Karmchari Sarvkash Mahitilosh Circular
Karmchari Sarvkash Mahitilosh Circular
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबत.
Employees Master Database (EMDb)
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक शासन परिपत्रक क्रमांक असांस-१३२४/प्र.क्र. ९३/का.१४१७ मंत्रालय, मुंबई
दिनांक : २६ नोव्हेंबर, २०२४
वाचावे- शासन परिपत्रक, नियोजन विभाग, क्रमांक असांस-१३२४/प्र.क्र.९३/का.१४१७, दिनांक १९ ऑगष्ट, २०२४.
शासन परिपत्रक :
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची दिनांक १ जुलै, २०२४ या संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करावयाची आहे. यासाठी माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय / प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर, २०२४ च्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने / कोषागाराने पारित न करणेबाबत संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये सुचना देण्यात आल्या आहेत.
२. तथापि, काही तांत्रिक कारणांमुळे सद्यस्थितीत कर्मचारी सर्वकष माहितीकोष २०२४ (EMDb-२०२४) साठीचे संकेतस्थळ कार्यान्वीत नाही. त्यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी संर्वंकष माहितीकोष २०२४ (EMDb-२०२४) मधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झालेले नाही, अशा कार्यालयांची माहे नोव्हेंबर २०२४ ची वेतन देयके अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय/प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार / अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत आणि संबंधित कोषागार / अधिदान व लेखा कार्यालयांनी अशी वेतन देयके पारित करावीत. उपरोक्त नमूद संकेतस्थळामधील तांत्रिक अडचणींचे निराकरण झाल्यानंतर सुधारित निर्देश देण्यात येतील.
३. अधिदान व लेखा अधिकारी तसेच कोषागारे / उप कोषागारे अधिकारी यांनी वरील सूचना तातडीने सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात
४. सदर परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३४३ / २०२४/कोषा प्रशा ५. दिनांक २५ नोव्हेंबर, २०२४ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या 🌐👉www.maharashtra.gov.in👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४११२६१२४८१६७८१६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
🌐👉 परिपत्रक डाऊनलोड साठी या ओळीला स्पर्श करा
कार्यासन अधिकारी,
महाराष्ट्र शासन