Opening of Holding Account SNA SPARSH Pranali
Opening of Holding Account SNA SPARSH Pranali
Regarding opening of Holding Account under SNA-SPARSH system
SNA-SPARSH प्रणाली अंतर्गत Holding Account उघडणेबाबत.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
क्रमप्राशिष/सशि/लेखा/SNA-SPARSH/Holding Account/2025-262990
प्रति,
- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व,
- आयुक्त, महानगरपालिका, सर्वे.
- संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
20 AUG 2025
विषय : SNA-SPARSH प्रणाली अंतर्गत Holing Account उघडणेबाबत.
संदर्भ:
- Director (PFC-1), Gol यांचे पत्र क्र.F.No.1(27)/PFMS/2020, dt. 13.07.2023.
- Under Secretary, Gol यांचे पत्र क्र.F.No.8-6/2025-15.1, dt. 19.02.2025.
- Under Secretary, Gol यांचे पत्र क्र.9-24/2024-18.19, dt. 21.04.2025.
- Director (PFC-I), Gol यांचे पत्र क्र. F.No.1(27)/PFMS/2020, dr.10.06.2025.
- वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-2024/प्र.क्र.51/कोषा प्रशा-4, दि.30.07.2025.
भारत सरकारच्या दि. 13.07.2023 च्या Office Memorandum नुसार केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीकरिता SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याचाचत निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार भारत सरकारच्या दि.19.02.2025 च्या पत्रानुसार आणि PM SHRI करिता दि.21.04.2025 रोजी संपन्न झालेल्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकातील परिच्छेद क्र.6.9 नुसार दि.01.04.2025 पासून SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने PM SHRI व STARS या दोन्ही योजनांकरिता SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच दि.01.11.2025 पासून इतर सर्व केंद्र पुरस्कृत योजनांसाठी SNA-SPARSH प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे संदर्भ क्र.4 अन्वये नमूद करण्यात आले आहे.
या अनुषंगाने वित्त विभागाचा शासन निर्णय दि.30.07.2025 नुसार SNA-SPARSH प्रणाली लागू करण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-क नुसार केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी SNA-SPARSH प्रणाली अंतर्गत सर्व योजनांचे एकच Holding Account उघडण्याबाबत पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. होल्डिंग खाते उघडणी सर्व राज्य संलग्नित योजना एकत्रित हाताळण्यासाठी एकच होल्डिंग खाते उघडणे आवश्यक (विशेष सूचना होल्डिंग खात्यात फक्त वजावटींसंबंधित रक्कम वर्ग करणे, इतर कोणतीही रक्कम वर्ग करू नये
तरी यानुरूप आपणास कळविण्यात येते की, समग्र शिक्षा, STARS, PM SHRI, PM JANMAN व इत्तर केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत SNA-SPARSH प्रणालीच्या अमलचजावणीकरिता आपल्या अधिपत्याखालील सर्व अमलबजावणी यंत्रणा (Implementing Agencies) म्हणजेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, BRC, URC, CRC, SMC, KGBV, नेताजी सुभाष आवासी विद्यालय इ. करिता कोणत्याही Nationalized/Schedule Commercial बँकेत Holding Account उपडण्याबाबतची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश देण्यात यावेत,
परिपत्रक पीडीएफ लिंक
(संजय यादव, भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत आवश्यक त्या कार्यवाहीसाठी,
- विभागीय शिक्षण उप संचालक, मुंबई विभाग, मुंबई
- उप संचालक (प्रकल्प/प्रशा), मप्राशिप, मुंबई.
- मुख्य अभियंता (प्रकल्प), मप्राशिप, मुंबई.
- शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
- प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व.