यातील अनेक शाळांकडून उक्त प्रमाणे शाळास्तरावर वितरीत केलेल्या आहाराच्या अनुषंगाने दैनंदिन लाभार्थी व उपस्थितीची माहिती नियमित व वेळेत भरली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी केंद्र शासनाच्या दैनंदिन AMS अहवालामध्ये राज्यातील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत असून, यामुळे योजनेचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याबाबत केंद्र शासनाकडून मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर संदर्भ क्र. १ अन्वये दैनंदिन लाभार्थी माहिती भरण्याबाबत वेळोवेळी ऑनलाईन आढावा बैठक (VC) तसेच राज्यस्तरीय WhatsApp ग्रुपवरुन दररोज पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र. २ अन्वये मा. आयुक्त (शिक्षण) यांनीही दैनंदिन लाभार्थी माहिती अचूक व वेळेत भरण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत. यापुढील कालावधीमध्ये दैनंदिन लाभार्थी माहिती वेळेत न भरणे ही गंभीर बाब समजण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. त्याअनुषंगाने, आपल्या अधिनस्त सर्व शाळा व शाळा प्रमुखांना खालीलप्रमाणे तातडीच्या व सक्त सूचना देण्यात याव्यात :
१. सर्व पात्र शाळांनी शाळा सुरू झाल्यानंतर तात्काळ विद्याथ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती घेऊन विद्यार्थी संख्येची नोंद हजेरीपटावर करावी.
२. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचे वाटप पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची अचूक संख्या सरल प्रणालीवर मोबाईल अॅप, वेबपोर्टल व एसएमएस द्वारे तात्काळ नोंदवावी.
३. कोणत्याही कारणास्तव मध्यान्ह भोजन न दिल्यास अथवा शाळा बंद असल्यास, तशी स्पष्ट नोंद ऑनलाईन प्रणालीवर अनिवार्यपणे करावी.
४. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व अधीक्षक (PM POSHAN) यांनी त्यांच्या अधिनस्त योजनेस पात्र शाळांचा केंद्रनिहाय आढावा घेऊन दररोज दुपारी २.०० वाजेपर्यंत सर्व शाळांनी दैनंदिन लाभार्थी माहिती भरलेली आहे याची खात्री करावी.
५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तसेच लेखाधिकारी (PM POSHAN) यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून एकही शाळा माहिती भरण्यापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.
६. दैनंदिन माहिती न भरणाऱ्या शाळांची नोंद ठेवून त्यांच्याविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी.
७. यापुढे केंद्र शासनाच्या अहवालामध्ये राज्यातील लाभार्थी संख्या कमी दिसून आल्यास, त्याची जबाबदारी संबंधित शाळा प्रमुख व क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात येईल.
वरील सर्व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असून, हलगर्जीपणा अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Digitally signed by Date: 18 Dec 2025
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
जर शाळेची मध्यान भोजन वेळ 2.15 असेल तर 2.00 वाजता माहिती कुठून भरावी