Mahavachan Utsav Upakram Rajyatil Shalat Rabvine Pariptrak
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/963
दि.16 JAN 2024
प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका (सर्व),
२) मुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व जिल्हे.
विषय :- राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ हा उपक्रमांतर्गत विषय / थिम राबविणेबाबत.
संदर्भ :- १. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र.३६०/ एसडी-४ दि. २२/११/२०२३.
२. या कार्यालयाचे मार्गदर्शक सुचना जा.क्र. मप्राशिप/सशि/वाच/काअ/ २०२३-२४/३२३६ दि. ०४/१२/२०२३.
उपरोक्त विषयांकित या कार्यालयाचे संदर्भिय क्र. २ वरील पत्रांचे कृपया अवलोकन व्हावे. महावाचन उत्सव याकरिता ‘श्री छत्रपती शिवाजी थिम देण्यात येत आहे. यांचे जीवन आणि शिकवणूक’ एक विषय/थिम देण्यात येत आहे.
याअनुषगाने, महावाचन उत्सवाचा अधीनस्त सर्व माध्यम व म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या आठवडयात आपल्या सर्व व्यवस्थापनेच्या शाळांमध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक’ ही थिम राबविण्यात यावी. थिम राबविण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात याव्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करता येईल.
विदयार्थ्यांनी पृष्ठाच्या शीर्षस्थानी विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि तालुका, जिल्हा याचा उल्लेख करावा. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विदयार्थ्यांकडून उपरोक्तनुसार एका पानांचे लेखन दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करावे. संदर्भिय पत्र क्र. २ मधील मार्गदर्शक सुचनानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी.
(प्रदीपकुमार डांगे भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.
हेही वाचाल 👇👇👇👇👇👇👇 |
सदर परिपत्रक आपल्याला पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
वाचाल तर वाचाल
शिकलं तर वाचाल