Pensioners Family Pensioners Difference Amount of Revised Pension Recovery of Pension Awareness Among

OLD PENSION
Pensioners Family Pensioners Difference Amount of Revised Pension Recovery of Pension Awareness Among

Pensioners Family Pensioners Difference Amount of Revised Pension Recovery of Pension Awareness Among

महाराष्ट्र शासन वित्त विभाग संचालनालय, लेखा व कोषागारे कस्तुरी इमारत, तळमजला, ज. टाटा मार्ग, पेट्रोलियम हाऊसच्या समोर, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०

दूरध्वनी क्रमांक: ०२२-२२८८०१०६/०७

क्र.संलेवको-२०२४/निवृत्तीवेतन (संगणकीकरण) OL

E-mail: dd.pension@mahakosh.in

दिनांक: २१/५/2028

प्रति,

१. सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई

२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (ई-मेलद्वारे)

विषय : निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांमध्ये जनाजागृती करणेबाबत
राज्यातील काही कोषागारांमधून निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना अज्ञात व्यक्तींकडून संपर्क साधला जात आहे. ती व्यक्ती निवृत्तीवेतनधारकांना आपणांस सुधारित निवृत्तीवेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्याअगोदर तुमची वसूली निघत आहे, ती रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी, जेणेकरून तुमची फरक रक्कम तुम्हाला मिळेल असे सांगत आहे. काही निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार केले असून ते या फसवणूकीस बळी पडले आहेत. अशा घटना इतर जिल्ह्यांमध्ये घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपण आपल्या कोषागारामार्फत

प्रेसनोटद्वारे निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना जागृत करावे. अनुषंगाने तसेच निवृत्तीवेतनधारक असोसिएशन यांना सूचित करावे.

निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना करावयाच्या आवाहनाचा नमूना सोबत जोडला आहे.

सोबत : वरीलप्रमाणे

(संगीता ग. जोशी)

उपसंचालक (निवृत्तीवेतन),

संचालनालय, लेखा व कोषागारे,

महाराष्ट्र राज्य, मुंबई

प्रत : अधिदान व लेखा अधिकारी/सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर

निवृत्तीनंतर कोणते प्रकारची वसुली करता येणार नाही
निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन

अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागाराचे अधिनस्त सर्व निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना आवाहन करण्यात येते की, कोषागारामार्फत निवृत्तीवेतनधारक यांना निवृत्तीवेतन / सुधारित निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो.

याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जाते आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.

सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की, आपणांस दूरध्वनी / भ्रमणध्वनीवरून उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. तरी कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसादर देऊ नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. तसेच अशा प्रकारच्या दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी / जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांचेकडून करण्यात येत आहे.

image 3

PDF Available Hon Court Order

“It is not possible to postulate all situations of hardship which would govern employees on the issue of recovery, where payments have mistakenly been made by the employer, in excess of their entitlement. Be that as it may, based on the decisions referred to hereinabove, we may, as a ready reference, summarise the following few situations, wherein recoveries by the employers, would be impermissible in law:

(i) Recovery from the employees belonging to Class III and Class IV service (or Group C and Group D service).

(ii) Recovery from the retired employees, or the employees who are due to retire within one year, of the order of recovery.

(iii) Recovery from the employees, when the excess payment has been made for a period in excess of five years, before the order of recovery is issued.

(iv) Recovery in cases where an employee has wrongfully been required to discharge duties of a higher post, and has been paid accordingly, even though he should have rightfully been required to work against an inferior post.

(v) In any other case, where the court arrives at the conclusion, that recovery if made from the employee, would be iniquitous or harsh or arbitrary to such an extent, as would far outweigh the equitable balance of the employer’s right to recover.”

Leave a Comment

error: Content is protected !!