Procedures of Withdrawal of Pension by Old Sick Disabled Incapacitated Pensioners

Procedures of Withdrawal of Pension by Old Sick Disabled Incapacitated Pensioners

image 14
Procedures of Withdrawal of Pension by Old Sick Disabled Incapacitated Pensioners

Procedures of Withdrawal of Pension by Old Sick Disabled Incapacitated Pensioners

अतिवार्धक्यामुळे आणि / किंवा शारीरिक व्याधी आणि दूर्धर आजारांमुळे दुर्बलता – विकलांगता – अक्षमताग्रस्त निवृत्तिवेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतन किंवा कुटुंब निवृत्तिवेतनासंबंधीचे बँकींग व्यवहार हाताळण्यामध्ये येणा-या अडचणी दूर करणेसाठी कार्यपध्दती निश्चित

आजारी आणि अपंग पेन्शनधारकांना बँकांमधून पेन्शन/कौटुंबिक पेन्शन काढताना येणाऱ्या समस्या/अडचणींची काळजी घेण्यासाठी, एजन्सी बँक अशा पेन्शनधारकांना खालीलप्रमाणे वर्गीकृत करू शकतात

Procedures laid down to remove difficulties faced by pensioners or family pensioners with infirmity – disability – disability due to old age and / or physical ailments and chronic diseases in handling banking transactions related to their pension or family pension.

Withdrawal of pension by old / sick / disabled / incapacitated pensioners

In order to take care of problems/ difficulties faced by sick and disabled pensioners in withdrawal of pension / family pension from the banks, agency banks may categorize such pensioners as under:

महाराष्ट्र शासन वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण २०२३/प्र.क्र.७७/कोषा-प्रशा५
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक: ११ जून, २०२४


वाचा :

(१) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण १०.०५/प्र.क्र.१९६/कोषा प्रशा ५, दि.१२ डिसेंबर, २००७.
(२) उप लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडील दि.११ जुलै २०२३ रोजीची सुनावणी.
(३) अभिकर्ता बँकांद्वारे शासकीय निवृत्तिवेतनाचे संवितरण याबाबतचे भारतीय रिझर्व्ह बँक यांचे Master Circular RB1/2024-25/06 DGBA. GBD.No.S1/31.02.007/2024-25, Dated April 01, 2024.
प्रस्तावनाः
अ) प्रचलित कार्यपध्दती प्रमाणे निवृत्तिवेतनाचे प्रदान संबंधित निवृत्तिवेतनधारकांच्या बँक खात्यांमध्ये करण्यात येत असून सदर बँक खात्यांमधून निवृत्तिवेतनधारक त्यांच्या गरजेप्रमाणे रकमा आहरीत करुन त्यांचा विनियोग करतात. निवृत्तिवेतनधारकांच्या सोयीसाठी उपरोक्त ‘वाचा’ मधील अनुक्रमांक १ येथे नमूद शासन निर्णयान्वये निवृत्तिवेतन संवितरणासाठी निवृत्तिवेतनधारकाच्या आणि कुटूंब निवृत्तिवेतनाचे प्राधिकारपत्र ज्या व्यक्तीच्या नावे निर्गमित करण्यात आलेले आहे, त्या वैवाहीक जीवनसाथीदार व्यक्तीच्या नावे संयुक्त बँक खाते उघडण्यास अनुमती देण्यात आलेली आहे.
ब) अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश (Dementia), स्मृतिनाश (Alzheimer), अर्धांगवायू (Paralysis), रुग्णशय्याधिनता (Bedriddenness) किंवा अन्य तत्सम शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारांच्या परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता (Debility) विकलांगता (Inability) अक्षमता (Disability) इत्यादिंमुळे काही निवृत्तिवेतनधारक किंवा कुटूंब निवृत्तिवेतनधारक त्यांच्या निवृत्तिवेतनविषयक बँक खात्याचे व्यवहार व्यक्तीशः हाताळू शकत नाहीत. अशा निवृत्तिवेतनधारकांचे वैवाहीक जीवनसाथीदार हयात असतील, तर उपरोल्लेखित शासन निर्णयान्वये अनुज्ञेय करण्यात आलेल्या संयुक्त बँक खाते सुविधेमुळे त्यांना निवृत्तिवेतनाच्या रकमा आह रेत करण्यासाठी अडचणी येत नाहीत. तथापि, ज्या निवृत्तिवेतनधारकांचे वैवाहीक जीवनसाथी द्वार हयात नसतील किंवा त्यांचे वैवाहिक जीवनसाथीदार (यथास्थिती पती / पत्नी) देखील अाच प्रकारच्या शारीरीक – मानसिक दुर्बलता विकलांगता अक्षमता यामुळे निवृत्तिवेतन विष क संयुक्त बँक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नसतील, अशा निवृत्तिवेतनधारकांना मात्र उपरोल्लोखित असमर्थतांमुळे किंवा अक्षमतांमुळे त्यांच्या निवृत्तिवेतन विषयक बँक खात्याचे व्यव हार करतांना अडचणी येत असून, हालअपेष्टांना सामोरे जावे लागत असल्याची बाब शासन व्या निदर्शनास आली आहे. या संदर्भात उचित कार्यवाही करणेबाबत उपोदघातातील ‘वाचा’ मध्ोल अनुक्रमांक २ येथे नमूद सुनावणीच्या अनुषंगाने मा. उप लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून देखील निर्देश देण्यात आलेले आहेत.
क. या पार्श्वभूमीवर अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश (Dementia), स्मृतिनाश (Alzheimer), अर्धांगवायू (Paralysis), रुग्णशय्याधिनता (Bedriddenness) किंवा अन्य तत्सम शारीरिक व्याधी आणि र्धर आजारांच्या परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता (Debility) – विकलांगता (Inabilit ) – अक्षमता (Disability) इत्यादिंमुळे निवृत्तिवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार करतांना निवृत्तिवेतनधारकांना सामोरे जावे लागत असलेल्या हालअपेष्टा आणि समस्या दूर करण्यासाठी आणि अशा निवृत्तिवेतनधारकांच्या सोयीसाठी प्रचलित विधिसंमत चौकटीमध्ये उपलब्ध असले न्या सुविधा सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याची आणि त्याबद्दल स्पष्टता करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

शासन निर्णय

१) ज्या निवृत्तिवेतनधारकांना किंवा कुटूंब निवृत्तिवेतनधारकांना अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश (Dementia), स्मृतिनाश (Alzheimer), अर्धांगवायू (Paralysis), रुग्णशय्याधिनता (Bedriddenness) किंवा अन्य तत्सम शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारांच्या परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता (Debility) विकलांगता (Inability) – अक्षमता (Disability) इत्यादिंमुळे त्यांच्या निवृत्तिवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार व्यक्तीशः हाताळणे शक्य होत नसेल, अशा निवृत्तिवेतनधारकांनी उपोद्घातातील ‘वाचा’ येथील अनुक्रमांक १ समोर नमूद शासन निर्णयान्वये कुटूंब निवृत्तिवेतनाचे प्राधिकारपत्र ज्या व्यक्तीच्या नावे निर्गमित करण्यात आलेले आहे, त्या वैवाहीक जीवनसाथीदार व्यक्तीच्या सोबत अनुज्ञेय असलेल्या संयुक्त बँक खाते सुविधेचा प्राधान्याने वापर करावा.

२) तथापि, उक्त परिच्छेद १ मध्ये नमूद परिस्थितीमुळे बाधित असलेल्या निवृत्तिवेतनधारकांचे किंवा कुटूंब निवृत्तिवेतनधारकांचे वैवाहिक जीवनसाथीदार (यथास्थिती पती / पत्नी) देखील अशाच प्रकारच्या शारीरिक मानसिक दुर्बलता विकलांगता अक्षमता इत्यादिंमुळे – निवृत्तिवेतन विषयक संयुक्त बँक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नसतील अथवा त्यांचे वैवाहिक जीवनसाथीदार हयातच नसतील, अशा निवृत्तिवेतनधारकांना / कुटूंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार हाताळण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे विहित कार्यपध्दती किंवा ‘प्रमस्तिष्क घात, मानसिक मंदता आणि बहु विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम, १९९९० अंतर्गत पालक (Guardian) नियुक्ती या दोन सुविधांपैकी त्यांना सोयीच्या असलेल्या कोणत्याही सुविधेचा वापर करता येईल.

३) भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा विहित कार्यपध्दती :

Also Read –

Implementation of ePPO eGPO eCPO System Pension Approval Order will be Available Online GR

३.१) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘अभिकर्ता बँकांद्वारा शासकीय निवृत्तिवेतनाचे संवितरण’ यासंदर्भात अभिकर्ता बँकांना मुख्य परिपत्रकाद्वारे (Master Circular द्वारे) वेळोवेळी विस्तृत मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या जातात. अलीकडे असे मुख्य परिपत्रक दिनांक ०१ एप्रिल, २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निर्गमित करण्यात आलेले आहे. उपोदघातातील अनुक्रमांक ३ समोर नमूद भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य परिपत्रकाद्वारे वृद्ध / आजारी / विकलांग / अक्षम निवृत्तिवेतनधारकांद्वारे निवृत्तिवेतनाचे आहरण याबाबत परिच्छेद ७, ८ आणि ९ अन्वये खालीलप्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे.

” वृद्ध / आजारी / विकलांग / अक्षम निवृत्तिवेतनधारकांद्वारे निवृत्तिवेतनाचे आहरण.

परिच्छेद ७. आजारी आणि विकलांग निवृत्तिवेतनधारकांना बँकांमधून निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन

काढताना येणाऱ्या समस्यांचे / अडचणींचे निराकरण करण्यासाठी, अभिकर्ता बँका अशा

निवृत्तिवेतनधारकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करू शकतातः

पुढे अधिक वाचा स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!