Know Important Things for Navodaya Exam

Know important Ten things before appearing for Navodaya Exam

NAVo 1
Know Important Things for Navodaya Exam
Know the important things while going for Navodaya Exam
विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला २ तासात ८० प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाच्या  ८० मोत्यांची व्यवस्थित गुंफण करा.
💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा💐
नवोदय परीक्षेला जात आहात तर खालील महत्वाच्या १० गोष्टी लक्षात ठेवाच.
Important Ten things to remember before appearing for Navodaya Exam
परीक्षेला जाताना तुमचे परीक्षा प्रवेश पत्र Hall Ticket / Admit card आठवणीने सोबत घ्या.

नवोदय परीक्षा सराव प्रश्न मंजुषा या ओळीला स्पर्श करून नक्की सोडवा

चांगले चलणारे काळ्या किंवा निळ्या रंगाचे.४ ते ५ बॉल पेन एकाच रंगाचे घ्या शक्यतोवर त्या पेनाने तुम्ही परीक्षा पूर्व सराव केलेला असावा.
तुमच्या सोबत दोन हात रूमाल असायलाच हवेत कारण तुमच्या तळ हाताला नेहमी घाम येत असतो घामामुळे उत्तरपत्रिका खराब व्हायला नको म्हणून थोड्या थोड्या वेळाने तळहात पुसा आठवणीने.
तुमची पाण्याची बाटली बेंचवर चूकून पण ठेवू नका .तुम्हांला पाणी हवे असल्यास उत्तर व प्रश्न पत्रिका / पेपर बाजूला करून पेपर वर पाणी पडणार नाही या पद्धतीने पाणी प्या.
Navodaya Examination Question Bank Previous Year Question Papers Notes Syllabus Answers Solutions OMR

पेपर सोडविताना तुम्हांला पूर्ण २ तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा.गडबड करून पेपर लवकर सोडवू नका.वेळेचे नियोजन करा. त्यासाठी परीक्षा पूर्व प्रश्न मंजुषा सोडवा
पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा आणि महत्वाचे म्हणजे उत्तरपत्रिकेत त्याच प्रश्नाचा क्रमांक पाहून नंतरच तुमचा अचूक पर्याय रंगवा.चूकून सुद्धा दुसऱ्या गोल मध्ये dot पण पडू देवू नका तुमचे ते उत्तर चूकीचे ठरू शकते.
उताऱ्यातील प्रश्न सोडविण्या अगोदर उतारा व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर एक एक प्रश्न सोडवायला सुरूवात करा.उत्तर निवडताना तुमचे उत्तर त्या उताऱ्याशी जुळणारे आहे का ? याची खात्री करा.कधी कधी आपल्याला वाटते तसे उताऱ्यात नसते.उताऱ्यावरील २० प्रश्न आपले अचूकच आले पाहिजे हे प्रत्येकाने ध्यानात ठेवा ६५% मुलांचे उत्तरे अचूक येतात.
बुद्धिमत्ता मधील आकृत्याचे १० प्रकार तुम्हांला येतात पण over confidence अतिआत्मविश्वास करू नका.प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक पर्यायातील आकृती पाहूनच तुमचे उत्तर निवडा.गडबडीत उत्तरे निवडू नका ४० आकृत्या अचूक आल्याच पाहिजे हे लक्ष / target ठेवा तेव्हा ४५ % मुलांच्या सर्व आकृत्या येतातच.
आता गणितातील प्रश्नांना सुरूवात होते .सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा गणितातील प्रत्येक प्रश्न सोडविल्याशिवाय उत्तर अंदाजे करू नका.कितीही सोपा प्रश्न असू द्या तो सोडवाच.
कधी कधी सुरूवातीला ५ ते ६ प्रश्न खूपच सोपे येतात आणि आपण relax होतो आणि उत्तरे तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच खऱ्या चूका होत असतात हे लक्षात ठेवा.
नवोदयचे खरे मेरीट हे गणितातील ४ ते ५ प्रश्नावरच फिरत असते हे लक्षात ठेवा .
स्पर्धा खूप आहे हे लक्षात ठेवा.प्रत्येक जिल्ह्यात १० हजार मुले नवोदय परीक्षेला बसलेले आहेत आणि जागा आहेत फक्त ८० .तुम्ही पेपर सोडविताना हाच एक विचारा करा की जागा कितीही असोत त्यात एक जागा तुमची नक्की / fix आहे आणि याच दिशेने व्यवस्थित पाऊल टाका.पेपर छान सोडवा.
शेवटी एकच म्हणेल तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला 2 तासात 80 प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाच्या 80 मोत्यांची व्यवस्थित गुंफण करा.
सर्वांना नवोदय परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा💐
नवोदय परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी सराव म्हणून खालील दिशादर्शक आदर्श उत्तरासह प्रश्नमंजुषा सोडवा
नवोदय सराव परीक्षा
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!