Increase In Remuneration Of BLO भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामानधनात वाढ करणे बाबत शासन निर्णय

Increase In Remuneration Of BLO

Increase In Remuneration Of BLO

Increase in the remuneration of BLO

Increase in the remuneration of Polling Station Level Officers (BLOs)

Kendra stariy Adhikari matdan Wadh

भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या
मानधनात वाढ करणे.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक:- ईएलआर-२०२५/प्र.क्र.७०/२५/नि-६, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १ सप्टेंबर, २०२५

वाचा:
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रः ईएलआर-१०१४/प्र.क्र.२९४/१४/३३. दिनांक २१ मार्च, २०१४,

२) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. २३/आयएनएसटी/२०१५-ईआरएस, दि.०८ जुलै, २०१५.

३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. ईएलआर-२०१९/प्र.क्र.९१८/१९/३३. दिनांक २६ सप्टेंबर, २०१९

४) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. २३/बीएलओ /२०२५-ईआरएस, दिनांक २४ जुलै, २०२५.

प्रस्तावना:-

महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (Booth Level Officers) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

२. मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची महत्वाची भूमिका आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांव्दारे विशेषतः मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविणे, विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणी यासाठी घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करणे, तसेच वेळोवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे इ. कामे करण्यात येतात. तसेच छायचित्र मतदार याद्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णतः अचूक होण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer) यांना सहाय्य करणे, मतदारांना मतदार चिड्डी (Voter Slip) वाटप करणे व मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे इ. कामे ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) करीत असतात. सदर कामे ते त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करीत असतात. त्याकरीता दिनांक २६ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयान्वये भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शानुसार मतदार केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) यांना प्रतिवर्षी रु.६,०००/- या दराने मानधन तसेच त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जावून केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी रु.१,०००/- वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येते.

३. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक २४.०७.२०२५ च्या पत्रान्वये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना रु.६,०००/- ऐवजी रु.१२,०००/- मानधन देण्याबाबत व प्रत्यक्ष पडताळणीसाठी (विशेष

शासन निर्णय क्रमांकः ईएलआर-२०२५/प्र.क्र.७०/२५/नि-६

संक्षिप्त/संक्षिप्त पूनरिक्षण आणि इतर विशेष कार्यक्रम याकरिता) रु.१,००० ऐवजी रु.२,०००/-वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

  शासन निर्णय

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (Booth Level Officers) प्रतिवर्षी रु.६,०००/- ऐवजी १२,०००/- (रु.बारा हजार फक्त) एवढे सुधारीत मानधन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

Election Commission doubles the remuneration for Booth Level Officers; Enhances remuneration for BLO Supervisors

२. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officers) यांना, त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी (विशेष संक्षिप्त/संक्षिप्त पूनरिक्षण आणि इतर विशेष कार्यक्रम याकरिता) रू. १,०००/- ऐवजी रु. २,०००/- या सुधारीत दराने वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर सुधारित मानधन / वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधनच्या उपरोक्त तरतूदी दिनांक ०१.०९.२०२५ पासून अनुज्ञेय होतील.

४. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च २०१५-निवडणूका, १०३-मतदारांच्या याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण (००) (०१) मतदार याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण, १३ कार्यालयीन खर्च, संगणक संकेतांक २०१५००३२ या लेखाशीर्षाखाली खर्ची घालावा व संबंधित वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.५०७/व्यय-४, दि.०५.०८.२०२५.

अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०९०१११३८५०७५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

शासन निर्णय पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

IMG 20250901 135045
Increase In Remuneration Of BLO

Leave a Comment

error: Content is protected !!