Issuance of Character Verification Certificate to candidates included in Maharashtra TET Malpractice selected in Pavitra Portal Teacher Recruitment Process Year 2023-24

Issuance of Character Verification Certificate to candidates included in Maharashtra Teacher Eligibility Test malpractice selected in Pavitra Portal Teacher Recruitment Process Year 2023-24..

Vidyarthynche Aadhaar Pramnikaran

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत (दुसरा व चौथा मजला) सर्व्हे नं. 832 ए, प्लॉट क्र. 178 व 179, बालचित्रवाणी जवळ आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे, भांबुर्ड, शिवाजीनगर पुणे

जा.क्र. मरापप/बापवि/2024/2095 दि. 17/05/2024

प्रति,

  1. पोलीस उपायुक्त,
  2. सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर, पुणे-411001.
  3. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पुणे-411005.

विषयः- पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया सन 2023-24 मध्ये निवड झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारातील समाविष्ट उमेदवारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे बाबत.

Regarding issuance of Character Verification Certificate to candidates included in Maharashtra Teacher Eligibility Test malpractice selected in Pavitra Portal Teacher Recruitment Process Year 2023-24..

संदर्भ

:- 1. जा.क्र/म.रा.प.प/बापवि/2024/1505, दि.21.3.2024.

  1. शासन पत्र क्र.संकीर्ण-2024/प्र.क्र. 03/टिएनटी-1, दि. 12.01.2024.
  2. या कार्यालयाचे पत्र जा.क्र/म.रा.प.प/बापवि/2024/1536, दि.22.3.2024.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, शिक्षक पात्रता परीक्षा सन 2019 व सन 2018 मधील गैरप्रकाराबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर, पुणे या ठिकाणी अनुक्रमे गु.र.नं. 56/2021 व 58/2021 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2019 मधील गैरप्रकारामध्ये 7874 परीक्षार्थी व शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2018 मधील गैरप्रकारामध्ये 1663 परीक्षार्थी असे एकूण 9537 परीक्षार्थी समाविष्ट असून संबंधितांची दि.3/8/2022 व 14/10/2022 रोजीच्या या कार्यालयाच्या आदेशान्वये गैरप्रकारातील परीक्षार्थीची सदर परीक्षेतील संपादनूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले आहे. परंतु सदरचे परीक्षार्थी पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियामध्ये मा. न्यायालयाच्या आदेशान्वये स्व-प्रमाणपत्र भरून समाविष्ट होऊन, त्यापैकी काही उमेदवारांची सदर भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून निवड झाली आहे.

pdf स्वरुपात हवी असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

उपरोक्त संदर्भीय पत्र क्र.2 अन्वये गैरमार्ग अवलंबिणाऱ्या संबंधित उमेदवारांवर गुन्हे नोंदविणेबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत आणि याबाबत सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्याशी पत्रव्यवहार देखील केलेला/सुरू आहे. या अनुषंगाने या कार्यालयाने संदर्भीय पत्र क्र. 3 अन्वये दाखल गुन्ह्यामधील चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यात येऊ नये असे कळविलेले आहे. तथापि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा पोलिसांचा असून त्यास

अनुसरून पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात येत आहे :-

TET गैरप्रकारातील एकूण 9537 उमेदवारांची यादी आपणाकडूनच प्राप्त झालेली असून राज्यातील

सर्व पोलीस स्टेशनला जिल्हा कार्यालयामार्फत आपण उपलब्ध करून द्यावी आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) गैर प्रकारामध्ये दाखल गुन्ह्यामधील (गु.र.नं.56/2021 व 58/2021) समाविष्ट असलेल्या उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी साठीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर, संबंधित उमेदवाराची वस्तुस्थिती पाहून

नियमानुसार आपल्या स्तरावर चारित्र्य पडताळणीची कार्यवाही करावी अशी आपणास विनंती करण्यात येत आहे.

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.

प्रत माहितीस्तव सविनय सादरः- 1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-32.

  1. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-01. 3. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, पुणे-01.

1 thought on “Issuance of Character Verification Certificate to candidates included in Maharashtra TET Malpractice selected in Pavitra Portal Teacher Recruitment Process Year 2023-24”

Leave a Comment

error: Content is protected !!