Organizing Childrens Painting Competition दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा आयोजनाबाबत

Organizing Childrens Painting Competition

Organizing Childrens Painting Competition

Organizing a children’s painting competition

Regarding the organization of the Children’s Painting Competition to be held on August 12, 2025

Bal chitrkla spardha

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई

Maharashtra State Board of Art Education, Mumbai

DDN Fort, Mumbai-400.001. Ph. No. 022 22620004

दिनांक :- २४ जुलै, २०२५.

कमांक: कशिमं/२०२५/पाच/७०५

परीक्षा प्राधान्य / कालमर्यादित

प्रति,
शिक्षण संचालक,
माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य,
पुणे.

विषय : दिनांक १२ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा आयोजनाबाबत.

संदर्भ :- उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक एडीआर-२०२५/CN-११८२७३२/प्र.क्र.७४/तांशि-६, दिनांक १४ जुलै, २०२५.

महोदय,

🎨🖌️ शासकीय रेखा कला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२५ वेळापत्रक परीक्षा शुल्क ऑनलाइन नोंदणी कालावधी व लिंक

शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यातील सर्जनशीलता वाढवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक कलेचा वारसा जपण्यासाठी या स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली दिनांक १२ ऑगस्ट, २०२५ रोजी राज्यभरातील विविध केंद्र/शाळांवर बालचित्रकला स्पर्धा-२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.

बालचित्रकला स्पर्धेच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन सूचना वाचा या ओळीला स्पर्श करून

संदर्भीय शासन निर्णयान्वये बालचित्रकला स्पर्धेचे प्रवेश शुल्क तसेच जिल्हा स्तरीय व राज्य स्तरीय बक्षीसांच्या रकमेत सन २०२५ पासून वाढ करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा ही चार गटामध्ये घेतली जाणार असून इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतचे गट निहाय विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रति विद्यार्थी रु.२०/- (अक्षरी रुपये वीस फक्त) एवढे स्पर्धा शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे केंद्राच्या लॉगइन मधून भरता येणार आहे.

बालचित्रकला स्पर्धा शुल्क आणि बक्षिसांच्या रक्कमेमध्ये सुधारणा करणे तसेच स्पर्धा आयोजनाबाबत मार्गदर्शक सुचना शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक सहभागासाठी, आपल्या अधिनस्त असलेल्या शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व गट शिक्षणाधिकारी यांना त्यांच्या कार्य क्षेत्रातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना

www.msbae.ac.in

या संकेतस्थळावर किंवा

https://balchitrakala२०२५.msbae.in

या लिंकवर जाऊन शाळेची व विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करण्याच्या सूचना तातडीने देण्यात याव्यात.

बालचित्रकला स्पर्धा २०२५ आयोजनाच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)/शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व गट शिक्षणाधिकारी यांच्या माहितीकरिता महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांनी तयार केलेल्या मार्गदर्शन सूचना पुढील कार्यवाहीसाठी सोबत जोडल्या आहेत.

आपला,

सोबत : वरील प्रमाणे
परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

संचालक,
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई.

प्रत,
१) मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
३) मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
४) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
५) मा.कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६) निवड नस्ती.

IMG 20250728 053103
Organizing Childrens Painting Competition

Leave a Comment

error: Content is protected !!