Mulyvardhan Upkram Prashikshan
Mulyvardhan Upkram Prashikshan For Teachers
जा.क्र./रा.शै.सं.प्र.प/स.वि./मूल्यवर्धन जिल्हास्तरीय प्रशिक्षण निधी वितरण /२०२५-२६
दि.१६/१०/२०२५
विषयः मूल्यवर्धन जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण यासाठी निधी वितरीत करणेबाबत.
संदर्भ :
१. मूल्यवर्धन अंमलबजावणीबाबत शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्यामध्ये झालेला सामंजस्य करार, दि.२८/०४/२०२५
२. समग्र शिक्षा अंतर्गत केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाचे इतिवृत्त, दि.०२/०५/२०२५ (प्राप्त दि.१६/०५/२०२५)
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./रा.शै.सं.प्र.प./स.वि/मूल्यवर्धन राज्यस्तरीयाOT/I/१२८५९४४/२०२५, दि.१२/०६/२०२५
४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./रा.शै.सं.प्र.प./स.वि/मूल्यवर्धन जिल्हास्तरीय TOT व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण /१/१३२१३९५/२०२५, दि.१०/०७/२०२५
५. मप्रशिप/सशि/लेखा/निधि वितरण/ ECE, SEC-Rec./२०२५-२६/२३४७, दि. ०१/०८/२०२५
६. मा. सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे निर्देश, दि. २२/०८/२०२५
७. मा. संचालक यांचे निर्देश, दि. ०३/०९/२०२५
८. मा. संचालक यांचे निर्देश दि. १७/०९/२०२५
९. या कार्यालयाचे पत्र जा. क्र./रा.शै.सं.प्र.प./स.वि/मूल्यवर्धन जिल्हास्तरीय TOT दि. १७/०९/२०२५
१०. मा. संचालक यांची मान्य टिपणी दि. १७/०९/२०२५
११. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./रा.शै.सं.प्र.प./स.वि/मूल्यवर्धन जिल्हास्तरीय प्रशिक्षण निधी वितरण /१/१४३२५८४, दि.१७/०९/२०२५
१२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र. १९/एसडी-६, दि. २२/०९/२०२५
१३. मप्रशिप/सशि/लेखा/सशि/LEP/कास/२०२५-२६/३०९७ दि. १५/१०/२०२५
उपरोक्तसंदर्भीय विषयाच्या अनुषंगाने समग्र शिक्षा सन २०२५-२६ मध्ये Fundsfor quality (LEP) अंतर्गत concept based activity books and workbook (Value Education) on SEEL अंतर्गतमूल्यवर्धन या उपक्रमास संदर्भ क्र. २ नुसारकेंदीय प्रकल्प मान्यता मंडळाची मान्यता प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. १ नुसार महाराष्ट्र शासन आणि शांतीलालमुथ्था फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे.
मूल्यवर्धन उपक्रमासाठी तासिक नियोजन उपलब्ध करून देणेबाबत वाचा या ओळीला स्पर्श करून
मूल्यवर्धन ३.० कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यात सन २०२५-२६ मध्ये राज्याच्या सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करायची आहे. त्या अनुषंगानेसंदर्भक्र. ३ नुसारराज्यस्तरीयप्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) पाच टप्प्यांमध्ये दि.१६/०६/२०२५ ते १८/०७/२०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले होते..
संदर्भ क्र. ४ नुसार जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) निवासी स्वरुपात आणि त्यानंतर प्रत्यक्ष शिक्षकांचे तालुका/केंद्र स्तरीय प्रशिक्षण अनिवासी स्वरुपात आयोजित करणे बाबत कळविण्यात आले होते. त्यासाठी संदर्भ क्र. १० आणि ११ नुसार एकूण ३६ जिल्ह्यांपैकी ३१ जिल्ह्यांना जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी निधी वितरण करण्यात आले होते. उर्वरित बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि ठाणे या ५ जिल्ह्यांना जिल्हास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी आणि सर्व ३६ जिल्ह्यांना तालुका/केंद्र स्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी निधी वितरण करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे.
मूल्यवर्धन जिल्हा व तालुका / केंद्र स्तरीय प्रशिक्षणनिधी वितरण
तालका केंद्र स्तरीय
उपरोक्त प्रमाणे एकूण रक्कम रु. १६,०४,८८,१५०/- (अक्षरी रु. सोळा कोटी चार लक्ष अठ्ठयाऐंशी हजार एकशे पन्नास फक्त) जिल्ह्यांना RTGS द्वारे वितरीत करण्यात येत आहे. अनू. क्र. ८ व ९ मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याची रक्कम प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांना वितरीत करण्यात येत आहे. सदर खर्च संदर्भ क्र. ४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार तसेच विहीत वित्तीय नियमावली नुसार खर्च करून उपयोगिता प्रमाणपत्र या कार्यालयास त्वरित सादर करावे.
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
ALSO READ 👇
Mulyvardhan Upkram Prashikshan
Mulyvardhan Upkram Prashikshan For Teachers
Mulyvardhan Prashikshan For Teachers SCERT Guidelines
value addition Mulyavardhan Upkram
Regarding attending the Training of Trainers (TOT) for Value Enhancement State Level under Samagra Shiksha 2025-26
जा.क्र./रा.शै.सं.प्र.प/स.वि./मूल्यवर्धन राज्यस्तरीय TOT/२०२५-२६
दि. /०६/२०२५
विषय : समग्र शिक्षा २०२५-२६ अंतर्गत मूल्यवर्धन राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणासाठी (TOT) उपस्थित राहणेबाबत
संदर्भ : १. मूल्यवर्धन अंमलबजावणी विषयी शासनाचा शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनसमवेत झालेला सामंजस्य करार दि. २८ एप्रिल २०२५
२. समग्र शिक्षा अंतर्गत केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाचे इतिवृत्त, दि. ०२/०५/२०२५ (प्राप्त दि. १६/०५/२०२५)
३. मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दि. १६/०४/२०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे इतिवृत्त,
उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने समग्र शिक्षा सन २०२५-२६ मध्ये Funds for quality (LEP) अंतर्गत concept based activity books and workbook (Value Education) on SEEL अंतर्गत मूल्यवर्धन या उपक्रमांस संदर्भ क्र. २ नुसार केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाची मान्यता प्राप्त झालेली आहे.
मूल्यवर्धन या कार्यक्रमाची अंमलबजावणी यापूर्वी प्रस्तुत कार्यालयामार्फत सन २०१६-२०२० या कालावधीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता १ ते ५ साठी यशस्वीपणे करण्यात आलेली आहे. यातील सकारात्मक अनुभवांच्या आधारे आता राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत मूल्यवर्धन (आवृत्ती ३.०) या कार्यक्रमाची अंमलबजावणी उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार झालेल्या सामंजस्य करारान्वये इयता १ ते ८ साठी सन २०३० पर्यत करण्यात येणार आहे.
मूल्यवर्धन ३.० कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यात सन २०२५-२६ मध्ये राज्याच्या सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करायची आहे. त्या अनुषंगाने या शाळांतील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुका/केंद्रस्तर असे आयोजित करावयाचे निश्चित आहे. तसेच या सर्व शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी उपक्रम पुस्तिका राज्य स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) पाच टप्प्यांमध्ये भारतीय जैन संघटना, वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्र, बकोरी फाटा, वाघोली, पुणे याठिकाणी आयोजित केलेले असून यासाठी जिल्हानिहाय
महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रति,
१. उपसंचालक, प्रादेशिक विद्याप्राधिकरण, सर्व
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
३. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी/शिक्षण निरीक्षक (प्राथमिक/माध्यमिक), सर्व


