Zilla Parishad members should not visit for administrative work.
Not Allowing Zilla Parishad Members To Visit For Actual Administrative Work
Not Allowing Zilla Parishad Members To Visit Administrative Work
Regarding not allowing Zilla Parishad members to visit administrative functions in the Zilla Parishad in physically visit
जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाजांना प्रत्यक्ष भेटी न देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन परिपत्रक क्र. झेडपीअ १०९४/ प्र.क्र.९५०/०५ मंत्रालय, मुंबई
दिनांक ८ मे १९९५
परिपत्रक
शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, काही जिल्हा परिषदेचे सदस्य हे जिल्हा परिषदे अंतर्गत विभागांना अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामांची पाहणी करतात व प्रशासकीय कामात अडथळे निर्माण होऊन कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होतो या संदर्भात नमूद करण्यात येते की जिल्हा परिषद सदस्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ खाली कार्यालयीन कामकाजाचे पर्यवेक्षण करण्याचे अधिकार किंवा कर्तव्य ठरवुन दिलेले नाहीत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद सदस्य यांना जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन कामकाजाची पहाणी करता येणार नाही.
२. मात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या काही मागण्या / प्रश्न असतील तर त्यांनी त्याबाबत प्रत्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष / समितीचे सभापती किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करावी.
३. अध्यक्ष जिल्हा परिषद व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी हे परिपत्रक सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
स्वाक्षरित /-
(वि.ऊ. बन्सोडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन