शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्याबाबत Implementation of Cashless Health Scheme from June 2024 to Teaching And Non Teaching Staff of Private Aided Schools

Implementation of Cashless Health Scheme from June 2024 to Teaching And Non Teaching Staff of Private Aided Schools

विपऔ-2025/(02/25)/ टीएनटी-५

मंत्री
शालेय शिक्षण
महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई

दिनांक: 30/9/2025

विषय:- महाराष्ट्र विधानपरिषद प्रथम (अर्थसंकल्प) "औचित्याचा मुद्दा" क्र.१११ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्याबाबत.

संदर्भ:- महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे पत्र क्र.–/म.वि.स./ई-२, दिनांक:-१९.०३.२०२५.

महोदय,
शासकीय अधिकारी/कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ व त्याअनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय यामधील तरतुदीच्या अधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या २९ तसेच ११ गंभीर आजारांवर रुग्णालयात घेतलेल्या उपचारांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.१९.०३.२००५ च्या व इतर वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयान्वये वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही विहित करण्यात आलेली आहे. सदरहू शासन निर्णयास अनुसरुन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील शासकीय तसेच १००% अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्चाचे लाभ देण्यात येतात.

२. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव या विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग, नियोजन विभाग व वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर केले असता, सदर योजनेशी समरुप योजना (आयुष्मान भारत योजना, महात्मा जोतिबा फुले जण आरोग्य योजना इ). केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. तसेच राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची संख्या विचारात घेता सद्यस्थितीत सदर योजना राबविण्यास नियोजन विभाग व वित्त विभागाने असहमती दर्शवली असल्याने सदर योजना राज्यात लागू करणे तूर्तास शक्य नाही. उपरोक्तप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, नियोजन विभाग व वित्त विभाग चे अभिप्राय विचारात घेता

३. सदर योजना राज्यात लागू करणे तूर्तास शक्य नाही.

पत्र पीडीएफ प्रत लिंक

आपला

(दादाजी भुसे)

मा. श्री. किशोर दराडे,
विधानपरिषद सदस्य,

विधानभवन, मुंबई-३२.

प्रत – माहितीसाठी,

१. कक्ष अधिकारी (ई-२), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.

२. कक्ष अधिकारी (समन्वय), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

३. निवडनस्ती टीएनटी-५

Implementation of Cashless Health Scheme from June 2024 to Teaching And Non Teaching Staff of Private Aided Schools
Implementation of Cashless Health Scheme from June 2024 to Teaching And Non Teaching Staff of Private Aided Schools

ALSO READ 👇

IMG 20240611 213004
Implementation of Cashless Health Scheme from June 2024 to Teaching And Non Teaching Staff of Private Aided Schools

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार), दालन क्र.४३६, मंत्रालय, मुंबई

क्रमांक : संकीर्ण-२०२४/(प्र.क्र. १/२४)/टीएनटी-५

दिनांक : ११ जून, २०२४

प्रति,

१) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे

२) संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

३) संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

विषय – राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जून २०२४ पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत.

Cashless Arogya Yojana to be implemented from June 2024 for teachers and non-teaching staff of private aided schools

संदर्भ:- १) बैठक-२०२२/प्र.क्र.२१/२२/टिएनटी-५

२) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे निवेदन दि.३०.५.२०२४ चे पत्र.

महोदय,

उपरोक्त विषयासंदर्भात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे निवेदन प्राप्त झालेले आहे. निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे.

सदर निवेदनानुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त १००% अनुदानित व अंशतः अनुदानित / प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक / तांत्रिक / अध्यापक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभागनिहाय, जिल्हानिहाय व वर्गवारीनिहाय संख्या व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षनिहाय माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रात कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह तात्काळ सादर करावी, ही विनंती.

दिनांकः 11/6/2024

आपली,

(डॉ. स्मिता देसाई) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!