Inspire Award MANAK
Inspire Award MANAK
Regarding the publication of the list of awardee students for the INSPIRE Award MANAK Scheme session 2025-26.
क्रमांक: सर्विशिस / INSPIREAward/at.वि.या-2025-26/24)/2026
दिनांक :- 17/06/2026
प्रति,
1) शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. (सर्व)
2) शिक्षण निरीक्षक, मुंबई (दक्षिण पश्चिम उत्तर)
विषय:- INSPIRE Award MANAK योजना सत्र 2025-26 करिता अवार्डी विद्यार्थ्यांची यादी प्रसारित करणेबाबत.
संदर्भ :- Sanctioned order 12011/22/2025/INSPIRE (Maharashtra) Date: 25 Feb 2026.
उपरोक्त संदर्भाकित विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, INSPIRE Award MANAK योजनेंतर्गत सन 2025-26 करिता एकूण 2303 अवार्डी विद्यार्थ्यांची यादी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार नवी दिल्ली. (DST) यांच्यामार्फत संकेत स्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
सदर 2303 अवार्डी विद्यार्थ्यांची यादी संबंधित जिल्ह्याच्या नावासह PDF च्या स्वरुपात संलग्न कस्त आहोत. आपण आपल्या जिल्ह्यातील आपले अधिनस्त सर्व गट शिक्षणाधिकारी, विज्ञान पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, संबंधित शाळा व मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विज्ञान अध्यापक मंडळ व साथन व्यक्ती यांना याबाबत अवगत करावे. तसेच सर्व संबंधित शाळांना व संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचा रेफरन्स नंबर मिळणे आवश्यक आहे. करिता आपले स्तराहून योग्य कार्यवाही करण्यात यावी. सदर यादी शाळांना http://www.inspireawards-dst.gov.in या संकेत स्थळावर स्कूल लॉगीनला पहावयास मिळेल.
सहपत्रः- परिपत्रक 2025-26 अवार्डी विद्यार्थ्यांची यादी (PDF) साठी या ओळीला स्पर्श करा
संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर
________ ALSO READ ________
Action Points for Schools for Implementation of INSPIRE – MANAK Scheme Session 2025-26 Enrollment
क्रमांकः सविलिस INSPIRE Award/2025-26/950/2025
दिनांक:-02/05/2025
विषय:- INSPIRE – MANAK योजना सत्र 2025-26 नामांकनात्या अंमलबजावणी करिता शाळांसाठी कृतीचे मुद्दे (Action Points).
संदर्भ :- डॉ. नितीन मौर्य शास्त्रज्ञ आणि NIF समन्वयक INSPIRE – MANAK यांचे पत्र क्र. NIF/INSPIRE/MANAK/04/21 दिनांक 29/04/2025.
उपरोक्त संदर्भाकित विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, INSPIRE MANAK योजनेंतर्गत सन 2025-26 करिता online नामांकन प्रक्रिया लवकरच INSPIRE MANAK वेब पोर्टलद्वारे सुरु होईल.
🌐
https://inspireawards-dst.gov.in
INSPIRE MANAK कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि सर्वोत्तम नाविन्यपूर्ण तांत्रिक कल्पना नवकल्पना नामांकित करण्यासाठी, संदर्भीय पत्रान्वये, शाळांसाठी कृतीचे मुद्दे (Action Points) देण्यात आलेले आहेत. आपल्या अधिनस्त इ. 6 वी ते 10 वी पर्यंतच्या सर्व शाळांना याबाबत अवगत करण्यात यावे.
शाळांसाठी कृतीचे मुद्दे (Action Points):-
- घोषणाः- इ. 6 वी ते 10 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना असेम्ब्ली, सूचना फलक, इ.द्वारे या तांत्रिक/नाविन्यपूर्ण स्पर्धेचा व्यापकपणे प्रचार करा जेणेकरून नामांकन तारीख जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनासह तयार राहतील.
- नवकल्पना निर्मितीः मूळ कल्पना कशा विकसित कराव्या याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. दर्जेदार नवकल्पनांची उदाहरणे सामायिक करा तसेच “अभिनव कहानिया” हे नवीन शोधांवर आधारित कॉमिक पुस्तक संदर्भासाठी वापरा.
- उन्हाळी सुट्टीतील गृहपाठः- विद्यार्थ्यांना नवीन समस्या ओळखण्याचे काम सोपवा आणि उन्हाळी सुट्टीत त्या समस्या सोडविण्यासाठी उपाय शोधणे सुचवा. मूळ कल्पना तयार करा.
- नवकल्पना पेटी (Idea Box):- एक नवकल्पना पेटी तयार करा आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण नवकल्पनांचे संकलन करा.
- कल्पना/नवकल्पनाची निवडः उन्हाळी सुट्टीनंतर कल्पना स्पर्धा आयोजित करा किंवा विद्यार्थ्यांनी नवकल्पना पेटीत संकलीत केलेल्या कल्पनांचे पुनरावलोकन करा. विद्यार्थ्यांच्या कल्पनांची मौलिकता पडताळणी महत्वाची आहे.
- शाळेचा U-DISE code पडताळणी आवश्यकः शाळेच्या U-DISE code सहभागाची खात्री करा.
- नवीन शाळांची नोंदणी:- नवीन शाळां पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात.
- विद्यार्थ्यांचे बँक खातेः विद्यार्थ्यांना जर INSPIRE MANAK-2025-26 मध्ये सहभागी व्हायचे असेल तर, त्यांच्या बँक खात्याचे तपशील सहज उपलब्ध असावेत असा सल्ला द्यावा.
- नामांकनेः-पोर्टल किंवा APP द्वारे पाच सर्वोत्तम नामांकन अचूकपणे Submit करा. प्रत्येक विद्याथ्यचि नाव त्याच्या बँक खात्याशी तंतोतंत जुळत आहे का याची दोन वेळा तपासणी करा आणि बरोबर असल्याची खात्री करा. बँक खाते क्र. आणि IFSCode महत्वाचा आहे.
- नामांकने अग्रेषित करणे:-नामनिर्देशन जिल्हा प्राधिकरण (शि.अ. माध्य.) यांचेकडे पाठवा आणि तुमच्या नोंदीसाठी पावती Download करा.
तरुण विद्यार्थ्यांमध्ये अनोख्या कल्पना रुजविण्यासाठी आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षकांना वरील कृती बिंदूची अंमलबजावणी करण्यास सूचित करावे.
या योजनेचा जास्तीत-जास्त फायदा मिळवून देण्यासाठी अगदी दुर्गम जिल्हयामधूनही जास्तीत-जास्त मूळ कल्पना/नवकल्पना एकत्रित करण्याव्साठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
सहपत्रः-संदर्भिय पत्र.
नोट:- संदर्भ पुस्तके Download करण्यासाठी सहपत्रातील link
सहपत्र:- 1. संदर्भिय पत्र. 2.निवडप्राप्त विद्यार्थी यादी pdf copy link
