Mulyavardhan Upkram
Mulyavardhan Upkram
Mulyavardhan Upkram Tasika Niyojan
Regarding providing hourly planning for value addition activities SCERT PUNE GUIDELINES
Shantilal Mutha Foundation
जा.क्र./रा.शै.सं.प्र.प/स.वि./मूल्यवर्धन दिनदर्शिका/२०२५-२६
दिनांक: ०२/०९/२०२५
विषय : मूल्यवर्धन उपक्रमासाठी तासिक नियोजन उपलब्ध करून देणेबाबत..
संदर्भ :
१. मूल्यवर्धन अंमलबजावणीविषयी शासनाचा शांतीलाल मुथा फाऊंडेशन समवेत झालेला सामंजस्य करार दि. २८/०४/२०२५
२. समग्र शिक्षा अंतर्गत केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाचे इतिवृत्त दि. ०२/०५/२०२५
(प्राप्त दि.१६/०५/२०२५)
३. या कार्यालयाचे आदेश जा.क्र. रा.शै.प्र.प./स.वि. मूल्यवर्धन जिल्हास्तरीय TOT व तालुकास्तरीय प्रशिक्षण/१/१३२१३९५/२०२५दि.१०/०७/२०२५
उपरोक्त विषयान्वये सादर की, संदर्भ १ अन्वये मूल्यवर्धन अंमलबजावणी विषयी शासनाचा शांतीलाल मुथा फाऊंडेशन समवेत दि. २८/०४/२०२५ सामंजस्य करार झालेला असून त्या अनुषंगाने समग्र शिक्षा सन २०२५-२६ मध्ये Funds for quality (LEP) अंतर्गत concept based activity books and workbook (Value Education) on SEEL अंतर्गत मूल्यवर्धन या उपक्रमास संदर्भ क्र. २ नुसार केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाची मान्यता प्राप्त झालेली आहे.
मूल्यवर्धन ३.० कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यात सन २०२५-२६ मध्ये राज्याच्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करावयाची आहे. त्याअनुषंगाने या शाळांतील सर्व शिक्षकाचे प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुका/केंद्रस्तरावर आयोजित करण्यात आलेले आहे.
संदर्भ क्र. ३ नुसार प्रत्यक्ष शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूल्यवर्धन उपक्रम प्रत्यक्ष वर्गामध्ये राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी आनंददायी शनिवार, कला शिक्षण, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण यापैकी कोणत्याही दोन तासिका प्रत्येक आठवड्याला मूल्यवर्धन उपक्रमासाठी इयत्तानिहाय देण्यात याव्यात किंवा शक्य झाल्यास शाळांनी त्याच्या स्तरावर शाळेच्या वेळेव्यतिरिक्त दोन तासिका उपलब्ध करून द्याव्यात.
उपरोक्त प्रमाणे सन २०२५-२६ मध्ये राज्याच्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांना सदर मूल्यवर्धन उपक्रम तासिका नियोजन आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रति,उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) शिक्षणाधिकारी, प्राथमिक (सर्व) शिक्षणाधिकारी, माध्यमिक (सर्व) प्रशासन अधिकारी म.न.पा.न.पा.न.प (सर्व) शिक्षण निरीक्षक (दक्षिण, पश्चिम, उत्तर)
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
