Pavitra Portal Teacher Recruitment 2017 2022 Update Information

Pavitra Portal Teacher Recruitment 2017 2022 Update Information Self Certified Application form

Pavitra Portal Teacher Recruitment 2017 2022 Update Information
Pavitra Portal Teacher Recruitment 2017 2022 Update Information

Pavitra Portal Teacher Recruitment 2017 2022 Update Information

दिनांक : २०/०१/२०२५

व्यवस्थापनांसाठी सूचना

स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना

१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यांपैकी २,१६,४४३ उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते.

या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पदभरत्तीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्व-प्रमाणपत्रे (Self Certificates) पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत.

या माहितीच्या आधारे यापूर्वी जानेवारी २०२४ अखेर आलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशींची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ दिलेल्या उमेदवारांमधून शिक्षक पदभरती करण्याकरिता टप्पा दोन मधील जाहिरातींची कार्यवाही करण्यात येणार आहे.

२. पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशींसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून पोर्टलवर माध्यमनिहाय, आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी जाहिराती देणे आवश्यक आहे.

३. रिक्त पदांच्या जाहिरातींसाठी संबंधित व्यवस्थापनाने “पवित्र पोर्टल” वर पहिल्या टण्यामध्ये नोंदणी केली असल्यास त्यांना यापूर्वी नोंदणी केलेला user id व password वापरून लॉगिन करता येईल. नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सरल प्रणालीतील user id हाच या पोर्टलचा user id असेल. व्यवस्थापनास forgot password यावर क्लिक केल्यानंतर option for reset password मध्ये using onetime password (otp) sent via sms खाली व्यवस्थापनाचा सरल पोर्टलचा user id नोंद करावा, त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व captcha टाकून proceed वर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर otp येईल, आलेला otp नोंद करून verify वर क्लिक करावे. त्यानंतर reset password मध्ये new password/confirm new password नमूद करून captcha टाकून change password वर क्लिक करावे, त्यानंतर नव्याने reset केलेला password टाकून लॉगीन करता येईल.

पवित्र पोर्टलसाठी सरल पोर्टलवर नोंद असलेला व्यवस्थापनाचा मोबाईल क्रमांक विचारात घेण्यात आलेला आहे. पूर्वीचा सरल पोर्टलवरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने password reset होत नसल्यास खाजगी व्यवस्थापनाने त्यांच्याशी

संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या लॉगीनवरून मोबाईल क्रमांकात बदल करून नव्याने password reset करता येईल.

४. व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाच्या बिंदुनामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहायक आयुक्त, (मावक), मा. विभागीय आयुक्त कार्यालय यांचेकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.

५. पूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदुनामावालीमध्ये SEBC या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झाल्यामुळे व्यवस्थापनास बिंदुनामावली अद्ययावत करून दिनांक २७/२/२०२४ नंतर प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.

६. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९ सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये देण्यात आला आहे, या शासन निर्णयामध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बिंदुनामावली भरणारे प्राधिकारी, तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधितांना लॉगीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

बिंदुनामावली व विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करणारे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालील प्रमाणे आहेत.

IMG 20250121 062602
Pavitra Portal Teacher Recruitment 2017 2022 Update Information

७. व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदुनामावलीची माध्यमनिहाय माहिती नोंद करावी.

८. रिक्त पदांची मागणी नोंदविताना सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी. तथापि, सन २०२३-२४ मध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदांसाठी मागणी नोंदवू नये.

९. रिक्त पदांपैकी एखाद्या/काही पदांबाबत मा. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदुनामावलीतील आरक्षण व रिक्त विषयानुसार मागणी नोंदवावी.

१०. रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- २०२३/प्र.क्र.१७४/टीएनटी-१ दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदींनुसार रिक्त पदांच्या ८० टक्केच्या मर्यादेत मागणी नोंद करावी.

११. इ१ ली ते इ ५ वी / इ६ वी ते इ८ वी / इ९ वी ते इ १० वी /इ ११ वी ते इ १२ वी / अध्यापक विद्यालये या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल.

१२. अध्यापनाच्या विषयांची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९, २५/०२/२०१९, १२/०६/२०१९, १३/१०/२०२३ व इतर अनुषंगिक तरतुदींनुसार कार्यवाही करावी.

१३. इ. ६ वी ते इ. ८ वी या गटातील भाषा, गणित-विज्ञान, गणित, विज्ञान, सामाजिक शाखे या प्रमाणे अध्यापनाच्या विषयांसाठी मागणी करता येईल.

अ) फक्त “गणित” विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास “गणित” असा विषय निवडावा.

आ) फक्त “विज्ञान” विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास “विज्ञान” असा विषय निवडावा.

इ) “गणित विज्ञान” हे दोन्ही विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास “गणित-विज्ञान” असा विषय निवडावा.

१४. इ. ९ वी ते इ. १० वी या गटातील भाषा विषय, गणित, विज्ञान, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र या विषयांसाठी मागणी करता येईल.

१. फक्त “गणित” विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास “गणित” असा विषय निवडावा.

२. फक्त “विज्ञान” विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास “विज्ञान” असा विषय निवडावा.

३. “गणित- विज्ञान” हे दोन्ही विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास “गणित-विज्ञान” असा विषय निवडावा.

४. इतिहास, भूगोल इत्यादी सामाजिक शास्त्रातील सर्व विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास “सामाजिक शास्त्र” असा विषय निवडावा.

५. फक्त “इतिहास” विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास “इतिहास” असा विषय निवडावा.

६. फक्त “भूगोल” विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास असा “भूगोल” विषय निवडावा.

७. “शारीरिक शिक्षण” या विषयाचा पूर्णवेळ कार्यभार उपलब्ध होत असल्यास “शारीरिक शिक्षण” असा विषय निवडावा.

१५ इ. ११ वी ते इ. १२ वी या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांची मागणी नोंद करता येईल.

१६. शासन निर्णय दिनांक १३/१०/२०२३ मधील तरतुदींनुसार उच्च माध्यमिक /कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्धवेळ व दोन विषयांतील कार्यभारामुळे पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करता येतील.

१७. अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदांच्या मागणीची नोंद करता येईल.

१८. जाहिरातींसाठी बिंदुनामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येईल.

१९. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदुनामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य (approve) करून घेणे आवश्यक आहे.

२०. जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉगीनवर उपलब्ध आहे.

२१. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक ०७/०२/२०१९ मधील तरतुदींनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी.

२२. जाहिरात तयार करण्यासाठी पोर्टलवर Guidelines/Instruction टॅब अंतर्गत Flow Mechanism/User Manual उपलब्ध करून देण्यात आले आहेत, त्यानुसार कार्यवाही करावी.

पीडीएफ हवी असल्यास या ओळीला स्पर्श करा

दिनांक २०/०६/२०२२

उमेदवारांसाठी सूचना

१.उमेदवारांना आपली माहिती

स्वप्रमाणित करण्यासाठी शिक्षक भरतीच्या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.

२. उमेदवाराची माहिती यापुर्वी स्वप्रमाणित Self Certified Application form असली तरी पुन्हा नव्याने स्वप्रमाणित करणे बंधनकारक आहे त्याशिवाय मुलाखतीसह पदभरतीच्या उर्वरित भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

Acceptance of self-declaration and self-attested copies of documents instead of affidavits GR

३. उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर लॉगीन करण्यासाठी पुर्वीचा युजर आयडी व पासवर्ड नोंद करुन लॉगीन करावे. पोर्टलवरील नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावर Otp येईल व आलेला Otp नोंद करुन Verify Otp यावर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवारास लॉगीन उपलब्ध होईल.

४. आपला पुर्वीचा पासवर्ड विसरला असल्यास आपण Forget Password वर क्लिक करावे, त्यानंतर दोन पर्याय येतील त्यातील आपणांस योग्य तो पर्याय निवडावा व Proceed यावर क्लिक करावे, त्यानंतर लॉगीन आयडी व पोर्टलवर असलेला मोबाईल क्रमांक नोंद करुन Proceed यावर क्लिक करावे. पोर्टलवरील नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावर Otp येईल व आलेला Otp नोंद करावा व Verify Otp यावर क्लिक करावे. त्यानंतर New Password, Confirm Password याप्रमाणे माहिती भरुन कॅप्चा नोंद करुन Change Password यावर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवाराचे लॉगीन Logout होईल. आता बदल केलेला नवीन पासवर्ड नोंद करुन लॉगीन उपलब्ध होईल.

५. त्यानंतर उमेदवारांस सेक्युरिटी प्रश्न विचारला जाईल. हा प्रश्न व त्या प्रश्नाचे उत्तर पोर्टलवर नमूद करावे लागेल. विचारलेला प्रश्न व आपण दिलेले उत्तर आपल्याकडे नोंद करुन ठेवावे, याचा उपयोग भविष्यात पासवर्ड रिसेट अथवा अन्य कामासाठी होणार आहे.

६. यानंतर उमेदवारांस पोर्टलवर डाव्या बाजूस एक डॅशबोर्ड (Dashborad) दिसेल. या डॅशबोर्ड अंतर्गत विविध मेनु दिलेले आहेत. डॅशबोर्डवरील अॅप्लीकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर विविध मेनु दिसतील. उदा. Personal Details, Address Details, Category and Reservation Details, Academic Qualification Details, Professional Qualification Details, STATE TET Details, CENTRAL TET Details इत्यादी. दिसतील. ७. डॅशबोर्डवरील कोणत्याही मेनुवर जाण्यापुर्वी सुरवातीस Portal Appointment Details असे शिर्षक दिसेल व या शिर्षकाखाली काही माहिती विचारली जाईल आपणांस लागू असलेली योग्य तीच उत्तरे द्यावीत.

८. यानंतर Personal Details वर क्लिक करावे व त्यातील फक्त Marital Status मध्ये बदल असल्यास बदल करावा अन्यथा बदल करावयाचे नसल्यास Save & Next वर क्लिक करावे.

९. यानंतर Address Details वर क्लिक करावे व त्यातील मोबाईल क्रमांक वगळून इतर सर्व नोंदी मध्ये बदल अथवा करता येईल. बदल असल्यास योग्य तो बदल करावा अन्यथा बदल करावयाचे नसल्यास Save & Next वर क्लिक करावे.

१०. आपणास पुर्वी नोंद केलेला मोबाईल क्रमांक बदल करावयाचा असल्यास Change mobile no या मेनुवर क्लिक करुन येणाऱ्या बॉक्स मध्ये आपला नवीन मोबाईल क्रमांक नमूद करावा त्यानंतर नवीन मोबाईल क्रमांकावर otp येईल. आलेला otp नमूद करुन Verify otp वर क्लिक करावे. अशा रितीने आपला नवीन मोबाईल क्रमांक पोर्टलवर नोंद होईल.

११. ज्या उमेदवाराकडे नवीन पोर्टलवर लॉगीन करण्यासाठी पुर्वी नोंद केलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्यास लॉगीन करता येत नाही. अशा उमेदवारांच्या बाबतीत पुर्वीचा क्रमांक अस्तीत्वात नसल्यामुळे (पोर्टलवर नोंद असलेला मोबाईल गहाळ झाला असेल, मोबाईल क्रमांक बंद झाला असेल वा अन्य कारणामुळे मोबाईल वापरात नसेल) अशा उमेदवारांनी संबंधित जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक), तसेच मुंबई शहराच्या बाबतीत शिक्षण निरिक्षक, (पश्चिम/उत्तर/ दक्षिण), बृहन्मुंबई यांच्याकडे जावून नवीन मोबाईल पोर्टलवर नोंद करता येईल. यासाठी आपल्या स्वतःच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्र उदा. शालांत परीक्षेचे मुळ गुणपत्रक, प्रमाणपत्र, आधार क्रमांक, ओळखीचा पुरावा घेवून शिक्षणाधिकारी/शिक्षण निरिक्षक यांना दाखवावे. त्यानंतर शिक्षणाधिकारी/शिक्षण निरिक्षक उमेदवारांच्या ओळखीची खात्री पटल्यानंतर शिक्षणाधिकारी/शिक्षण निरिक्षक त्यांच्या लॉगीनवर उमेदवारांचा नवीन मोबाईल क्रमांक नोंद करतील.

१२. यानंतर Category and Reservation Details वर क्लिक करावे व त्यातील आपणांस लागू असलेल्या योग्य नोंदी कराव्यात. बदल असल्यास योग्य तो बदल करावा अन्यथा बदल करावयाचे नसल्यास Save & Next वर क्लिक करावे.

१३.SEBC प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत यापुर्वी त्यांचा संवर्ग इडब्ल्युएस किंवा खुला असा बदल करण्याची सुविधा देण्यात आलेली होती, तथापि ज्यांनी असा बदल केला नसेल त्यांनी आवश्यक तो बदल करुन घ्यावा. सदर बदल करणे आवश्यक असेल.

१४. यानंतर Academic Qualification Details वर क्लिक करावे व त्यातील आपणांस लागू असलेल्या योग्य नोंदी तपासाव्यात. यामध्ये Passed on आणि Passing Class याबाबी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, त्याबाबतच्या योग्य त्या नोंदी कराव्यात. असे करण्यासाठी Edit यावर क्लिक करुन योग्य तो बदल करावा. सर्व नोंदी योग्य घेतल्यानंतर Save & Next वर क्लिक करावे.

१५. यानंतर Professional Qualification Details वर क्लिक करावे व त्यातील आपणांस लागू असलेल्या योग्य नोंदी तपासाव्यात. यामध्ये Passed on आणि Passing Class याबाबी

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत याच्या योग्य त्या नोंदी कराव्यात. असे करण्यासाठी Edit यावर क्लिक करुन योग्य तो बदल करावा. सर्व नोंदी योग्य घेतल्यानंतर Save & Next वर क्लिक करावे.

१६. यानंतर STATE TET Details वर क्लिक करावे. उमेदवारांना यापुर्वीच्या असलेल्या नोंदी दिसतील. पुर्वीच्या माहितीमध्ये Appeared for TET यावाबी समोरील होय नाही दिसतील व यापुर्वी नोंद असल्याप्रमाणे होय/नाही समोर (निवडलेले) दिसेल. त्यापैकी होय वर क्लिक असल्यास पुर्वीच्या नोंदी दिसतील, अशा उमेदवारांनी माहिती पडताळणी करुन योग्य दिसत असल्याची खात्री करुन Save & Next वर क्लिक करावे.

१७. यानंतर CENTRAL TET Details वर क्लिक करावे. उमेदवारांना यापुर्वीच्या असलेल्या नोंदी दिसतील. यापुर्वीच्या माहितीमध्ये Appeared for CTET याबाबी समोरील होय नाही दिसतील व यापुर्वी नोंद असल्याप्रमाणे होय/नाही समोर (निवडलेले) दिसेल. त्यापैकी होय वर क्लिक असल्यास पुर्वीच्या नोंदी दिसतील, अशा उमेदवारांनी माहितीची पडताळणी करुन योग्य दिसत असल्याची खात्री करुन Save & Next वर क्लिक करावे.

१८. यानंतर Self Certify Application Form वर क्लिक करावे. आपणांस आपण नोंद केलेल्या माहितीनुसार Self Certify Application Form दिसेल. त्यातील दिसत असलेल्या सर्व नोंदी पुन्हा एकदा तपासाव्यात. एखादया माहितीमध्ये पुन्हा बदल करावयाचा असल्यास त्यासंबंधीच्या मेनुवर क्लिक करावे व आवश्यक तो बदल करावा अन्यथा Self Certify Application Form वरील दिसत असलेली माहिती योग्य असल्यास Declaration खालील अटी व शर्तीचे वाचन करुन चौकटीत क्लिक करावे. त्यानंतर फॉर्मच्या शेवटी असलेल्या Certify Application Form यावर क्लिक करावे. त्यानंतर आपणांस Information बॉक्स दिसेल स्वप्रमाणित करण्यापुर्वी कोणताही बदल करावयाचे नसल्यास Yes यावर क्लिक करावे. त्यानंतर आपण पोर्टलवरील नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला Otp येईल व आलेला Otp नोंद करुन Verify Otp यावर क्लिक करावे. अशा रितीने आपले पोर्टलवरील Self Certified Application form स्वप्रमाणपत्र दिसेल व त्याची प्रिंट काढण्यासाठी Self Certified Application form यावर क्लिक करावे. डाऊनलोड झालेली प्रिंट जतन करुन ठेवावी.

१९. Self Certified Application form पुर्ण केल्यानंतर आपणांस स्वप्रमाणपत्र अंतीम केल्यानंतरही बदल करणे आवश्यक वाटत असल्यास पुन्हा केवळ एकवेळ बदल करता येईल त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत Self Certified Application form मध्ये बदल करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

२०. Self Certified Application form पहिल्यांदा पूर्ण केल्यानंतर पुन्हा बदल करावयाचा झाल्यास Un- certify Application form या मेनुवर क्लिक करावे. त्यानंतर Declaration खालील चौकटीतील अटी व शतीचे वाचन करुन Declaration खालील चौकटीत विलक करावे. त्यानंतर फॉर्मवरील शेवटी असलेल्या Certify Application Form यावर विलक करावे. त्यानंतर Un- certify Application form यावर करावे. त्यानंतर Information बॉक्स

दिसेल Un- certify Application form करावयाचा असल्यास Yes यावर क्लिक करावे. त्यानंतर आपण पोर्टलवरील नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर Otp येईल व आलेला Otp नोंद करुन Verify Otp यावर क्लिक करावे. अशा रितीने आपला पोर्टलवरील Self Certified Application form हा Un- certify होईल.

२१. त्यानंतर ज्या-ज्या माहितीमध्ये बदल करावयाचा असेल त्या त्या माहितीच्या मेनुवर क्लिक करुन माहितीमध्ये योग्य ते बदल करता येईल. असा बदल करणे पुर्ण झाल्यानंतर Self Certify Application Form वरील दिसत असलेली माहिती योग्य असल्यास Declaration खालील चौकटीतील अटी व शर्तीचे वाचन करुन चौकटीसमोर क्लिक करावे व फॉर्मवरील शेवटी असलेल्या Certify Application Form यावर क्लिक करावे. त्यानंतर आपणांस Information बॉक्स दिसेल स्वप्रमाणित करण्यापुर्वी कोणताही बदल करावयाचे नसल्यास Yes यावर क्लिक करावे. त्यानंतर आपण पोर्टलवरील नोंद केलेल्या मोवाईल क्रमांकावर Otp येईल व आलेला Otp नोंद करुन Verify Otp यावर क्लिक करावे. आपले पोर्टलवरील Self Certified Application form स्वप्रमाणपत्र दिसेल व त्याची प्रिंट काढण्यासाठी Self Certified Application form यावर क्लिक करावे. डाऊनलोड झालेली प्रिंट जतन करुन ठेवावी. यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपली स्वप्रमाणित माहितीमध्ये Self Certified Application form मध्ये बदल करता येणार नाही.

पोर्टलवरील माहितीच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी पासवर्ड बदल करणे उमेदवारांच्या

२२. हिताचे राहिल, त्याकरीता डॅशबोर्डवरील Change Password या मेनुवर क्लिक करावे. Old password, New Password, Confirm Password याप्रमाणे माहिती भरुन कॅप्चा नोदं करुन Change Password यावर क्लिक करावे. त्यानंतर Change Password चा बॉक्स येईल त्यातील सूचनांचे वाचन करुन Confirm यावर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवार Logout होईल. आता बदल केलेला नवीन पासवर्ड नोंद करुन लॉगीन उपलब्ध होईल. २३. उमेदवारांस पहिल्यांदा लॉगीन करताना Security Question विचारला जातो, सदर Security Question बदल करावयाचा झाल्यास Change Security Question यावर क्लिक करावे. त्यानंतर पुवीचा Security Question व नोंद केलेली माहिती दिसेल. बदल करावयाचा असल्यास वेगळा प्रश्न निवडून त्याचे उत्तर नमूद करावे व Change Security Question

यावर क्लिक करावे त्यानंतर नव्याने निवडलेला प्रश्न प्रणालीमध्ये नोंद होईल. २४. Request for change data हो सुविधा आपली माहिती स्वप्रमाणित करण्यापुर्वीच या सुविधेचा उपयोग होईल. यामध्ये Change in Date of Birth, Change in Gender यामध्ये बदल करण्याची सुविधा असेल. त्यासाठी Request for change in data यावर क्लिक करुन ज्यामध्ये बदल करावयाचा आहे ती सुविधेवर क्लिक करावे. उदा. Change in Date of Birth करावयाची असल्यास पुवीची नोंद असलेली जन्मतारीख दाखविण्यात येते व त्यापुढे सुधारित नोंद करावी व त्यानंतर ज्या जिल्हयाकडे प्रत्यक्ष पडताळणीसाठी सोईचा जिल्हा निवडावा व सेव्ह बटनवर क्लिक करावे. असा बदल पुर्ण करण्यासाठी आपण निवडलेल्या संबंधित

जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयात जावून बदल Approve करुन घ्यावा व त्यानंतर स्वप्रमाणित करण्याची कार्यवाही करावी. जोपर्यंत request Pending जोपर्यंत राहील तोपर्यंत आपली माहिती स्वप्रमाणित होणार नाही.

वरील प्रमाणे सुचनांचे पालन करुन आपली स्वप्रमाणित माहिती Self Certified Application form पोर्टलवर पूर्ण करावी.

प्राधान्यक्रम जनरेट करुन पोर्टलवर लॉक करण्यासाठी आपली माहिती Self Certified Application form असणे आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!