राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी General Elections Of Municipal Corporations Nagar Councils Panchayats

General Elections Of Municipal Corporations Nagar Councils Panchayats

दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी खालील लिंक वर आपल्या मनपाचे नावं टाका, किंवा वोटर आय डी क्रमांक टाका व आपले मतदान केंद्र शोधा. इतरांचे नांव शोधण्यासाठी ही पोस्ट इतरांना शेयर करू शकता.

ALSO READ 👇

राज्य निवडणूक आयोग

महाराष्ट्र

पहिला मजला, नवीन प्रशासकीय भवन, राजगुरू हुतात्मा बोक, मादाम कामा मार्ग, मुंबई-३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. १५ डिसेंबर २०२५

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी

  • राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. १५ः बृहन्मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान; तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

येथील सह्याद्री अतिथिगृहात महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. श्री. वाघमारे यांनी सांगितले की, सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व २८ महानगरपालिकांची अधिसूचना १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.

महानगरपालिकांची नावे

राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या २ नवनिर्मित महानगरपालिका आहेत. ५ महानगरपालिकांची मुदत २०२० मध्ये संपली आहे. सर्वाधिक १८ महानगरपालिकांची मुदत २०२२ मध्ये संपली होती; तर ४ महानगरपालिकांची मुदत २०२३ मध्ये संपली आहे. मुदत समाप्तीची महानगरपालिकानिहाय तारीख अशीः छत्रपती संभाजीनगरः २७ एप्रिल २०२०, नवी मुंबईः ०७ मे २०२०, वसई विरारः २८ जून २०२०, कल्याण डोंबिवलीः १० नोव्हेंबर २०२०, कोल्हापूरः १५ नोव्हेंबर २०२०, नागपूरः ०४ मार्च २०२२, बृहन्मुंबईः ०७ मार्च २०२२, सोलापूरः ०७ मार्च २०२२, अमरावतीः ०८ मार्च २०२२, अकोला: ०८ मार्च २०२२, नाशिकः १३ मार्च २०२२, पिंपरी चिंचवडः १३ मार्च २०२२, पुणेः १४ मार्च २०२२, उल्हासनगरः ०४ एप्रिल २०२२, ठाणे: ०५ एप्रिल २०२२, चंद्रपूरः २९ एप्रिल २०२२, परभणीः १५ मे २०२२, लातूरः २१ मे २०२२, भिवंडी निजामपूरः ०८ जून २०२२, मालेगावः १३ जून २०२२, पनवेलः ९ जुलै २०२२, मीरा भाईंदरः २७ ऑगस्ट २०२२, नांदेड वाघाळाः ३१ ऑक्टोबर २०२२, सांगली- मीरज कुपवाडः १९ ऑगस्ट २०२३, जळगावः १७ सप्टेंबर २०२३, अहिल्यानगरः २७ डिसेंबर २०२३, धुळेः ३० डिसेंबर २०२३. जालनाः नवनिर्मित आणि इचलकरंजीः नवनिर्मित.

बहुसदस्यीय पद्धत

बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व २८ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणतः चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील, त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने किमान ३ ते ५ मते देणे अपेक्षित असेल.

नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.

‘जातवैधता पडताळणी बाबत

राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. जात प्रमाणपत्र असेल; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. “सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल,” असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल. या विहित मुदतीत म्हणजे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.

मतदान केंद्र आणि ईव्हीएम

महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार असून त्यासाठी सुमारे ३९ हजार १४७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे १० हजार १११ मतदान केंद्रांसाठी ११ हजार ३४९ कंट्रोल यूनिट आणि २२ हजार ६९८ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

संभाव्य दुबार मतदारांबाबत दक्षता

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात. संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत. या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही; परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणांची (इमारती) यादी २० डिसेंबर २०२५ रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदार याद्यांतील संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर कार्यवाही करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (अॅप्लिकेशन) विकसित केली आहे. इतरही महानगरपालिकांनी विविध तंत्रांचा वापर करून संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेतली आहे.

महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संभाव्य दुद्वार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले. घरोघरी जाऊनही त्यांची पडताळणी केली आणि त्यांच्याकडून असा मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे. याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु काही कारणाने असा अर्ज भरून घेतला नसल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.

‘मताधिकार’ मोबाईल अॅप महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. ते सध्या फक्त ‘गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल. या अॅपद्वारे मतदाराचे नाव शोधण्यासाठी मतदाराला दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. त्यानंतर जिल्हा आणि महानगरपालिकेच्या नावाची निवड केल्यानंतर आपले नाव दिसेल. याच अॅपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्राचे ठिकाणही कळू शकेल. त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवाराविषयी अधिक माहितीदेखील जाणून घेता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून अॅपप्रमाणे ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल.

मतदार जागृती

महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मतदार जागृती करण्याचे आदेश सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. पारंपरिक प्रसारमाध्यमांबरोबरच नवीन माध्यमांचा कौशल्यपूर्ण वापर करण्याबाबत आयोगाने १२ जून २०२५ रोजी पत्राद्वारे सर्वांना निर्देश दिले आहेत. त्याबाबत वेळोवेळी आढावाही घेण्यात आला आहे. मतदार जागृतीसंदर्भातील सर्व सूचना व निर्देश मार्गदर्शक स्वरुपात असून, स्थानिक पातळीवर काही नावीन्यपूर्ण उपक्रम सूचल्यास तेही आपापल्या स्तरावर राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पातळीवरूनही समाजमाध्यमांसह विविध माध्यमांसह विविध माध्यमांद्वारे मतदार जागृती करण्याचा प्रयत्न असेल. विशेषतः बृहन्मुंबईसह मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अधिक प्रमाणात मतदार जागृतीवर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका स्तरावर नियोजन केले जाईल.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी

मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदोना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पुर्ती सुविधा उभारली जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकच असेल; परंतु याशिवाय शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल. महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी व पोलिस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल. मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी असेल.

मनुष्यबळाची व्यवस्था

महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सुमारे २९० निवडणूक निर्णय अधिकारी आणि सुमारे ८७० सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. साधारणतः सुमारे १ लाख ९६ हजार ६०५ इतक्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासेल, तीदेखील व्यवस्था झाली आहे. आवश्यक तेवढ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व महानगरपालिका आयुक्त यांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत; तसेच त्यासंदर्भात वेळोवेळी संबंधितांच्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत.

प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचार समाप्तीसंदर्भात संबंधित विविध अधिनियमांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांसह कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येत नाहीत. मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ‘२७अअ’ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४(४) अन्वये महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीच्या मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर प्रचारावर निबंध असतात. त्यामुळे १५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची वेळ संपत असल्याने १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची समाप्ती होईल. त्यामुळे १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० नंतर जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारणसुद्धा करता येणार नाही. माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती

महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच संबंधित महानगरपालिका आयुक्त आपल्या स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५’ नुसार ‘महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ स्थापन करतील. महानगरपालिका आयुक्त स्वतः या समितीचे अध्यक्षः तर महानगरपालिकेचा जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असेल. ही समिती प्रचारविषयक इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन, पेड न्यूजसंदर्भातील तक्रारी / प्रकरणांची चौकशी, त्यांचे निराकरण; तसेच विविध प्रसारमाध्यमांतील वृत्तांकनाच्या संकेतांच्या पालनाबाबत संनियंत्रण आणि देखरेख Jagdish More, SDC ३/४

करेल. राज्य निवडणूक आयोगाच्या स्तरावर आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व

संनियंत्रण समिती कार्यरत असेल.

प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका

राज्य निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५’ च्या परिच्छेद २० नुसार संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्रावरील प्रवेशासाठी प्रवेशिका दिल्या जातील. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीदेखील बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्याच स्तरावरून प्रवेशिका देण्यात येतील.

राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी राजकीय पक्षांशी संवाद साधण्यात आला आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठका १४ ऑक्टोबर २०२५. ०१ डिसेंबर २०२५ आणि १२ डिसेंबर २०२५ रोजी पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बहुसदस्यीय पद्धत, विविध न्यायालयांचे आदेश, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था, ईव्हीएमसाठीच्या स्ट्रांग रूमची निगराणी इत्यादींबाबत बैठकीला उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना अवगत करण्यात आले आहे. त्यांच्या मागणीनुसार नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करावयाच्या जोडपत्र-१’ आणि ‘जोडपत्र-२’ बाबत अधिक स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्य प्रचारकांची (स्टार कॅम्पेनर) संख्या २० वरून ४० करण्यात आली आहे.

मतदार व मतदान केंद्र

पुरुष मतदार- १,८१,९३,६६६

महिला मतदार- १.६६.७९.७५५

इतर मतदार- ४,५९६

एकूण मतदार- ३,४८,७८,०१७

एकूण मतदान केंद्र- ३९,१४७

जागा व आरक्षित जागा

महानगरपालिकांची संख्या- २९

एकूण प्रभाग-८९३

एकूण जागा- २,८६९

महिलांसाठी जागा- १.४४२

अनुसूचित जातींसाठी जागा- ३४१

अनुसूचित जमातीसाठी जागा- ७७

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- ७५९

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा

बृहन्मुंबई आणि ‘अ’ वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर)- रु. १५,००,०००/-

‘ब’ वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे) रु. १३,००,०००/-

‘क’ वर्ग महानगरपालिका (कल्याण-डोंबिवली, नवी मुबई, छ. संभाजीनगर व वसई-विरार)- रु. ११,००,०००/-

‘ड’ वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व १९)- रु. ०९,००,०००/-

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५

महत्वाच्या तारखा

नामनिर्देशनपत्रांची छाननी- ३१ डिसेंबर २०२५

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत ०२ जानेवारी २०२६

निवडणूक चिन्ह वाटप ०३ जानेवारी २०२६

अंतिम उमेदवारांची यादी ०३ जानेवारी २०२६

मतमोजणीचा दिनांक १६ जानेवारी २०२६

मतदानाचा दिनांक- १५ जानेवारी २०२६

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी

ALSO READ 👇

image 47

General Elections Of Municipal Corporations Nagar Councils Panchayats

राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र,मुंबई

(प्रसिद्धिपत्रक)

दि. ०४ नोव्हेंबर २०२५

राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान ३ डिसेंबर २०२५ मतमोजणी

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान; तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. श्री. वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.

राज्यातील एकूण २४७ पैकी २४६ नगरपरिषदांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी १० नवनिर्मित नगरपरिषदा आहेत. उर्वरित सर्व २३६ नगरपरिषदांची मुदत संपली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे पातूर (जि. अकोला) नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे. त्याचबरोबर एकूण १४७ पैकी ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी १५ नवनिर्मित; तर उर्वरित सर्व २७ नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. १०५ नगरपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्याही प्रतिनिधींशीही संवाद साधण्यात आला आहे. असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.
एकापेक्षा अधिक मते देणे अपेक्षित

नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुसदस्यी पद्धती असून एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा असतात. एकूण सदस्य संख्येचा विषम आकडा असलेल्या नगरपरिषदेत एका प्रभागात तीन जागा असतात. त्याचबरोबर थेट अध्यक्षपदासाठीदेखील मतदान होत असल्याने साधारणतः एका मतदाराने तीन ते चार जागांसाठी मत देणे अपेक्षित आहे. एका नगरपरिषदची एकूण सदस्य संख्या कमीत कमी २० ते ७५ पर्यंत असते. नगरपंचायतीची निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने होत असली तरी नगरपंचायतीच्या मतदारानेदेखील दोन मते देणे अपेक्षित आहे. एक मत सदस्यपदासाठी; तर दुसरे मत थेट अध्यक्षपदासाठी द्यावे लागेल. सर्व नगरपंचायतीमध्ये सदस्यपदाच्या १७ जागा असतात.

जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा

राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मुभा देण्यासाठी शासनाने संबंधित अधिनियमात दुरुस्ती केली आहे. मात्र, असा उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून त्याला सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.

नामनिर्देशनपत्रासाठी संकेतस्थळ

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने

https://mahasecelec.in

हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील. मतदान केंद्र आणि ईव्हीएम
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असून त्यासाठी सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. अन्य निवडणुकांच्यादृष्टीनेदेखील पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील थेट अध्यक्ष आणि सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च मर्यादा वाढविली आहे. ती पुढलीप्रमाणेः ‘अ’ वर्ग नगरपरिषदः थेट अध्यक्ष-१५,००,०००, सदस्य- ५,००,०००, ‘ब’ वर्ग नगरपरिषदः थेट अध्यक्ष- ११,२५,०००, सदस्य- ३,५०,००० आणि ‘क’ वर्ग नगरपरिषदः थेट अध्यक्ष ७,५०,०००, सदस्य- २,५०,०००. नगरपंचायतः थेट अध्यक्ष- ६,००,०००, सदस्य- २,२५,०००,

मतदारांसाठी संकेतस्थळ

नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधण्याकरिता https://mahasecvoterlist.in हे संकेत स्थळ विकसित केले आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच नाव शोधता येईल. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करुन मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर मतदार यादीतील आपल्या नावासोबतच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल.

मतदारांसाठी नवीन मोबाईल अॅप

मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी नवीन मोबाईल अॅप विकसित केले आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना आपल्या नावाबरोबरच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल.
उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्रेही दाखल करावी लागतात. त्यातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारीविषयक पार्श्वभूमी, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिक समजू शकते. ही माहितीसुद्धा या अॅपमधून मिळू शकेल.

मतदार जागृती

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मतदार जागृती करण्याचे आदेश संबंधित सर्व जिल्हाधिकारी आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पारंपरिक प्रसारमाध्यमांबरोबरच नवीन माध्यमांचा कौशल्यापूर्ण वापर करण्याबाबत आयोगाने १२ जून २०२५ रोजी पत्राद्वारे सर्वांना निर्देश दिले आहेत. मतदार जागृतीसंदर्भातील सर्व सूचना व निर्देश मार्गदर्शक स्वरुपात असून, स्थानिक पातळीवर काही नावीन्यपूर्ण उपक्रम सूचल्यास तेही आपापल्यास्तरावर राबविण्याबाबत कळविले आहे.

संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येते. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु प्रतिसाद न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.

मतदान केंद्रावरील सुविधा

मतदान केंद्रावर दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आदींना प्राधान्याने मतदान करून दिले जाईल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पूर्ती सुविधा उभारली जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलबद्ध करून दिली जाईल. संबंधित ठिकाणी कृष्ठरोग्यांसाठी वेगळे वसतिगृह / आश्रम असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यास हरकत नसेल. तिथे उपलब्धतेनुसार डॉक्टरांची नेमणूक केली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकचे असेल; परंतु शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल. महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल. मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी असेल. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये; परंतु मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मोबाईल दूरध्वनी जमा करण्यासाठी शक्य तिथे कक्ष असेल.

मनुष्यबळाची व्यवस्था

नगरपरिषद व नगरपंचायर्तीच्या या निवडणुकांसाठी २८८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि २८८ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. साधारणतः सुमारे ६६,७७५ इतक्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासेल, तीदेखील व्यवस्था झाली आहे. महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक मनुष्यबळाबाबत निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांसोबतदेखील बैठकी आयोजित करून मनुष्यबळाबाबत नियोजन केले आहे.

आचारसंहिता

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला नगरपरिषदा व नगरपंचातींच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आजच (ता. ४ नोव्हेंबर २०२५) दोन स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.

जिल्हानिहाय नगरपरिषदा व नगरपंचाती (न.पं.)

पालघर- डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा (न.पं). रायगड अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन आणि उरण (न.प.). रत्नागिरी- चिपळूण, देवरुख (न.पं.), गुहागर, खेड, लांजा (न.पं.), राजापूर आणि रत्नागिरी. सिंधुदूर्ग- कणकवली (न.पं.), मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला. ठाणे- अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर. अहिल्यानगर- देवळाली प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा (न.पं.) (न.पं.), पाथर्डी, राहाता, राहूरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर. धुळे- दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, सिंदखेडा (न.पं.) आणि शिरपूर वरवाडे. जळगाव जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगांव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर (न.पं.), नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदूणी (न.पं.), वरणगाव आणि यावल. नंदूरबार शहादा, नंदुरबार, नवापूर आणि तळोदा. नाशिक- भगुर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवाड, इगतपूरी, ओझर, पिंपळगांव बसवंत आणि त्र्यंबक. कोल्हापूर- आजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगाव. पुणे- आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी- उरळी देवाची, इंदापूर, जेजूरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बु. (न.पं.), मंचर (न.पं.), राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव- दाभाडे आणि वडगाव (न.पं.). सांगली आष्टा, आटपाडी (न.पं.), इस्लामपूर, जत, पळूस, शिराळा (न.पं.), तासगाव आणि विटा. सातारा कराड, महाबळेश्वर, मलकापूर, मेढा (न.पं.), म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा आणि वाई. सोलापूर- अक्कलकोट, अकलूज, अनागर (न.पं.), बार्शी, दुधनी, करमाळा, कुडूवाडी, मैदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला. बीड- अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव आणि परळी वैजनाथ. छत्रपती संभाजीनगर- फुलब्री (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर. धाराशिव भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर आणि उमरगा. हिंगोली- बसमतनगर, हिंगोलो आणि कळमनुरी. जालना- अंबड, भोकरदन आणि परतूर. लातूर- अहमदपूर, औसा, निलंगा, रेनापूर (न.पं.) आणि उदगीर, नांदेड- बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट आणि लोहा. परभणी- गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू आणि सोनपेठ. अकोला अकोट, बाळापूर, बार्शी- टाकळी, हिवरखेडा, मूर्तिजापूर आणि तेल्हारा. अमरावती- अचलपूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी (न.पं.), मोर्शी, नांदगाव खंडेश्वर (न.पं.), शेंदूरजनाघाट आणि वरुड. बुलढाणा- बुलढाणा, चिखली. देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदूरा, शेंगाव आणि सिंदखेडराजा. वाशीम- कारंजा, मालेगाव (न.पं.), मंगरुळपीर, रिसोड आणि वशीम. यवतमाळ आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, ढाणकी (न.पं.), नेर नबाबपूर आणि पांढरकवडा. भंडारा पवनी, साकोली शेंदूरवाफा, तुमसर आणि भंडारा. चंद्रपूर- बल्लारपूर, भद्रावती, भिसी (न.पं.), ब्रह्मपूरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, मूल, नागभीड, राजूरा आणि वरोरा. गडचिरोली- आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली. गोंदिया- गोंदिया, गोरेगाव (न.पं.), सालेकसा (न.पं.) आणि तिरोडा. नागपूर- बहादुरा (न.पं.), बेसा पिपळा (न.पं.), भिवापूर (न.पं.), बुटिबोरी, डिगडोह, कळमेश्वर- ब्रह्मणी, कामठी, कांद्री कन्हान (न.पं.), काटोल, खापा, कोंढाळी (न.पं.), महादुला (न.पं.), मोहपा, मौदा (न.पं.), नरखेड, निलडोह (न.पं.), पारशिवणी (न.पं.), रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी, बिडगाव- तरोडी (खु) पांढुर्णा (न.पं.), गोधणी रेल्वे (न.पं.), कन्हान पिपरी, मोवाड, वाडी आणि येरखेडा (न.पं.). वर्धा- आर्वी, देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे आणि वर्धा.

महत्वाच्या तारखा

नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
नामनिर्देशनपत्रची दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५
नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५
अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मदुत- २१ नोव्हेंबर २०२५
अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५
मतदानाचा दिवस – ०२ डिसेंबर २०२५
मतमोजणीचा दिवस – ०३ डिसेंबर २०२५
एकूण मतदार व मतदान केंद्र
पुरुष मतदार- ५३,७९,९३१
महिला मतदार- ५३,२२,८७०
इतर मतदार- ७७५
एकूण मतदार- १,०७,०३,५७६
एकूण मतदान केंद्र- सुमारे १३,३५५
एकूण जागा आणि आरक्षित जागा
निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदा २४६
निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती- ४२
एकूण प्रभाग- ३,८२०
एकूण जागा- ६,८५९
महिलांसाठी जागा- ३,४९२
अनुसूचित जार्तीसाठी जागा- ८९५
अनुसूचित जमातींसाठी जागा- ३३८
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- १,८२१
नगरपरिषद / नगरपंचायतींची जिल्हा व विभागनिहाय संख्या
पालघर- ४
रायगड- १०
रत्नागिरी- ७
सिंधुदूर्ग- ४
ठाणे-२
कोकण विभाग एकूण- २७
अहिल्यानगर- १२
धुळे- ४
जळगाव- १८
. नंदूरबार- ४
नाशिक- ११
नाशिक विभाग एकूण – ४९
कोल्हापूर- १३
पुणे- १७
सांगली – ८
सातारा- १०
सोलापूर- १२
पुणे विभाग एकूण – ६०
छत्रपती संभाजीनगर- ७
बीड-६
धाराशिव – ८
हिंगोली- ३
जालना- ३
लातूर-५
नांदेड- १३
परभणी- ७
छत्रपती संभाजीनगर एकूण ५२
अमरावती – १२
अकोला- ६
बुलढाणा- ११
वाशीम – ५
यवतमाळ- ११
अमरावती विभाग एकूण – ४५
भंडारा- ४
चंद्रपूर- ११
गडचिरोली- ३
गोंदिया- ४
नागपूर- २७
वर्धा- ६
नागपूर विभाग एकूण-५५

परिपत्रक पीडीएफ लिंक

General Elections Of Municipal Corporations Nagar Councils Panchayats
General Elections Of Municipal Corporations Nagar Councils Panchayats

क्रमांक : एमसीओ-२०२५/प्र.क्र.४०९/नवि-१४

दिनांक : ०३ ऑक्टोबर, २०२५.

विषयः- राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत काढणेबाबत.

महोदय,

राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत सोमवार, दि.०६.१०.२०२५ रोजी, परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

२. तरी, सुरक्षिततेच्या कारणास्तव मंत्रालयीन प्रवेशाची स्थिती विचारात घेता, सदर आरक्षणाच्या सोडतीसाठी आपल्या पक्षांचे दोन प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येत असून, पक्षाच्या अध्यक्ष / सचिव यांनी दोन प्रतिनिधी यांची शिफारस करुन आरक्षणाच्या सोडतीसाठी पाठवावे, ही विनंती.

आपली,

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

शासनाच्या उप सचिव

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

प्रति,
अध्यक्ष / सचिव, सर्व राजकीय पक्ष महाराष्ट्र राज्य

General Elections Of Municipal Corporations Nagar Councils Panchayats
General Elections Of Municipal Corporations Nagar Councils Panchayats

Also Read 👇

IMG 20250612 210630
General Elections Of Municipal Corporations Nagar Councils Panchayats

General Elections Of Municipal Corporations Nagar Councils Panchayats

Mahanagar Palika Nagar Parishad nagar panchayat sarvtrik nivadnuk

Regarding the general elections of Municipal Corporations, Municipal Councils/Nagar Panchayats in the state

क्रमांक : एमसीओ-२०२५/प्र.क्र.२४२/नवि-१४

दिनांक : १२ जून, २०२५.

विषयः- राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकाबाबत.

संदर्भ :- समक्रमांकाचे दि.१०.०६.२०२५ रोजीचे आदेश.

महोदय,
राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका प्रस्तावित असून, सदर निवडणूकांच्या अनुषंगाने प्रभाग रचनेसंदर्भातील सूचना दि.१०.०६.२०२५ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

२. प्रभाग रचनेसंदर्भातील कालबध्द कार्यक्रम सोबत जोडण्यात येत असून, या कालबध्द कार्यक्रमामध्ये नमुद करण्यात आलेल्या कालावधीनुसार टप्पेनिहाय कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता संबंधित अधिकारी यांनी घेण्यात यावी.

नगरपरिषद नगरपंचायत अ,ब ,क ,ड वर्ग महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना करण्याबाबत आदेश

३. तसेच, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका विहीत कालावधीत घेण्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने, या कालबध्द कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची सुट अथवा सवलत अनुज्ञये असणार नाही.

आपली,

परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा

शासनाच्या उप सचिव
महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रति,
सर्व जिल्हाधिकारी
सर्व महानगरपालिका आयुक्त सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतींचे मुख्याधिकारी

प्रत :-
१) आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.
२) निवडनस्ती (नवि-१४)

IMG 20250612 205705
General Elections Of Municipal Corporations Nagar Councils Panchayats

Leave a Comment

error: Content is protected !!