Mobile Shop On eVehicle For Divyangjan Apply Online दिव्यांग बांधवांना मिळणार मोफत फिरते वाहन दुकान

Mobile Shop On eVehicle For Divyangjan Apply Online

PPT 1 1
Mobile Shop On eVehicle For Divyangjan Apply Online

Mobile Shop On eVehicle For Divyangjan Apply Online

Self-Employment To Divyangjan Through Various Businesses on Environmentally Friendly E-Vehicles / E-Cart

Mobile shop on vehicle for Divyangjan
Registration Link

Regarding provision of a mobile shop on vehicles (mobile shop on vehicle) running on green energy to enable the disabled to become self-reliant.

दिव्यांगासाठी ई व्हॅन नोंदणी सुरु

दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई व्हेइकल) महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ६ फेब्रुवारी २०२५ पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर यांनी केले आहे.

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान अधिक माहितीसाठी या ओळीला स्पर्श करा

दिव्यांग व्यक्तीना पुरेशा सोयी उपलब्ध करुन देऊन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना कुटुंबासोबत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी, अर्ज करण्यासाठी पोर्टल २२ जानेवारी २०२५ रोजी पासून सुरू करण्यात आले आहे.

या योजनेत लाभ घेण्यासाठी

  • आवश्यक कागदपत्रे –
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई मेल आयडी
  • डोमासाइल सर्टिफिकेट
  • रेशन / मतदान कार्ड
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • UDID कार्ड
  • अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के

ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन दिव्यांग व वित्त विकास महामंडळाने केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) उपलब्ध करुन देणेबाबत… (शुध्दीपत्रक.)

महाराष्ट्र शासन
दिव्यांग कल्याण विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: दिविम २०२३/प्र.क्र.०९/दिव्यांग कल्याण ३ मुंबई

दिनांक :- २७ सप्टेंबर, २०२३

वाचाः १. शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. अपंग २०१८/प्र.क्र.१२६/अ.क.२. दि.१०.०६.२०१९.

२. शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक दिव्यांग-२०१९/प्र.क्र.१०४/अ.क्र.२. दि.१.१२.२०१६.

३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्त व विकास महामंडळ मर्या. मुंबई यांचे पत्र क्र. दिविविम/प्र.क्र.१०१७/२०२३/४२४, दि.२३.०३.२०२३.

प्रस्तावना:-
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय संदर्भक्र. १ वरील दिनांक १०.६.२०१९ च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकानासाठी रुपये ३.७५ लाख कमाल अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दिव्याग लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी परि. ४ नुसार निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये व्यवस्थापक, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, विभागीय कार्यालय, नागपूर यांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तथापि, सदर कार्यालय दिनांक २७.८.२०१८ पासून बंद करण्यात आले असल्याने समितीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. समितीच्या रचनेमध्ये बदल करणे तसेच लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अटी शर्तीमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

         शुध्दीपत्रक

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान उपलब्ध करुन देण्याबाबतच्या संदर्भाधीन क्र.१ वरील शासन निर्णयामधील परि. ४ मध्ये विभागीय व्यवस्थापक, अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई विभागीय कार्यालय, नागपूर – सदस्य ऐवजी-

लेखाधिकारी, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई सदस्य असे वाचावे.

दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, विभागीय कार्यालय, नागपूर हे बंद झालेले असल्याने पात्र अर्ज थेट जिल्हा व्यवस्थापकामार्फत दिव्यांग महामंडळाच्या मुख्यालयात सादर करावेत.

परि. ६ योजनेच्या अटी व शर्ती यामध्ये अनु. क्र. ९ नंतर

१०. अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा,

११. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.

या अटींचा समावेश करण्यात येत आहे.

२. शासन परिपत्रक दिनांक ४.७.२०१९ नुसार “अपंग” या शब्दाऐवजी “दिव्यांग” या शब्दाचा वापर करण्यात आला असल्याने अपंग महामंडळाचे नाव आता दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. मुंबई असे वाचावे, व त्या अनुषंगाने आवश्यक सुधारणा कराव्यात.

३. फिरत्या वाहनांवरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) योजनेच्या अंमलबजावणीसाठी गृहनिर्माण विभाग, नगर विकास विभाग आणि ग्राम विकास विभागाकडून दिव्यांग लाभार्थ्यांना निवडलेल्या व्यवसायासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०९२७१५५९४०१२३५ असा आहे. हे शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अधिकराव बा. बुधे) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!