Importing Students From Dropbox Into UDISE Plus online System In Schools
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
समग्र शिक्षा
निपुण भारत
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र. मप्राशिप/सशि/यु-डायस संगणक/२०२६-२७/
दिनांक : ई-स्वाक्षरीत नमूद
विषय : Dropbox मधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळेमध्ये Import करून Active for Import शून्य करणेबाबत.
संदर्भ: भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.N०.२३-६/२०२६-Stats दि. १४ जुलै, २०२६.
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने यु-डायस प्लस प्रणालीमाये विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणेची कार्यवाही शाळा स्तरावरती सुरू आहे. दि. ०१/०१/२०२६ रोजीच्या अहवालानुसार सन २०२६-२० या वर्षामध्ये ११,५१,५२५ विद्यार्थी Dropbox मध्ये Active for Import साठी उपलब्ध आहेत. सन २०२५-२६ व २०२६-२० मध्ये नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तुलना केली असता पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली, इयत्ता ४थी, ५वी, ८वी, व इयत्ता ११वी मध्ये जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणी/import करणे बाकी असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी दि. ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत वेळ दिली आहे. याबाबत आपणास कळविण्यात येते की, आपल्या स्तरावरून Dropbox मधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळेमध्ये import करून घेण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात यावे. तालुका/केंद्र स्तरावर Dropbox मधील Active for Import साठी असलेले विद्यार्थी Import करून घेण्याचे अनुषंगाने कॅम्प आयोजित करण्यात यावे. सदर कार्यशाळेला जास्त विद्यार्थी Active for Import साठी आहेत अशा शाळेच्या मुख्याध्यापकांना कॅम्पसाठी माहितीसह उपस्थित राहण्याकरिता कळविण्यात यावे. जिल्हा स्तरावरून Active for import साठीचे विद्यार्थी शून्य करण्याचे अनुषंगाने दररोज आढावा घेण्यात यावा.
Dropbox मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची शाळानिहाय व विद्यार्थ्यांच्या नावासह माहिती जिल्हा संगणक प्रोग्रामर व तालुक्या स्तरावरील MIS-Coordinator व ऑपरेटर यांच्याकडे यु-डायस प्लस प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थ्यांना import करतांना शाळेच्या मुख्यध्यापकांना तांत्रिक अडचणी येत असल्यास जिल्हा व तालुक्याचे संगणक प्रोग्रामर, MIS-Coordinator व ऑपरेटर यांच्याकडे संपर्क साधावा. जिल्हा व तालुका स्तरावरून अडचण सोडविल्या जात नसल्यास राज्य कार्यालयास लेखी कळविण्यात यावी.
जिल्हा कार्यालयामध्ये समग्र शिक्षांतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे काम पहाणारे पर्यायी शिक्षण समन्वयक कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने Dropbox मधील Dropout विद्यार्थ्यांच्या माहितीची पडताळणी करून प्रवेश घेतलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना import करण्याबाबत संबंधित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात यावे.
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती अंतिम झाल्यानंतर सदर माहितीच्या उपयोग विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने संच मान्यता, ATE प्रवेश, इयत्ता ११वी ऑनलाईन प्रवेश, Mid Meal Scheme, पाठ्यपुस्तक, गणवेश, समग्र शिक्षा, पी.एम.श्री. इत्यादी योजनांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शाळांनी भरलेली माहिती वस्तुनिष्ट अचूक असणे आवश्यक आहे.
सोबत : परिपत्रक व Dropbox अहवाल पीडीएफ लिंक
Digitally signed by Devidas Balkrishna Kulal Date: 03-09-2026
16 20:23 (देविदास कुलाळ) सह संचालक (प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.
जा.क्र.मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/U-DISE/२०२५-२६/२915
दिनांक : 26 SEP 2025
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक),
जिल्हा परिषद, सर्व.
विषयः सन २०२५-२६ या वर्षामध्ये यु-डायस प्लस प्रणालीतील Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी कमी करणेबाबत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने दि. २४ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या Dropbox अहवालानुसार राज्यामध्ये ९२७०४१ एवढे विद्यार्थी Dropbox मध्ये दिसून येत आहे. सदरचे विद्यार्थी सन २०२४-२५ या वर्षामध्ये शाळांमध्ये शिक्षण घेत होते. सन २०२५-२६ या वर्षामध्ये विद्यार्थीनी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्या शाळेमध्ये Dropbox मधून Import करून घेणे आवश्यक आहे, जेणे करून विद्यार्थ्यांचे दुबार नोंदणी होणार नाही.
शाळानिहाय Dropbox मधील विद्यार्थ्यांची माहिती Import करून घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तात्काळ आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना Dropbox मधून प्रवेश घेतलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला Import करून घेण्यासाठी आदेशित करावे.
सोबत : Dropbox मधील विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी.
राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत माहितीस्तव :-
१) मा. आयुक्त शिक्षण, आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य पुणे.
३) मा. शिक्षण संचालक (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य पुणे.
ALSO READ 👇

Importing Students From Dropbox Into UDISE Plus online System In Schools
GOVERNMENT OF MAHARASHTRA SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT SAMAGRA SHIKSHAN MAHARASHTRA PRATHAMIK SHIKSHAN PARISHAD
जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४-२५/3686
दिनांक: 17 DEC 2024
प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
३) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,
विषयः यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करून घेणेबाबत.
🌐👉
👈
संदर्भ : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला Dropbox अहवाल.
सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून यु-डायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
दि. १७ डिसेंबर, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये १२,१९,०६१ एवढे विद्यार्थी Dropbox मधून शाळांमध्ये Import करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. सदर विद्यार्थी Import केल्याशिवाय यावर्षी यु-डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंतच्या वर्गामध्ये New Entry करता येणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने माहिती Transfer करून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविता येईल.
शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने Entry न करता Dropbox मधून विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत Import करणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या
Dropbox मधील Active for Import Status असलेले विद्यार्थी तात्काळ Import करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, जेणेकरून Dropbox मधील विद्यार्थ्यांची संख्या शून्य करता येईल.
सोबत : Dropbox Report Link
(आर. विमला, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.
New Update Importing Students From Dropbox Into UDISE Plus online System In Schools
ALSO READ👇

Importing Students From Dropbox Into UDISE Plus online System In Schools
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४-२५/१७११
दिनांक: 29 JUN 2304
प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
३) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
विषयः यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करून घेणेबाबत.
संदर्भ : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला Dropbox अहवाल.
सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून यु-डायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
दि. २८ जून, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये २३,४७,३८६ एवढे विद्यार्थी Dropbox मधुन शाळांमध्ये Import करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. यावर्षी यु-डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता ररी ते इयत्ता १२वी पर्यंतच्या वर्गामध्ये New Entry करता येणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने माहिती Transfer करून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविता येईल.
🌐👉 Link
शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने Entry न करता Dropbox मधुन विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत Import करणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या
संकेतस्थळ
🌐 Link
🌐 Link
Dropbox मधील Active for Import Status असलेले विद्यार्थी तात्काळ Import करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, जेणेकरून Dropbox मधी विद्यार्थ्यांची संख्या शुन्य करता येईल.
सोबत : Dropbox Report.

(प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.
