Kusumagraj Janmdivas Marathi Bhasha Gaurav Din

Kusumagraj Janmdivas Marathi Bhasha Gaurav Din

IMG 20250106 201149 1
Kusumagraj Janmdivas Marathi Bhasha Gaurav Din

Kusumagraj Janmdivas Marathi Bhasha Gaurav Din

Kusumagraj Janmdivas Marathi Bhasha Gaurav Din

Regarding celebrating the birth anniversary of veteran poet V.Va Shirwadkar alias Kusumagraj on 27th February as “Marathi Language Glory Day”.

ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: मभादि-२०२४/प्र.क्र.१५१/भाषा-३

नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : ०६.०१.२०२५

वाचा :-

१) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. मभादि-१०१२/प्र.क्र.८८/२०१२/भाषा-३, दिनांक २१ जानेवारी, २०१३.

२) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. मभावा-२०२०/प्र.क्र.९८/भाषा-२, दिनांक २४ जून, २०२२.

३) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. मभादि-२०२३/प्र.क्र.१५२/भाषा-३, दि. २९.१२.२०२३

शासन परिपत्रक :-

वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्याच्या सूचना यापूर्वी दिनांक २१ जानेवारी, २०१३ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयास अनुसरुन सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय प्रमुख यांना मराठी भाषा गौरव दिन सोहळा साजरा करण्याबाबत सूचित करण्यात येते.

मराठी भाषा गौरव दिन प्रश्नमंजुषा नक्की सोडवा या ओळीला स्पर्श करून

२. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन व संवर्धन हे मराठी भाषा विभागाचे मुख्य धोरण आहे. या धोरणाची व्यापकता वाढविण्यासाठी मराठी भाषेसंदर्भात राबविण्यात येणाऱ्या विद्यमान व विस्तारीत उपक्रमांना संदर्भाधीन दि. २४ जून, २०२२ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार कार्यक्रमासाठी मराठी भाषा विभाग व अधिनस्त कार्यालय यांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयानुसार संबंधित आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे.

३. मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार, जतन व संवर्धन या धोरणाशी सुसंगत पारंपारीक पध्दतीने कार्यक्रम करण्याबरोबरच त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विविध माध्यमांचा वापर करुन मराठी भाषा प्रचार-प्रसारविषयक कार्यक्रम आयोजित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-

१. मराठी भाषा विभागाचे मुख्य धोरण विचारात घेवून सदर मराठी भाषा गौरव दिन या उपक्रमाची “घेवू या एकच वसा मराठीला बनवू या ज्ञानभाषा” ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करुन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

२. मराठी भाषा विभागाच्या व क्षेत्रीय कार्यालयांच्या मराठी भाषा विषयक वाटचाल व प्रगतीविषयक बाबींची माहिती क्षेत्रीय कार्यालयांनी एकत्रितपणे विविध माध्यमातून प्रसारीत करावी.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणे बाबत शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

३. महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यात मराठी भाषा व साहित्य यांचा प्रचार-प्रसार व संवर्धन यासाठी सतत कार्यरत राहून बहुमूल्य योगदान देणाऱ्या स्थानिक पातळीवरील मराठी भाषा संवर्धक, अभ्यासक, संशोधक, लेखक, साहित्यीक यांची त्या-त्या जिल्हयातील मराठी भाषा समितीने निवड करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मराठी भाषा गौरव दिनी आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करुन गौरव करण्यात यावा.

४. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार, जतन व संवर्धन यासाठी मराठी भाषा विभाग व मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील चारही कार्यालयांकडून संपूर्ण वर्षभरात राबविलेल्या उपक्रम व योजनांची माहिती त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठी भाषा अधिकारी यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत त्या-त्या जिल्ह्यात सर्व प्रसिध्दी माध्यमातून प्रसिध्द करुन जनतेपर्यंत पोहचवावी.

५. मराठी भाषेच्या प्रचार व प्रसाराकरिता विविध स्पर्धा, प्रसारमाध्यमांतून प्रचार करणे, पुस्तके व कोश यांबाबत चर्चा, परिसंवाद, व्याख्याने इत्यादी उपक्रम आयोजित करावेत.

६. काळाची गरज लक्षात घेता, जास्तीत जास्त कार्यक्रम चर्चासत्रे, प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार या उद्दिष्टांसह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरूण पिढीला आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन सर्व शासकीय कार्यालयांनी करावे.

७. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडळ, मुंबई, भाषा संचालनालय, मुंबई यांनी वरीलप्रमाणे वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन कार्यशाळांचे वेळापत्रक जाहीर करावे. त्यानुसार कार्यक्रम आयोजित करुन त्याचा अहवाल शासनास सादर करावा.

८. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार ऑनलाईन पद्धतीने प्रभावीपणे कसा करता येईल या विषयावर सर्व शासकीय कार्यालये तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई, भाषा संचालनालय, मुंबई या संस्थांनी तज्ञांच्या मदतीने ऑनलाईन कार्यशाळा आयोजित कराव्यात.

९. मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता संबंधित कार्यालयांनी संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी दूरचित्रवाहिन्या, एफ.एम. रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप इ. प्रसार माध्यमातून याबाबतचे दृक-श्राव्य संदेश प्रसारित करावेत.

मराठी राजभाषा दिन प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून

१०. मातृभाषेची महती आणि माहिती, तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाज जीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्व या विषयांवर विचारमंथनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत.

११. सकस साहित्याची, नव्या माहितीची, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची मराठीतील पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यभर कार्यक्रम आयोजित करावेत.

१२. आकाशवाणी व दूरदर्शनवरुन सादर करण्यात येत असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मराठी भाषाविषयक मान्यवरांच्या मुलाखती, परिसंवाद आयोजित करावेत.

१३. मराठी भाषा / साहित्य / कोशवाङ्मय या विषयांवर ऑनलाईन व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन तसेच तज्ञ, विचारवंत व साहित्यिकांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात यावे.

१४. मराठीच्या प्रचार / प्रसारासाठी अभिनव कल्पना सादर करून त्याप्रमाणे ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

१५. प्रसारमाध्यमे तसेच प्रशासनात मराठी भाषेचा वापर याबाबत व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, सादरीकरणे यांचे आयोजन करावे.

मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

१६. समाजप्रसार माध्यमांतील (सोशल मीडिया) मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी, महाजालावरील (इंटरनेट) मराठी या क्षेत्रांतील तज्ञांची व्याख्याने व सादरीकरण यांचे आयोजन करावे.

१७. शब्दभांडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती याबाबतच्या स्पर्धांचे आयोजन करावे.

१८. मराठी सुलेखन, सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धा व संबंधित कार्यशाळांचे आयोजन करावे.

१९. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या निःस्पृह व्यक्तींना आणि त्यांनी निर्माण केलेल्या संस्थाना किंवा प्रकल्पांना भेट देणे.

२०. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन व संवर्धन यासाठी विविध मार्गानी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्ती / संस्था यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव / सत्कार करण्याबाबत कार्यक्रम आयोजित करावेत.२१. विश्वकोश निर्मिती मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदीची संख्या वाढावी यादृष्टीने महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाने वर्षभर विविध कार्यशाळांचे आयोजन करावे, तसेच नोदींची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना कराव्यात.

२२. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज १००% मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. तर, त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये/सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश संबंधितांच्या निदर्शनास आणावेत.

२३. मराठी भाषा विभागाचे संकेतस्थळ, क्षेत्रीय कार्यालयांची संकेतस्थळे, भाषा संचालनालयाने व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकाबद्दल (मोबाईल अॅप) माहिती सर्व सामान्यांना व्हावी या दृष्टीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी विविध माध्यमातून याबाबतची माहिती प्रसारीत करावी.

२४. वरील कार्यक्रम सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी संस्कृती मंडळ, मुंबई, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, भाषा संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांनी खालीलप्रमाणे साहित्य संस्थांची मदत घेऊन त्या साहित्य संस्थांसमोर दर्शविलेल्या जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत घ्यावी.

IMG 20250106 201131
Kusumagraj Janmdivas Marathi Bhasha Gaurav Din

अ.क्र.
साहित्य संस्था
साहित्य संस्थेच्या अंतर्गत जिल्हे

१. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर

२. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर

३. विदर्भ साहित्य संघ, नागपूर

बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

४. कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी

रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर

५. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर
कोल्हापूर

६. मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई

मुंबई शहर

२५. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वरीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भाषा संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई तसेच वरील तक्त्यात दर्शविलेल्या साहित्य संस्थांची मदत घेण्यात येईल. मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाकरिता मराठी भाषा विभाग, शासन निर्णय दि. २४.०६.२०२२ अन्वये आवर्ती स्वरुपाचा निधी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना रु.३०,०००/- इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

२६. सर्व मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या विभागातील कार्यक्षेत्रातील संबंधितांचे सहकार्य घेऊन हा सोहळा पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सहभागी करुन घ्यावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०१०६१७३९१९८८३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

🌐👉 शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 👈

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!