PM Poshan MDM Disbursement Of Grants
PM Poshan MDM Disbursement Of Grants
MDM Distribution of grants
Subsidy Distribution Order for Payment of Fuel Vegetable Dues for the Month of September 2025 (Central/State Share) Account Head 2202-3806/2202-3815 31 Subsidies (Non-Salary) Order.
इंधन भाजीपाला देयके अदायगीकरीता अनुदान वितरण आदेश माहे सप्टेंबर २०२५ (केंद्र/राज्य हिस्सा) लेखाशिर्ष २२०२-३८०६/२२०२-३८१५ ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) आदेश.
महाराष्ट्र शासन
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
Pradhan mandi Poshan that Nirman PIA FOSHAN
जा.क्र. 1489361
अनुदान वितरण आदेश-०८
दि. 14 OCT 2025
प्रति.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सर्व.
विषयः- इंधन भाजीपाला देयके अदायगीकरीता अनुदान वितरण आदेश माहे सप्टेंबर २०२५ (केंद्र/राज्य हिस्सा) लेखाशिर्ष २२०२-३८०६/२२०२-३८१५ ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) आदेश.
संदर्भ: शासन निर्णय क्र. शापोआ २०२४/प्र.क्र.१४४/एस.डी.३/१०९३४८०, दिनांक १२ जून, २०२५.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील इयत्ता १ ली ते ८ वी च्या विदयार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येते. योजनेअंतर्गत शाळास्तरावर अन्न शिजविणाऱ्या यंत्रणेचे माहे सप्टेंबर २०२५ करिता इंधन भाजीपाला देयकाची अदायगी करण्याकरीता शाळास्तरावर अन्न शिजविणाऱ्या यंत्रणेचे इंधन भाजीपाला अनुदान MDM PORTAL मध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन माहितीच्या आधारावर संगणकीय प्रणालीद्वारे देयक जनरेट केले असून सदर जिल्ह्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यांना अनुदान देण्यात येत आहे. आदेश क्र.८ अन्वये एकुण अनुदान केंद्र हिस्सा रक्कम रु. २५,९५,५४.६७३/- व राज्य हिस्सा रक्कम रु. १७,१४,२९,८७४/- अशी एकूण रक्कम रु. ४३,०९,८४,५४७/- (अक्षरी रक्कम रुपये त्रेचाळीस कोटी नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस फक्त) आर्थिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये PFMS प्रणाली अंतर्गत राज्य स्तरावरील SNA मध्ये आपल्या जिल्हयांकरीता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
१. उक्त अनुदानातुन करण्यात येणारा खर्च लेखाशिर्ष २२०२-३८०६ (केंद्र हिस्सा) दत्तमत ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) मागणी क्रमांक ई-२ व लेखाशिर्ष २२०२-३८१५ (राज्य हिस्सा) दत्तमत ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) मागणी क्रमांक ई-२ खर्च टाकण्यात यावा.
२. ज्या कारणासाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे, त्याच कारणासाठी ती खर्च करण्याची दक्षता घेण्यात यावी.
३. विवरण पत्रात नमूद केलेल्या अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र व मासिक खर्च अहवाल संचालनालयास सादर करावा. त्याशिवाय पुढील अनुदान वितरण करण्यात येणार नाही.
४. उक्त अनुदानातुन देयके अदा करतेवेळी शासनाच्या प्रचलीत नियमांचे पालन करण्यात यावे.
५. जिल्हा निहाय मंजूर अनुदानाचा तपशील यासोबतच्या विवरण पत्र अ व ब मध्ये देण्यात आला आहे.
६. करारनाम्यातील अटी व शर्तीची पूर्तता केल्याची खात्री करून देयकाची अदायगी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी यांची राहील.
सोबतः अनुदानाचे विवरण पत्र "अ व ब" माहे सप्टेंबर-२०२५. व परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे