Health Check Up Of School Students
Health Check Up Of School Students
Regarding health check-up of school students
शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य
तपासणीबाबत
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक बैठक ११२५/प्र.क्र.२६०/एसएम-१
मंत्रालय, मुंबई
दिनांक २९.०४.२०२५
संदर्भ :-
१) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय: क्र.सा.वि. ३००११/प्र.क्र.१२६/२०१६/आ/७, दि.२१.१२.२०१७
२) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णयः राबास्वाका ३७२१/प्र.क्र.०५/आरोग्य-७, दि.११.०५.२०२१.
प्रस्तावनाः
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामध्ये ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन मुलांमध्ये आढळणारे आजार, जन्मतः असलेले व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करुन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याबाबत कार्यवाही करण्यात येते. राज्यात यासाठी तालुका स्तरावर तपासणी पथकांची स्थापना करण्यात आली असुन प्रत्येक पथकामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता व एक परिचारीका यांचा समावेश आहे. तपासणी पथके कार्यक्षेत्रातील अंगणवाडी व शाळा यांना भेटी देतात व तेथील मुलांची तपासणी करतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून ० १८ वर्ष वयोगटातील मुलांनी ४ Ds म्हणजे जन्मतः व्यंग (Defect), जीवनसत्व कमतरतेने होणारे आजार (Deficiencies), शारिरीक व मानसिक विकासात्मक विलंब (Developmental Delays) आणि आजार (Diseases) या संदर्भात निदान व उपचार देण्यात येतात. या कार्यक्रमा अंतर्गत अंगणवाडी स्तरावरील ० ६ वर्ष वयोगटातील सर्व मुले तसेच प्रसुती निकष (Delivery Point) पुर्ण करणाऱ्या आरोग्य संस्थांमधील व आशा स्वंयसेविकेच्या मदतीने झालेल्या गृह प्रसुतीमधील मुले, शासकीय व निमशासकीय शाळेतील/कनिष्ठ महाविद्यालयातील तसेच, आश्रम शाळांमधील ६ ते १८ वयोगटातील मुलांवर सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार व गंभीर आजारांवर शल्यचिकित्सा / शस्त्रक्रिया करणे अभिप्रेत आहे. याबाबतच्या तपासणीमधून मुलांना आवश्यकतेनुसार वरिष्ठ रुग्णालयात संदर्भित करण्यात येते व उपचार अथवा शस्त्रक्रिया करण्यात येते. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मुलांच्या आरोग्य तपासणीअंती Screening करुन निदान केलेल्या व दुर्धर आजार असलेल्या तसेच, केंद्र शासनाने निश्चित करुन दिलेल्या १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या मुलांना संदर्भ सेवेव्दारे तातडीने पुढील सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांव्दारे ० – १८ वर्ष वयोगटातील आरोग्य तपासणी केलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियासाठी व दुर्धर आजारावरील उपचारांसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या सहयोगाने Assurance mode वर (विमा कंपनीचा सहभाग न घेता) अंगीकृत रुग्णालयांव्दारे सेवा उपलब्ध करुन देण्यात येते.
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.१३.०१.२०२४ रोजीच्या झालेल्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, प्रथमोपचार ते अंतिम उपचारापर्यंत करण्याचे मा. मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहे.
त्याअनुषंगाने मा. मंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या सोबत दिनांक १०/०३/२०२५ रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत १) शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कार्यक्रम २) आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे ऑनलाईन अॅप (हेल्थ अॅप) व ३) शालेय विद्यार्थ्यार्थ्यांचे आरोग्य पत्रिका (हेल्थ कार्ड) या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग ऑनलाईन अॅप तयार करून त्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येईल असे निर्देश दिले.
त्यानुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता शाळांचा सक्रीय सहभाग आवश्यक असल्यामुळे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करता सर्व समावेशन सूचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.
शासन निर्णय
१) सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी करिता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता खालील प्रमाणे कार्यवाही आवश्यक आहे..
१) सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत बनविण्यात आलेल्या ऑनलाईन अॅपचा (हेल्थ अॅप) वापर करून आरोग्य तपासणी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी.
२) ऑनलाईन अॅपमध्ये माहिती अद्ययावत करून शालेय विद्यार्थ्यांची वैयक्तीक आरोग्य पत्रिका (हेल्थ कार्ड) तयार करणे व विभागाव्दारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन अॅप यंत्रणेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रत्येक तपासणी अंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅप मध्ये upload करण्यात यावी.
३) राज्यातील सर्व शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची प्रतिवर्षी आरोग्य तपासणी करण्यात यावी.
४) विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीअंती काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास, हेल्थ अॅपमध्ये अद्ययावत करून पुढील आवश्यक नियोजन करणे, संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे, आरोग्य तपासणी अंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इ. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) योजनेतील तरतूदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी.
५) विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीकरीता सुरक्षीत व अद्ययावत साधनसामुग्री, यंत्रसामुग्री वापरण्याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी.
६) शालेय आरोग्य तपासणीच्या वेळी शाळेतील सर्व १०० टकके विद्यार्थी उपस्थित राहतील याबाबत संबंधित
शाळेने नियोजन करावे व सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यात यावी.
२) विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी:-
अ) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय राबस्वाका-३७२१/प्र.क्र.०५/आरोग्य-७, दि.११.०५.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ४ आकांक्षित नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद व वाशिम
आणि राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येणारे ५ जिल्हे- धुळे, जळगांव, औरंगाबाद, नांदेड, व बीड या एकूण ९ जिल्ह्यामध्ये सदर शासन निर्णयाव्दारे निर्माण करण्यात आलेल्या समितीव्दारे कामकाज सुरू आहे या समितीतील सदस्य प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) व जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने खालील कामे कराची.
१. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळांमधील विदयार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करणे व वेळा पत्रकानुसार आरोग्य तपासण्यांचे सनियंत्रण करणे.
२. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीअंती काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास, त्याबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे. व त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.
संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे.
आरोग्य तपासणी अंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इ. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) योजनेतील तरतूदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी.
३. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीकरीता सुरक्षीत व अद्ययावत साधनसामुग्री, यंत्रसामुग्री वापरण्याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी.
४. सर्व विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड बनविण्यात यावे व विभागाव्दारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन अॅप मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रत्येक तपासणी अंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅप मध्ये upload करण्यात येत असल्याबाबत खातरजमा करावी,
५. कार्यक्रमाशी संबंधित अडचणी, त्रुटी आंतर विभागीय समन्वयाने सोडविणे.
प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समितीचा आढावा घेणे, मार्गदर्शन करणे..
ब) राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालीका सहीत सर्व महानगरपालीका, नगरपालीकामधील शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी संबंधित महानगरपालीका व नगरपालीका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम प्रभावीपणे अंबलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी. यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणअधिकारी, प्रशासन अधिकारी यांची राहील.
१. शाळांमधील विदयार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करणे व वेळा पत्रकानुसार आरोग्य तपासण्यांचे सनियंत्रण करणे,
२. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीअंती काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास, त्याबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे. व त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे,
आरोग्य तपासणी अंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इ. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) योजनेतील तरतूदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी.
३. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीकरीता सुरक्षीत व अद्ययावत साधनसामुग्री, यंत्रसामुग्री वापरण्याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी.
४. सर्व विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड बनविण्यात यावे व विभागाव्दारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन अॅप मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रत्येक तपासणी अंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅप मध्ये upload करण्यात येत असल्याबाबत खातरजमा करावी.
क) उपरोक्त अ येथे नमूद ९ जिल्हे वगळून उर्वरित जिल्ह्यामध्ये जिल्हा व तालुकास्तरावर पुढीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे.
जिल्हास्तर समितीची रचना
अ.क्र. समितीचे सदस्य पदनाम
मुख्य कार्यकारी अधिकारी – अध्यक्ष
जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय – उपाध्यक्ष
जिल्हा आरोग्य अधिकारी – सदस्य
शिक्षणाधिकारी (प्राथ) -सदस्य सचिव
प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था – सदस्य
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) – सदस्य
सदर समितीची बैठक दोन महिन्यातून एकदा होईल.
जिल्हास्तर समितीची कार्ये –
१. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळांमधील विदयार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करणे व वेळा पत्रकानुसार आरोग्य तपासण्यांचे सनियंत्रण करणे.
२. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीअंती काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास, त्याबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे. व त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे,
आरोग्य तपासणी अंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इ. विद्याथ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) योजनेतील तरतूदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी.
३. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीकरीता सुरक्षीत व अद्ययावत साधनसामुग्री, यंत्रसामुग्री वापरण्याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी.
४. सर्व विद्याथ्यर्थ्यांचे हेल्थ कार्ड बनविण्यात यावे व विभागाव्दारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन अॅप मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रत्येक तपासणी अंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅप मध्ये upload करण्यात येत असल्याबाबत खातरजमा करावी.
५. कार्यक्रमाशी संबंधित अडचणी, त्रुटी आंतर विभागीय समन्वयाने सोडविणे.
६. प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समितीचा आढावा घेणे, मार्गदर्शन करणे..
तालुकास्तरीय समितीची रचना
अ.क्र. समितीचे सदस्य पदनाम
१ गटविकास अधिकारी + अध्यक्ष
२ तालुका आरोग्य अधिकारी – उपाध्यक्ष
३ गटशिक्षणाधिकारी – सदस्य
४ विस्तार अधिकारी (शिक्षण) – सदस्य सचिव
सदर समितीची बैठक दरमहा होईल.
तालुकास्तरीय समितीची कार्ये :-
१. तालुक्यातील शाळांमधील विदयार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करणे व वेळा पत्रकानुसार आरोग्य तपासण्यांचे सनियंत्रण करणे.
२. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीअंती काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास, त्याबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे. व त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.
संबंधित विद्यार्थ्यांना सुयोग्य वैद्यकीय उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी करणे.
आरोग्य तपासणी अंती आवश्यक पुढील सर्व दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इ. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) योजनेतील तरतूदीनुसार मोफत व तातडीने उपलब्ध होण्याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात यावी.
३. विद्याथ्यर्थ्यांची आरोग्य तपाणीकरीता सुरक्षीत व अद्ययावत साधनसामुग्री, यंत्रसामुग्री वापरण्याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी.
४. सर्व विद्याथ्यर्थ्यांचे हेल्थ कार्ड बनविण्यात यावे व विभागाव्दारे सुरू करण्यात येत असलेल्या ऑनलाईन अॅप मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रत्येक तपासणी अंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅप मध्ये upload करण्यात येत असल्याबाबत खातरजमा करावी.
५. कार्यक्रमाशी संबंधित अडचणी, त्रुटी आंतर विभागीय समन्वयाने सोडविणे,
६. प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुक्यातील शाळांचा आढावा घेणे, मार्गदर्शन करणे…
३. मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या :-
१. संबंधित मुख्याध्यापक यांनी पालकांना सूचना देवून आरोग्य तपासणीच्या वेळी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात यावे.
२. आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) वैद्यकिय पथकाव्दारे सुरक्षित व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य तपासण्या करण्यात येत असल्याची दक्षता घेण्यात यावी.
३. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीनंतर त्याच्या व्याधीबाबत योग्य उपचार करण्यासाठी तसेच उपचार सुरू असल्याबाबत नोंदी ठेवाव्यात व ट्रॅकिंग सिस्टीम तयार झाल्यानंतर त्याचा वापर करून ऑनलाईन नोंदी ठेवाव्यात.
४. शालेय आरोग्य तपासणीच्या वेळी शाळेतील सर्व १०० टकके विद्यार्थी उपस्थित राहतील याबाबत संबंधित शाळेने नियोजन करावे व सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यात यावी.
५. शालेय आरोग्य तपासणी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी तालुका अथवा जिल्हा रूग्णालयात नेण्याची आवश्यकता असले तर त्याबाबत तालुका व जिल्हास्तरावर नियोजन करण्यात यावे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४२९१६१६५५८९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
अवर सचिव, महाराष्ट्र शासन