Leave for Voters To Vote On Polling Day

Leave for Voters To Vote On Polling Day

image 4
Leave for Voters To Vote On Polling Day

Leave for Voters To Vote On Polling Day

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ करिता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन परिपत्रक क्रमांक-मतदान २०२४/प्र.क्र.२१९/कामगार-९
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक : ०७ नोव्हेंबर, २०२४
संदर्भः – १) भारत निवडणूक आयोग यांचे क्र. ECI/PN/१४९/२०२४, दि.१५ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे प्रसिध्दीपत्रक
२) भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ७८/EPS/२०२४, दि.१६ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे पत्र.


शासन परिपत्रकः-


आपल्या देशातील लोकशाही पध्दतीनुसार असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ (भाग-२) मधील नियम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
२. भारत निवडणूक आयोगाने दि. १५ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार आहे.

Holiday for Voters


३. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत:-
1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
II) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने
इत्यादींना लागू राहील. (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
III) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणेआवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
IV) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यार्दीच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल.
४. सदर परिपत्रक भारत निवडणूक आयोग यांचे क्र.ECI/PN/१४९/२०२४, दि.१५ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे प्रसिध्दीपत्रक आणि भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ७८/EPS/२०२४, दि.१६ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे पत्रास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या LINK या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४११०७१५०६१८८११० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Circular / GR pdf Copy LINK


(स्वप्निल कापडणीस)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!