महाराष्ट्र माहिती अधिकार नियम २०२६ Maharashtra RTI Rules 2026

Maharashtra RTI Rules 2026

Maharashtra RTI Rules 2026

These rules may be called the Maharashtra Right to Information Rules, 2026.

Maharashtra mahiticha adhikar nium, 2026

RNI No. MAHBIL/2009/31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष १२, अंक ७२]
शुक्रवार, जून १२, २०२६/ ज्येष्ठ २२, शके १९४८
[पृष्ठे २२, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २२८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०००३२, दिनांक १२ जून, २०२६.

    अधिसूचना

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५.

क्रमांक साप्रवि/१२०२०/४/२०२५-साप्रवि-कार्या-६. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा २२) याच्या कलम १८ च्या पोट-कलम (३) च्या खंड (च), कलम १९ च्या पोट-कलम (१०) व कलम २७ च्या पोट-कलम (२) यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि त्याबाबतीत केलेल्या सर्व विद्यमान नियमांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील नियम करीत आहेत :-

१. संक्षिप्त नाव व प्रारंभ.-
(१) या नियमांस, महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६, असे म्हणावे.
(२) ते, शासकीय राजपत्रातील त्यांच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून अंमलात येतील.
२. व्याख्या.-
(१) या नियमांत, संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर,-
(क) “अधिनियम” याचा अर्थ, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा २२), असा आहे;
(ख) “अपील” याचा अर्थ, कलम १९ च्या अनुक्रमे, पोट-कलम (१) व पोट-कलम (३) अन्वये प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याकडे आणि आयोगाकडे केलेले अपील, असा आहे;
(ग) “अपीलकर्ता” याचा अर्थ, जिने अपील दाखल केलेले असेल ती व्यक्ती, असा आहे;
(घ) “प्राधिकृत प्रतिनिधी” याचा अर्थ, आयोगासमोरील कार्यवाहीतील पक्षकाराने कार्यवाहीमध्ये त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जिला लेखी स्वरूपात प्राधिकृत केलेले असेल ती व्यक्ती, असा आहे;
भाग चार-अ-२२८-१
(१)

संपूर्ण राजपत्र वाचा या ओळीला स्पर्श करून

महाराष्ट्र माहिती अधिकार नियम २०२६ Maharashtra RTI Rules 2026
महाराष्ट्र माहिती अधिकार नियम २०२६ Maharashtra RTI Rules 2026

Leave a Comment

error: Content is protected !!