पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरावयाची मानक कार्यपध्दती New Procedure For Educational Enstitutions Pavitra Portal Teacher Recruitment With Interview

New Procedure For Educational Enstitutions Pavitra Portal Teacher Recruitment With Interview

New Procedure For Educational Enstitutions Pavitra Portal Teacher Recruitment With Interview

Educational institutions that opt ​​for teacher recruitment through the Pavitra portal, including interviews, will follow a standard procedure for selecting candidates.

TAIT 2025 Pavitra portal Shikshak Padbharti Gunankan Padhat Scoring process

New Marking Scheme Pavitra Portal Teacher Recruitment With Interview

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरावयाची मानक कार्यपध्दती.

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

दिनांक : ०२ एप्रिल, २०२६.

वाचा :
१. शासन पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. ४९४/टीएनटी-१, दि. ०६.०८.२०२४
२. शासन अधिसूचना, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र. ३०२/ टीएनटी-१, दि. १२.०२.२०२५
३. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क/प्राथ १०६/पवित्र-पदभरती/मानक कार्यपध्दती/२०२६/१७९९८८९, दि. २३.०३.२०२६

प्रस्तावना :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनांच्या
अनुदानित/अंशतः अनुदानित/विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी या परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय शासनाने सन २०१७ मध्ये घेतला आहे. वस्तुतः हा निर्णय मा. उच्च न्यायालयाच्या निदेशानुसार घेण्यात आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित सुनिश्चित करण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पध्दतीने शिक्षक पदावर निवड होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण मा. उच्च न्यायालयाने नोंदविले होते. सद्यस्थितीत खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित/अंशतः अनुदानित/विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन विकल्पांपैकी एक विकल्प स्वीकारण्याची मुभा आहे. मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांना संदर्भ क्र. २ येथील दि. १२.०२.२०२५ रोजीच्या अधिसूचनेन्वये १:३ या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करुन देण्यात येतात. संदर्भ क्र. १ येथील पत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपध्दतीनुसार गुणांकन करुन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवारांची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. तथापि, सर्व उमेदवारांच्या संपादणुकीचे व पात्रतेचे योग्य मुल्यमापन या गुणांकन पध्दतीतून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पध्दतीने मुल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवाराची निवड खात्रीशिरपणे होऊ शकते. सबब, मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करुन दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित मानक कार्यपध्दती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

    शासन निर्णय :

संदर्भ क्र. १ येथील शासन पत्र या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी व एकूणच शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासर्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबविणे आवश्यक राहील.

२. सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करुन त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील.

३. उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील, अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे, अशा उमेदवाराची निवड करुन त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवारांचे वय देखील सारखे असल्यास इयत्ता १२ वी चे गुण विचारात घेण्यात यावेत,

४. संबंधित शिक्षणाधिकारी/शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विहित प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे, याची खातरजमा करुनच उमेदवाराच्या निवडीस व नियुक्तीस मान्यता द्यावी.

५. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-सन २०२५ या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by ABASAHEB ATMARAM
KAWALE
Date: 2026.04.02 13:31:02+05’30’
(आबासाहेब कवळे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरावयाची मानक कार्यपध्दती New Procedure For Educational Enstitutions Pavitra Portal Teacher Recruitment With Interview
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरावयाची मानक कार्यपध्दती New Procedure For Educational Enstitutions Pavitra Portal Teacher Recruitment With Interview

 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२६/प्र.क्र. १६६/टीएनटी-१, दि. ०२ एप्रिल, २०२६ सोबतचे परिशिष्ट

अ.क्र. बाब भारांश कमाल गुण
१. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुण चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या ७५ टक्के गुण कमाल गुण ७५ टक्के गुण

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरावयाची मानक कार्यपध्दती New Procedure For Educational Enstitutions Pavitra Portal Teacher Recruitment With Interview
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरावयाची मानक कार्यपध्दती New Procedure For Educational Enstitutions Pavitra Portal Teacher Recruitment With Interview

Leave a Comment

error: Content is protected !!