Ineligible names of teachers non teaching staff in Shalarth Pranali salary payment investigation by SIT राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथक मार्फत चौकशी करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

Ineligible names of teachers non teaching staff in Shalarth Pranali salary payment investigation by SIT

Ineligible names of teachers non teaching staff in Shalarth Pranali salary payment investigation by SIT

Regarding the investigation through a Special Investigation Team (S.I.T.) regarding the irregular inclusion of the names of ineligible teaching and non-teaching employees in the state in the Shalaarth system and payment of salaries.

राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथक (S.I.T.) मार्फत चौकशी करण्याबाबत…

दि. ०७ ऑगस्ट, २०२५

प्रस्तावना:-
राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधी, संघटना व तक्रारदार नागरिक यांचेकडून शासनास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुषंगाने राज्यात नागपूर, नाशिक, जळगाव, बीड, लातूर, मुंबई इत्यादी ठिकाणी असे गैरप्रकार आढळून आल्याबाबतच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत. त्यानुषंगाने विशेष चौकशी पथक (S.I.T.) नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

    शासन निर्णय

राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात पुढीलप्रमाणे विशेष चौकशी पथक (S.J.T.) स्थापन करण्यात येत आहे.

१) श्री. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे (I.A.S.)- पथक प्रमुख

२) श्री. मनोज शर्मा, पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य (I.P.S.)- सदस्य

३) श्री. हारुन आतार, सह संचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन), शिक्षण आयुक्तालय यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे- सदस्य सचिव

२. विशेष चौकशी पथकाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे असेल :-

1.राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैयक्तिक मान्यता / शालार्थ मान्यता/सेवासातत्य/विना अनुदानीत वरुन अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करणे व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणे.

H. शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या देण्यात येणा-या विविध मान्यतांच्या संदर्भात उदा. वैयक्तिक मान्यता/ शालार्थ मान्यता इत्यादिंच्या अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्यानुषंगाने कराव्याच्या बदलाबाबत सुधारणा सुचविणे.

३. विशेष चौकशी पथकाने उपरोक्त कार्यकक्षेमधील नमुद प्रकरणी सन २०१२ ते आजतागायत प्रकरणांची चौकशी / तपास करावा.

४. विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल चौकशी पथक गठित झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत शासनास सादर करावा.

५. सदर चौकशी कालावधीमध्ये विशेष चौकशी पथकाकडुन केलेल्या मागणीनुसार मनुष्यबळ व तांत्रिक सहाय्य आयुक्त (शिक्षण), पुणे कार्यालयाद्वारे पुरविण्यात यावे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०८०७१७४४१३७७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र. एसआयटी-२०२५/प्र.क्र.५५/प्रशा.३ मुंबई

IMG 20250807 183535
Ineligible names of teachers non teaching staff in Shalarth Pranali salary payment investigation by SIT

Leave a Comment

error: Content is protected !!