Guidelines Instructions For Childrens Drawing Competitions
Guidelines Instructions For Childrens Drawing Competitions
Instructions regarding organizing a children’s painting competition
Guidelines for organizing children’s drawing competitions
Guidance notes on organizing a children’s painting competition Apply Link
बालचित्रकला स्पर्धेच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन सूचना
महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक एडीआर-२०२५/CN-१८२७३२/प्र.क्र.७४/तांशि-६, दिनांक १४ जुलै, २०२५ नुसार बालचित्रकला स्पर्धा शुल्क आणि बक्षिसांच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची बालचित्रकला स्पर्धा दिनांक १२ ऑगस्ट, २०२५ रोजी आयोजीत करण्यात आली असून सदर स्पर्धा आयोजनाबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शन व सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
अधिक वाचा दिनांक १२ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा आयोजनाबाबत.
तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन :-
तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी संबंधित समिती गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून खालीलप्रमाणे गठित करण्यात येईलः
समिती सदस्यः
अ.क्र.
समिती
१.मुख्याध्यापक, तालुकास्तरावरील माध्यमिक शाळा
२.मुख्याध्यापक, तालुकास्तरावरील प्राथमिक शाळा
३.प्राथमिक/माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित चित्रकला शिक्षक
४.स्थानिक चित्रकार
गटशिक्षणाधिकारी यांचेकरिता आवश्यक कार्यपद्धतीः
१. सर्व गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडून लॉगइन व पासवर्ड मिळेल. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या
www.msbae.ac.in
या संकेतस्थळावर किंवा
या लिंकवर लॉगिन करतील.
२. लॉगिनमध्ये त्यांच्या तालुक्यातील सर्व केंद्रांची गटनिहाय विद्यार्थी संख्या प्राप्त होईल.
३. गटशिक्षणाधिकारी त्यांच्या तालुक्यामधील सर्व केंद्र/शाळांवर नियंत्रण ठेवतील.
४. स्पर्धेनंतर त्यांच्या कक्षेत असलेल्या सर्व केंद्र/शाळांवर होणाऱ्या स्पर्धेचे गटनिहाय सर्व उत्तरपत्रिका (पेपर) संकलन करतील.
५. संकलन करण्यात आलेल्या ड्रॉईंग पेपरचे वरील समितीमार्फत गटनिहाय वर्गवारी करतील.
६. वर्गवारी केल्यानंतर वरील समितीमार्फत प्रत्येक गटामधील २० चित्रे (२० x ४ गट = एकूण ८० चित्रे) निवड करतील.
७. तालूका स्तरावर निवड करण्यात आलेल्या चित्रांची माहिती (विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, पालकाचे संपूर्ण नाव, गट, इयत्ता, जन्मतारीख, शाळेचे नाव) इत्यादी माहिती गटशिक्षणाधिकारी त्यांच्या लॉगिनवर भरतील.
८. सर्व माहिती संकलित करून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना ऑनलाईन पद्धतीने सादर करतील.
जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन :-
जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून खालील ९ सदस्यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात येईलः
अ.क्र.
समिती
१. संबंधित जिल्हा परिषदेच्या शिकषण समितीचे अध्यक्ष
समितीमधील
पदनाम
अध्यक्ष
सदस्य
सदस्य
सदस्य
सदस्य
जिल्यातील दोन प्रसिध्द अनुदानित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक
जिल्हयातील दोन प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक
दोन स्थानिक चित्रकला शिक्षक (चित्रकला शिक्षण शक्यतो आर्ट मास्टर प्रामणपत्रधारक असावेत)
५. संबंधित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
सदस्य सचिव
६. संबंधित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक यांचेकरिता मार्गदर्शक सूचना-
१. सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक)/शिक्षण निरीक्षक महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या
www.msbae.ac.in
या संकेतस्थळावर किंवा
https://balchitrakala२०२५.msbae.in
या लिंकवर स्वतःचा लॉगिन तयार करतील.
२. स्वतःचा लॉगइन तयार केल्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील तालुकानिहाय गट शिक्षणाधिकाऱ्यांचे लॉगइन तयार करुन लॉगइन आय डी व पासवर्ड सर्व गट शिक्षणाधिकाऱ्याला उपलब्ध करुन देतील. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांकरिता वरील संकेतस्थळावर उपसंचालक, शालेय शिक्षण संचालनालय, चर्नी रोड, मुंबई यांनी लॉगिन करावे.
३. गट शिक्षणाधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या प्रत्येक गटाचे २० असे एकूण ८० चित्रांची माहिती आपल्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल तसेच ऑफलाईन पध्दतीने सर्व चित्रे गटशिक्षणाधिकारी सादर करतील.
४. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वरील समिती सदस्यांची निवड करून समिती गठीत करतील.
५. उपरोक्त जिल्हा पातळीवरील समितीमधील तीन सदस्यांची “निवड समिती” गठीत करण्यात येईल. (निवड समितीमधील दोन सदस्य दष्यकलेचे शिक्षण प्राप्त केलेले असतील.)
६. तालुका पातळीवरील समितीकडून प्राप्त झालेल्या चित्रांमधून ड्रॉईंग पेपरचे निवड समितीमार्फत गटनिहाय वर्गवारी करेल.
७. वर्गवारी केल्यानंतर निवड समितीमार्फत प्रत्येक गटासाठी ४ विजेते (पहिले-१, दुसरे-२, तिसरे-३ व चौथे-१) एकूण १६ विद्यार्थी निवडण्यात येतील. बक्षिसपात्र विद्यार्थ्यांची यादी ऑनलाईन पध्दतीने लॉगइन मध्ये नमुद करुन सादर करावी तसेच संबंधित विद्यार्थ्यांची चित्रे संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडे हस्तपोहच सादर करतील.
८. जिल्हा स्तरावर निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल शक्यतो दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या
www.msbae.ac.in
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
९. बक्षिसपात्र व गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांची बक्षिसे व प्रमाणपत्र शक्यतो दिनांक १० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या खात्यावर व ऑनलाईन पध्दतीने लॉगइनवर पाठविण्यात येईल.
१०. सर्व बक्षिसपात्र व गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांचे बक्षीस व प्रमाणपत्र वितरण दिनांक १४ नोव्हेंबर, २०२५ (बालदिनी) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक यांच्याकडून करण्यात येईल.
राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन :-
अ.क्र. अधिकाऱ्यांचे पदनाम
समितीमधील पदनाम
१.संचालक, कला संचालनालय
अध्यक्ष
२.अधिष्ठाता/प्राचार्य, शासकीय कला महाविद्यालय
सदस्य
३.सचिव, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ
सदस्य सचिव
राज्य पातळीवरील बक्षिसांसाठी चित्रे निवडण्यासाठी संचालक, कला संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली पुढील तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात यावीः
सचिव, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांचेकरिता मार्गदर्शन सूचना
१. सचिव, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या
www.msbae.ac.in
या संकेतस्थळावर किवा
https://balchitrakala२०२५.msbae.in
या लिंक वर स्वतःचा लॉगिन तयार करतील.
२. जिल्हा स्तरावर बक्षिसपात्र व गुणवत्ता प्रमाणपत्राकरिता निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या/यादी गटनिहाय ऑनलाईन पध्दतीने प्राप्त होईल. तसेच चित्रे ऑफलाईन पध्दतीने प्राप्त होतील.
३. प्राप्त चित्रांचे वरील निवड समितीमार्फत प्रत्येक गटासाठी ४ विजेते (पहिले-१, दुसरे-२, तिसरे-३ व चौथे-१) एकूण १६ राज्यस्तरीय बक्षिसे तसेच, प्रत्येक गटातील विजेत्यांखेरीज पाच स्पर्धाकांची गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी निवडण्यात येतील.
४. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण करुन अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.