Inspire Award MANAK योजना जिल्हास्तरीय स्पर्धा DLEPC SLEPC -2023-24 चे आयोजन

Inspire Award MANAK

image 33
Inspire Award MANAK

Inspire Award MANAK

INSPIRE-MANAK-District & State Level Exhibition (DLEPC/SLEPC) 2023-24

(राज्य विज्ञान शिक्षण संस्था)
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण)
रविनगर, नागपूर

क्रमांक सविशिमं Inspire -MANAK DLEPC-2023-24/10 2025

दिनांक 07/02/2025 10/02/2025

विषय:- Inspire Award-MANAK योजना जिल्हास्तरीय स्पर्धा (DLEPC)-2023-24चे आयोजन करणेबाबत.

संदर्भ:- मा. नितीन मौर्य, Scientist & NIF Coordinator Inspire -MANAK अहमदाबाद यांचा ई-मेल संदेश दिनांक 23 जानेवारी 2025.

अधिक जाणून घ्या INSPIRE-MANAK District And State Level Exhibition DLEPC SLEPC) 2023-24 या ओळीला स्पर्श करून

उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, Inspire Award-MANAK योजना सत्र 2023-24 चे महाराष्ट्रातील एकूण 2149 विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करणेबाबत संदर्भिय पत्रान्वये निर्देश प्राप्त आहेत. ज्या जिल्ह्यातील निवडप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, अशा 3 ते 4 जिल्ह्यांना एकत्रित करून त्यापैकी एका जिल्ह्यास सदर प्रदर्शनीच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात येईल. सद्यस्थितीत इयत्ता 10 वी, 12 वी च्या परीक्षेचा काळ असल्यामुळे, सदर Inspire MANAK जिल्हास्तरीय प्रदर्शनी उपरोक्त लेखी परीक्षेनंतर मार्च एप्रिल 2025 मध्ये आयोजित करण्याचा मानस आहे. याबाबत निश्चित तारखा जिल्ह्यांना यथाशिघ्र कळविण्यात येतील.

image 34

तरी आपण आपल्या जिल्ह्यातील निवडप्राप्त विद्यार्थ्यांना व संबंधित शाळांना त्यांच्या Prototype सह तयारीत राहणेबाबत कळवावे.

सहपत्र:- 1. संदर्भिय पत्र. 2.निवडप्राप्त विद्यार्थी यादी pdf copy link

    संचालक

    राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर

    प्रतिलिपी-

    1. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना माहितीस्तव सविनय

    सादर

    1. मा. संचालक, NIF, अहमदाबाद यांना माहितीस्तव सविनय सादर
    2. मा. शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग यांना माहितीस्तव समादराने सादर
    3. मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व यांना माहितीस्तव समादराने सादर

    Leave a Comment

    error: Content is protected !!