Implementation Of 150 Day Service Worker Program
Regarding the implementation of the 150-day service worker program
150 Day Service Worker Program On Service
implementation of 150-day service worker program in line with service related matters
सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्याबाबत
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांकः एसआरव्ही-२०२५/प्र.क्र.२७/का.१२ (सेवा), मंत्रालय, मुंबई
तारीख: ०९ जून, २०२५
प्रस्तावना :-
राज्य शासनाच्या विविध धोरणांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात अधिकारी/कर्मचारी हे महत्वाची भूमिका पार पाडतात. या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी अद्ययावत असल्यास, अधिकारी/कर्मचाऱ्यांना शासनाचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास प्रोत्साहन मिळेल, ही बाब विचारात घेता अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी विहित कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक ठरते.
अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी अद्ययावत ठेवण्याच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन, ही प्रगती गुणांकन प्रक्रियेद्वारे मोजल्यास निकोप स्पर्धा वाढीस लागून महत्वाच्या सेवाविषयक बाबी जसे सेवाप्रवेश नियम, आकृतीबंध इत्यादी बाबी अद्ययावत होतील, त्यामुळे पदोन्नती, सरळसेवा/अनुकंपा नियुक्ती इत्यादी बाबी कालबद्ध पद्धतीने पूर्ण होण्यास सहाय्यभूत ठरतील.
हा दूरगामी विचार करुन मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात मंत्रालयीन प्रशासकीय विभागात टप्पा १ व टप्पा २ मध्ये, “सेवाविषयक बाबींच्या गुणांकनाचा सेवाकर्मी कार्यक्रम” राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शासकीय कर्मचारी कार्यरत असलेल्या ९३ आस्थापनांचे ४७ सचिवनिहाय टप्पा १ प्राथमिक गुणांकन १ मे रोजी निश्चित करुन घोषित करण्यात आले आहे. याच धर्तीवर प्रत्येक प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या सुधारणांकरीता १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम व आयोग यांचे स्तरावर राबविण्याच्या सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरीता गुणांकनाबाबत १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम (दिनांक ६ मे, २०२५ ते दिनांक २ ऑक्टोबर, २०२५) राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील.