आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, घटकसंच, कृतीपुस्तिका शाळास्तरावर अंमलबजावणी करण्याबाबत Implementation of disaster management reading materials component sets workbooks at school level

Implementation of disaster management reading materials component sets workbooks at school level

Implementation of disaster management reading materials component sets workbooks at school level

Regarding implementation of disaster management reading materials, component sets, workbooks at school level

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जा.क्र./राशैसंप्रपम/सा.शा.वि/आ.व्य./२०२५/
दिनांक : /११/२०२५

विषयः- आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, घटकसंच, कृतीपुस्तिका शाळास्तरावर अंमलबजावणी करण्याबाबत….

Aapti Vyavsthapan Vachan Ghtaksanch Krutipustika Shalastravar Amalbajavni

संदर्भ: १. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय व युनिसेफ सदस्य यांच्या सोबत झालेली बैठक
दिनांक- २०/०२/२०२५.
२. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांचे निर्देश दिनांक-११/८/२०२५.
३. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांची मान्य टिपणी दि.३० /०८/२०२५.
४. प्रस्तुत कार्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापन साहित्त्य.

उपरोक्त संदर्भिय विषयानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, घटकसंच, कृतीपुस्तिका उपयोगात आणण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. सदर साहित्य मुलांचे शिक्षण आणि एकूणच जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. निरंतर शिक्षणासाठी शाळा अनुकूल वातावरण प्रदान करण्यासोबतच मुलांमध्ये NEP च्या उद्दिष्टांनुसार २१ व्या शतकातील कौशल्यांचा (समीक्षात्मक विचार, सर्जनशीलता, सहकार्य आणि संवाद कौशल्ये) विद्यार्थ्यांमध्ये विकास होण्यास मदत होईल.
विद्यार्थी व शालेय समुदायाची (शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, आणि शालेय प्रशासन) आपत्ती विषयक समज, क्षमता वृद्धी, आणि आपत्तीची जोखीम करण्याबाबतचे कौशल्य वाढविण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. तद्नुसार आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, आपत्ती व्यवस्थापन घटकसंच, आपत्ती व्यवस्थापन कृतीपुस्तिका शाळास्तरावर वापराबाबत मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत.

आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, आपत्ती व्यवस्थापन घटकसंच, आपत्ती व्यवस्थापन कृतीपुस्तिका वापराबाबत मार्गदर्शक सूचना

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथील सामाजिकशास्त्र विभागाने युनिसेफच्या (UNICEF) मदतीने महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, आपत्ती व्यवस्थापन घटकसंच, आपत्ती व्यवस्थापन कृतीपुस्तिका तयार करण्यात आलेले आहे.
आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य पुस्तिका ही शालेय स्तरावरील सर्व स्तरांसाठी एकच आहे. शिक्षकांनी या पुस्तिकेचे सविस्तर वाचन करणे अपेक्षित आहे. आपत्तीचे मुख्य प्रकार, उपप्रकार, त्याची कारणे, आपत्ती येण्यापूर्वी, आपत्ती आल्यानंतर काय करावे व आपत्तीनंतर जागरूक राहून काय करणे अपेक्षित आहे याविषयीचे विवेचन या पुस्तिकेत केले आहे.
शिक्षकांनी या पुस्तिकांचा उपयोग शिक्षक मार्गदर्शिका’ म्हणून करणे अपेक्षित आहे. शिक्षक ज्या स्तराला अध्ययन-अध्यापन करत असतील त्या स्तरासाठी या पुस्तिकेत दिलेल्या आपत्तींविषयी कोणते व कसे अध्ययन अनुभव देता येतील याची दिशा मिळण्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शक आहे.
आपत्ती व्यवस्थापन घटकसंच आणि आपत्ती व्यवस्थापन कृतीपुस्तिका या स्तरनिहाय (पायाभूत, पूर्वतयारी, पूर्वमाध्यमिक व माध्यमिक) तयार करण्यात आलेल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन घटकसंच विविध शालेयस्तरावर अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी उपयोगी ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना अध्यापन करताना कोणते अनुभव व ते कसे द्यावेत, कोणती प्रात्यक्षिके, कशी करून घ्यावीत, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाची माहिती कशी देता येईल याविषयीचे नियोजन या पुस्तिकेत दिले आहे.
विद्यार्थी कृतिपुस्तिका स्तरनिहाय तयार करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक स्तराच्या विद्यार्थ्यांकडून विविध आपत्तींविषयी कोणत्या कृती व कशा करून घेता येतील याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
ही कृतिपुस्तिका विद्यार्थ्यांसाठी आहे. मुलांनी त्यातील कृती स्वतः मित्रांच्या मदतीने किंवा शिक्षकांच्या मदतीने पूर्ण करणे अपेक्षित आहे.
कृती कोणत्या प्रकारची आहे. ती कशी व केव्हा करून घ्यायची याचे नियोजन शिक्षकांनी केले पाहिजे.
‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत या कृतींचे वेळापत्रक शाळा व वर्ग स्तरावर तयार करून कृती घेतल्या जाव्यात. काही प्रात्यक्षिके सुचवली आहेत. ती शिक्षकांनी स्वतःच्या निरीक्षणाखालीच घेण्यात यावीत.
तसेच यामध्ये क्यूआर कोड देण्यात आले आहेत. एखादया आपत्तीविषयी अधिक सखोल माहिती पीडीएफ तसेच ध्वनिचित्रफितीच्या स्वरुपात उपलब्ध होणार आहे. त्यांचा योग्यवेळी उपयोग करून आवश्यक तेथे ध्वनिचित्रफित दाखवावी.
तीनही पुस्तिकांचा उपयोग करून आपत्तींना सामोरे कसे जावे, आपत्कालीन स्थितीत माझी भूमिका काय असेल, काय करावे व काय करू नये, प्रथमोपचार कसे करावे या सर्व बाबी मुलांपर्यंत पोहोचवता येतील.

Implementation of disaster management reading materials component sets workbooks at school level
Implementation of disaster management reading materials component sets workbooks at school level

आपत्ती व्यवस्थापन

अनु.क्रं.

         विषय लिंक
  1. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण वापराबाबत मार्गदर्शक सूचना

Open

https://www.maa.ac.in/documents/Aapatti_wyawasthapan_Prashikshan_Margdarshak_Suchana.pdf

  1. आपत्ती व्यवस्थापन -कृतिपुस्तिका

Open

https://drive.google.com/file/d/1xFcECBWsI2FtBoYEcmE9MsPJ6-MAUbF2/view?usp=drive_web

  1. आपत्ती व्यवस्थापन -घटकसंच (पायाभूत व पूर्वतयारी स्तर)

Open

https://drive.google.com/file/d/1qOGEQcE2xohbnkFBHqvCThmz8xVw271R/view?usp=drive_web

  1. आपत्ती व्यवस्थापन -घटकसंच (पूर्वमाध्यमिक व माध्यमिक स्तर)

Open

https://drive.google.com/file/d/1ymC_8Ftw8BPQ8ZtPDy11KT5-TS1Riexo/view?usp=drive_web

  1. आपत्ती व्यवस्थापन -घटकसंच आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य

Open

https://www.maa.ac.in/documents/Aapatti_Vyavasthapan_Vachan_Sahitya.pdf

आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, आपत्ती व्यवस्थापन घटकसंच, आपत्ती व्यवस्थापन कृतीपुस्तिका या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या www.maa.ac.in या वेबसाईटवर उपल्ब्ध आहेत. तद्नुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सदर उपक्रम राबवण्याबाबत आपल्यास्तरावरून आदेशित करण्यात यावे.

परिपत्रक पीडीएफ लिंक

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Implementation of disaster management reading materials component sets workbooks at school level
आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, घटकसंच, कृतीपुस्तिका शाळास्तरावर अंमलबजावणी करण्याबाबत
आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, आपत्ती व्यवस्थापन घटकसंच, आपत्ती व्यवस्थापन कृतीपुस्तिका वापराबाबत मार्गदर्शक सूचना
Implementation of disaster management reading materials component sets workbooks at school level आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, घटकसंच, कृतीपुस्तिका शाळास्तरावर अंमलबजावणी करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य, आपत्ती व्यवस्थापन घटकसंच, आपत्ती व्यवस्थापन कृतीपुस्तिका वापराबाबत मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ७०८, आरबी कुमठेकर मार्ग, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०.
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
४. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व
५. शिक्षण उपनिरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) मुंबई
६. प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा./न.प.सर्व.

Leave a Comment

error: Content is protected !!