Nagar Parishad Nagar Panchayat Mahanagar Palika Prabhag Rachna Aadesh 2025 नगरपरिषद नगरपंचायत अ ब क ड वर्ग महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना करण्याबाबत आदेश २०२५

Nagar Parishad Nagar Panchayat Mahanagar Palika Prabhag Rachna Aadesh 2025

image 19
Nagar Parishad Nagar Panchayat Mahanagar Palika Prabhag Rachna Aadesh 2025

Nagar Parishad Nagar Panchayat Mahanagar Palika Prabhag Rachna Aadesh 2025

Nagar Parishad Nagar Panchayat Mahanagar Palika Ward Formation Order 2025

नगरपरिषद नगरपंचायत अ,ब ,क ,ड वर्ग महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना करण्याबाबत आदेश

Order regarding the formation of Municipal Council, Nagar Panchayat, A, B, C, D Class Municipal Corporation, Brihanmumbai Municipal Corporation Wards

क्रमांक : एमसीओ-२०२५/प्र.क्र.२४२/नवि-१४

(निवडणूक प्राथम्य)

दिनांक : १० जून, २०२५.

नगरपरिषद / नगरपंचायतींची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश-२०२५

आदेश

ज्याअर्थी. सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१, दि.११.०३.२०२२, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १० च्या पोटकलम १ (अ) मधील तरतुदीनुसार राज्य शासन राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने प्रत्येक नगरपालिका क्षेत्रासाठी असे क्षेत्र ज्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व सीमा राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करतील अशी तरतूद करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम क्रमांक १०, दि.२५.०१.२०२२ अन्वये नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रभागातील सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.

आणि ज्याअर्थी. सन २०२२ चा महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम क्रमांक १२, दि.२५.०१.२०२२ अन्वये नगरपरिषदेमध्ये निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र.१९७५६/२०२१ माये दि.०६ मे, २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेणे आवश्यक असून सदर निवडणुका या याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहणार आहेत.

आणि ज्याअर्थी, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रीयेमध्ये (१) प्रभाग रचना करणे व आरक्षण ठरविणे, (२) विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करणे आणि (३) प्रत्यक्ष निवडणूक घेणे अशा तीन प्रमुख टप्प्यांचा समावेश होतो व या तिन्ही टप्प्यांच्या प्रक्रियेमध्ये विविध उप-टप्पे आहेत.

आणि ज्याअर्थी, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भातील विविध टप्पे व उप-टप्पे पूर्ण करण्याकरिता लागणारा कालावधी व मा. सर्वोच्च न्यायालयाचे उपरोक्त निर्देश विचारात घेता निवडणुकांची प्रक्रिया तात्काळ सुरू करणे आवश्यक असून, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील उपरोक्त सुधारणांना अनुसरून निवडणुकांकरीता प्रभाग रचना करण्याबाबत आदेश देणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१, दि.११.०३.२०२२, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १० मधील पोट-कलम १ (अ) मधील अधिकारांचा व इतर प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासन, राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता सदस्य संख्या ठरवणे, प्रभाग रचना करणे इत्यादीकरीता खालीलप्रमाणे आदेश देत आहे १. संक्षिप्त नावः

या आदेशाला ” नगरपरिषद / नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश, २०२५ असे संबोधिले जाईल.

२. अधिकार प्रदानः

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १० ध्या पोटकलम १ (अ) मधील तरतुदीनुसार निवडणुकीकरिता प्रभाग रचना शासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची असून शासन, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या

बाबतीतील हे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करीत आहे.

संबंधित जिल्हाधिकारी आपले अधिकार त्यांच्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांना प्रत्यार्पित करणार नाहीत.

या निवडणुकांचे कामकाज पार पाडतांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे सर्व काळजी व दक्षता घेणे आवश्यक आहे. ही जबाबदारी पार पाडताना निवडणुकांचे पावित्र्य राखणे आणि निवडणूक प्रक्रिया मुक्त, न्याय्य व पारदर्शक रितीने पार पडेल हे संबंधित जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी पहाणे अत्यंत आवश्यक आहे.

३. उपरोक्त नगरपरिषद, नगरपंचायती प्रभाग रचना संदर्भातील विविध टप्पे व त्यासाठीचे

जबाबदार असलेले संबंधित अधिकारी पुढील प्रमाणे असतील-

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

IMG 20250610 223051
Nagar Parishad Nagar Panchayat Mahanagar Palika Prabhag Rachna Aadesh 2025


महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२.

दुरध्वनी क्र. : ०२२-२२७९ ३८३७

Email ID: sec.ud2@maharshtra.gov.in

क्रमांक: एमसीओ-२०२५/प्र.क्र.२४२/नवि-१४

दिनांक: १० जून, २०२५.

(निवडणूक प्राथम्य)

“अ, ब व क” वर्ग

महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश-२०२५

आदेश

ज्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१, दिनांक ११.०३.२०२२, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ५ पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार पालिका सदस्यांच्या निवडणूकीच्या प्रयोजनासाठी प्रत्येक शहर ज्या प्रभागात विभागले जाईल त्या प्रभागांची संख्या व सीमा राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करील अशी तरतूद करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३, दि.०८.०९.२०२२ अन्वये महानगरपालिकेमध्ये निवडून द्यावयाच्या सदस्यांची किमान व कमाल संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.

आणि ज्याअर्थी, सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३, दि.१८.०३.२०२४ अन्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत, प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर चार पालिका सदस्य, परंतु तीनपेक्षा कमी नाहीत व पाचपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील अशी तरतूद करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ मध्ये दि.०६ मे, २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेणे आवश्यक असून, सदर निवडणुका या याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहणार आहेत.

आणि ज्याअर्थी, महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रीयेमध्ये (१) प्रभाग रचना करणे व आरक्षण ठरविणे (२) विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करणे आणि (३) प्रत्यक्ष निवडणूक घेणे अशा तीन प्रमुख टप्प्यांचा समावेश होतो व या तिन्ही टप्यांच्या प्रक्रियेमध्ये विविध उप-टप्पे आहेत.

आणि ज्याअर्थी, महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भातील विविध टप्पे व उप-टप्पे पूर्ण करण्याकरिता लागणारा कालावधी व मा. सर्वोच्च न्यायालयाचे उपरोक्त निर्देश विचारात घेता निवडणुकांची प्रक्रिया तात्काळ सुरू करणे आवश्यक असून, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील उपरोक्त सुधारणांना अनुसरून निवडणुकांकरीता प्रभाग रचना करण्याबाबत आदेश देणे आवश्यक आहे..

त्याअर्थी, महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५ मधील अधिकारांचा व इतर प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासन, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत “अ, ब व क” वर्ग महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता सदस्य संख्या ठरवणे, प्रभाग रचना करणे इत्यादीकरीता खालीलप्रमाणे आदेश देत आहे:-१. संक्षिप्त नावः

या आदेशाला ” “अ, ब व क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश, २०२५” असे संबोधिले जाईल.

२. अधिकार प्रदानः

महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१, दिनांक ११.०३.२०२२, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ५ मधील तरतुदीनुसार निवडणुकीकरिता प्रभाग रचना शासनाने, राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची आहे.

खालील “अ, ब व क’ वर्ग महानगरपालिकांच्या बाबतीत प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याच्या अनुषंगाने सदस्य संख्या निश्चित करुन प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करणे ही जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांची असेल.

IMG 20250610 223139
Nagar Parishad Nagar Panchayat Mahanagar Palika Prabhag Rachna Aadesh 2025

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२.

दुरध्वनी क्र. : ०२२-२२७९ ३८३७

Email ID: sec.ud2@maharshtra.gov.in

क्रमांक : एमसीओ-२०२५/प्र.क्र.२४२/नवि-१४

(निवडणूक प्राथम्य)

दिनांक: १० जून, २०२५.

“ड” वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश-२०२५

आदेश

ज्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१, दिनांक ११.०३.२०२२, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ५ पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार पालिका सदस्यांच्या निवडणूकीच्या प्रयोजनासाठी प्रत्येक शहर ज्या प्रभागात विभागले जाईल त्या प्रभागांची संख्या व सीमा राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करील अशी तरतूद करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३, दि.०८.०९.२०२२ अन्वये महानगरपालिकेमध्ये निवडून द्यावयाच्या सदस्यांची किमान व कमाल संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.

आणि ज्याअर्थी, सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३, दि.१८.०३.२०२४ अन्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत, प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर चार पालिका सदस्य, परंतु तीनपेक्षा कमी नाहीत व पाचपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील अशी तरतूद करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र.१९७५६/२०२१ मध्ये दि.०६ मे, २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेणे आवश्यक असून सदर निवडणुका या याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहणार आहेत.

आणि ज्याअर्थी, महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रीयेमध्ये (१) प्रभाग रचना करणे व आरक्षण ठरविणे, (२) विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करणे आणि (३) प्रत्यक्ष

निवडणूक घेणे अशा तीन प्रमुख टप्प्यांचा समावेश होतो व या तिन्ही टप्प्यांच्या प्रक्रियेमध्ये विविध उप-टप्पे आहेत.

आणि ज्याअर्थी, महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भातील विविध टप्पे व उप-टप्पे पूर्ण करण्याकरिता लागणारा कालावधी व मा. सर्वोच्च न्यायालयाचे उपरोक्त निर्देश विचारात घेता निवडणुकांची प्रक्रिया तात्काळ सुरू करणे आवश्यक असून, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील उपरोक्त सुधारणांना अनुसरून निवडणुकांकरीता प्रभाग रचना करण्याबाबत आदेश देणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५ मधील अधिकारांचा व इतर प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासन, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत “ड” वर्ग महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता सदस्य संख्या ठरवणे, प्रभाग रचना करणे इत्यादीकरीता खालीलप्रमाणे आदेश देत आहे :-

१. संक्षिप्त नावः

या आदेशाला “ड” वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश, २०२५” असे संबोधिले जाईल.

२. अधिकार प्रदानः

महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१, दिनांक ११.०३.२०२२, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ५ मधील तरतुदीनुसार निवडणुकीकरिता प्रभाग रचना शासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची असून, शासन खालील “ड” वर्ग महानगरपालिकांच्या बाबतीतील हे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करीत आहे.

IMG 20250610 223432
Nagar Parishad Nagar Panchayat Mahanagar Palika Prabhag Rachna Aadesh 2025

___________

बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना करण्याबाबत आदेश दिनांक -१०६२०२५
Municipal Corporation GENERAL ELECTION PUBLIC NOTICE
NOTIFICATION
Mumbai Municipal Corporation Act, 1888
Extent of the Ward Boundaries and its descriptions
Ward Composition Order of Brihanmumbai Municipal Corporation-2025

क्रमांक : एमसीओ-२०२५/प्र.क्र.२४२/नवि-१४

(निवडणूक प्राथम्य)

दिनांक: १० जून, २०२५.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश-२०२५

आदेश

ज्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१, दि.११.०३.२०२२, मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १९ पोट-कलम (१) खंड (अ) मधील तरतुदीनुसार पालिका सदस्यांच्या निवडणूकीच्या प्रयोजनासाठी प्रत्येक शहर ज्या प्रभागात विभागले जाईल त्या प्रभागांची संख्या व सीमा राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करतील अशी तरतूद करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, सन २०२२ मुंबई महानगरपालिका अधिनियम क्रमांक ४३, दि.०८.०९.२०२२ अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या २२७ अशी निश्चित करण्यात आलेली आहे.

आणि ज्याअर्थी, मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र.१९७५६/२०२१ मध्ये दि.०६ मे, २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेणे आवश्यक असून सदर निवडणुका या याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहणार आहेत.

आणि ज्याअर्थी, महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रीयेमध्ये (१) प्रभाग रचना करणे व आरक्षण ठरविणे (२) विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करणे आणि (३) प्रत्यक्ष

निवडणूक घेणे अशा तीन प्रमुख टप्प्यांचा समावेश होतो व या तिन्ही टप्यांच्या प्रक्रियेमध्ये विविध उप-टप्पे आहेत.

आणि ज्याअर्थी, महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भातील विविध टप्पे व उप-टप्पे पूर्ण करण्याकरिता लागणारा कालावधी व मा. सर्वोच्च न्यायालयाचे उपरोक्त निर्देश विचारात घेता निवडणुकांची प्रक्रिया तात्काळ सुरू करणे आवश्यक असून, मुंबई महानगरपालिका अधिनियमातील उपरोक्त सुधारणांना अनुसरून निवडणुकांकरीता प्रभाग रचना करण्याबाबत आदेश देणे आवश्यक आहे..

त्याअर्थी. शासन मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १९ पोट-कलम (१) खंड (अ) नुसार मिळालेल्या अधिकारांचा व इतर प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना आराखडा तयार करणे इत्यादी करीता खालीलप्रमाणे आदेश देत आहे.:-

१. संक्षिप्त नावः

या आदेशाला बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक (प्रभाग रचना) आदेश, २०२५” असे संबोधिले जाईल.

२. अधिकार प्रदानः

मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १९ पोट-कलम (१) खंड (अ) मधील तरतुदीनुसार निवडणुकीकरिता प्रभाग रचना शासनाने, राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेतील प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांची असेल, महानगरपालिका आयुक्त यांनी या निवडणुकांचे कामकाज पार पाडतांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे सर्व काळजी व दक्षता घेणे आवश्यक आहे. ही जबाबदारी पार पाडताना निवडणुकांचे पावित्र्य राखणे आणि निवडणूक प्रक्रिया मुक्त, न्याय्य व पारदर्शक रितीने पार पडेल हे महानगरपालिका आयुक्त यांनी पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

३. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचना संदर्भातील विविध टप्पे व त्यासाठीचे जबाबदार

असलेले संबंधित अधिकारी पुढील प्रमाणे असतील-

IMG 20250610 223610
Nagar Parishad Nagar Panchayat Mahanagar Palika Prabhag Rachna Aadesh 2025

Order 2025 regarding the formation of Municipal Council, Municipal Panchayat, Municipal Corporation Wards

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

Email ID: sec.ud2@maharshtra.gov.in

This video explains how to easily make of ward formation maps of Village Panchayat on Google Earth

Leave a Comment

error: Content is protected !!